हिंदू समाजात रामायण आणी महाभारत ह्या दोन गाथा हजारो वर्ष जनमाणसात रूढ
आहेत. ह्यातही सलीम खान म्हणतात त्याप्रमाणे "महाभारतासारखे दुसरे कथानक
आणी स्क्रीन प्ले जगात कुठेही आढळणार नाही". ह्यातील प्रत्येक प्रसंग व घटना
हि पुढे घडणारया घटनेची नांदी आहे. एखादे पुस्तक हातात घेतल्यावर ते
संपल्याशिवाय हातावेगळे करता येत नाही ,तसीच अवस्था महाभारत वाचताना किंवा
आपली टीवी वर पाहतांना होते.
म्हणुनच मला असे वाटते की रामायणा पेक्षा
महाभारताचा आपल्या समाजावर जास्त पगडा आहे. पण आपल्या वास्तविक जीवनात
किंवा आभसी जगतात मुशाफिरगीरी करतांना मी अनेकदा कर्ण श्रेष्ठ कि अर्जुन हा
पुणे की मुंबई ह्या धर्तीवर रंगणारा वाद पहातो.
"कर्णाला ह्या शतकात
मृत्युंजय ह्या कादंबरीने मोठा केला" अशी वक्तव्ये जर कुणी केली की
एखादा कर्णप्रेमी ( बहुदा अश्या व्यक्ती ज्यांना आयुष्यात कोणत्या तरी
बाबतीत आपली सतत उपेक्षा झाल्याचा सल उरी असतो अश्या व्यक्ती ) चवताळून
उठतात. मग कोणत्याही बंगाली आणि महाराष्ट्रीय माणसाला तात्विक वाद किंवा
वैचारिक मंथन करणे आवडते ह्या उक्तीला अनसरून मग शाब्दिक चकमकी लढतात.
जीव्हेचे वार होतात. आणी महाभारताचे अनेक दाखले व प्रसंग दिले जातात.
प्रत्येक पक्ष आपली बाजू हिराहीरीने मांडतो.