आमच्याकडे जर्मनीत उन्हाळा सुरु झाला आहे.आठवड्याचे ५ दिवस लख्ख सूर्य प्रकाश असतो. मात्र शनिवार ,रविवार नित्यनेमाने आभाळ दाटून येते. आणि गारवा दाटून येतो आणि कुंद वातावरण आणि दिवस भर पावसाची रिपरिप पण हे वातावरण त्यातील गारवा मला अजिबात आवडत नाही.
८ महिने थंडीत येथे थंडीत गारठल्यावर सूर्याची दाहकता आणी अंगाची लाही लाही करणारा उन्हाळा ह्यासाठी मी अगदी आसुसलेला आहे.
हे जरा विचित्र वाटेल पण जागतीकरणामुळे आम्ही युरोपात येऊन स्थिरावलो आणि जगण्याचे सामाजिक ,सांस्कृतिक नाही तर भौगोलिक संधर्भ सुद्धा बदलले.