हिमवर्षाव

Blogger Tricks

रविवार, ३ जून, २०१२

दारू एक व्यसन आणि मराठी संस्थळ


दारू पिणे ही आवड तर पाजणे हा एकेकाळी आमच्या चरितार्थाचा भाग होता.

म्हणून ह्याविषयावर हक्काने थोडेसे खरडतो.( एरवी सुद्धा खरडतो ......)

एखादा माणूस दारू चे आचमन करत असेल तर अनुभवाने आम्ही (पाजणारे ) हा दारू पितोय का दारू ह्याला पीत आहे हे सांगू शकतो.

येथे दारूला उगाच बदनाम करण्यात येत आहे. असे माझे स्पष्ट मत आहे.



दारू हे केवळ एक निमित्त असते.

मुळात व्यसनाधीन माणूस कोणत्याही व्यसनाच्या आधीन होण्याआधी त्यांच्या मानसिक दृष्ट्या कुठेतरी जबरदस्त कंपूवत असतो.

कारणे जगात अनेक असतात पण त्या कारणांना वास्तविक आयुष्यात तोंड देणे विविध कारणास्तव शक्य झाले नाही. किंवा तोंड देण्याची मानसिकता नसेल तर मग आपले शरीर एखादे मृगजळ शोधते. मग त्यासाठी वास्तविक जगातील एखादे व्यसन उदा दारू हि त्या इसमास खर्या आयुष्यातून एखाद्या मोहमयी जादुई दुनियेत नेऊन ठेवते. तेथे मिळणारा क्षणिक आनंद व त्यात दुनियेत चालणारी आपली अधिसत्ता त्या दुनियेत आपल्याला सारखे रमण्यास प्रवृत्त करते ह्यालाच मग व्यसन लागणे असे म्हणतात.

माझ्या पाहण्यात अनेक लोक आयुष्यात काहीतरी मोटीव. लक्ष्य ,उदिष्टाचा अभाव असल्याने दारूच्या आहारी नोकरी झाल्यावर संध्याकाळी काय करायचे ह्या विवंचनेत जातात.

दारूचे काय किंवा अमली पदार्थांचे काय व्यसन हे केव्हाही वाईट. दारूपेक्षा सिगरेट चे व्यसन केव्हाही वाईट. हे व्यसन कुठेही सार्वजनिक जागी भागवता येत असल्याने ते लवकर लागते.दारू शिवाय एकादी व्यक्ती दिवसभर राहू शकते. मात्र सिगारेट पिणारी साधी व्यक्ती दिवसातून एकदा सुद्धा सिगारेट मिळाली नाही तर ......

कितीतरी माझ्या माहितीत असणारे सज्जन सिगारेट प्यायल्या शिवाय सकाळी संडास सुद्धा करू शकत नाही.

माझ्या आयुष्यात आभासी जगत आणि त्यातील संस्थळ आल्यामुळे इतर कोणत्याही गोष्टी करण्यात फुरसत मिळत नाही. घराची कामे व त्यातून मिळालेल्या वेळात ह्या जगतात वाचन ,लिखाण करायला फुरसत नसते-

एखाद्या दारूच्या व्यसनी माणसाने मराठी संस्थळांवर एखाद्या प्रस्थापित विचारवंतांशी ( कंपूशी) वैचारिक  पंगा घ्यावा मग कसा तो सतत आपले व्यनी ( मेसज ) किंवा आपल्या खरडी  किंवा एखादे लेख त्यावरील प्रतिसाद किंवा स्वतःचे लेख त्यावरील प्रतिसाद ह्यावर व्यसन जडल्या सारखा जखडून जातो.

सुरवातीला मला मराठी संस्थळांवर लिहिण्याचे , वाचण्याचे व्यसन म्हणावे इतके व्यसन लागले होते. अनेक तास मी नेटवर ह्या संस्थळांवर पडीक असायचो.


मग मी काही दिवस दारूच्या आहारी गेलो.

 (म्हणजे काय तर  एका संसारी माणसाच्या आयुष्यात जेवणापूर्वी एखादा पेग हे प्रमाण नॉर्मल गणले जाते.)
ह्या न्यायाने सुट्टीच्या दिवशी आठवड्यातून दोनदा आमच्याकडून तीर्थ प्राशन होऊ लागले:
आता मद्य व मराठी संस्थळ व  असे दोन्ही मकारांमधील संतुलन सांभाळून जगत आहे.
ह्यात भर पडली ती माझ्या ब्लॉग ची


आज रविवार चा सुट्टीचा दिवस
नुकतेच चमचमीत संमिश्र जेवण झाली.
पावसाने सडकून आपली नित्यनियमाने हजेरी लावली.
बायकोने देलेले घरचे काम उरकून मी शय्यागृहात शिरलो.
मिलिंदचा गारवा अनुभवायला लागलो.

हातात सोनेरी रंगाचे द्रव्य असणारा चषक असावा अशी एक कल्पना डोक्यात आली त्याहून निमिषार्धात दारू एक व्यसन आणि मराठी संस्थळ ह्या विषयावर लिहिते होण्याची कल्पना उगम पावली.
आणि माझ्यातील नवजात लेखकाने माझ्यातील भविष्यातील तळीराम संपवला.

अवांतर
मद्याचा चषक अथवा एकाच प्याला हा क्वचित हातात धरणारे अनेक धुरंधर पुढे परिस्थिती च्या हातातील बाहुले बनून भविष्यात तळीराम झाल्याची शेकड्याने उदाहरणे पहिली आहेत. तेव्हा
पंचतारांकित संस्कृतीत काम करून सुद्धा मला लिहीवेसे वाटते की.
I drink alcohol occasionally, But everyday is not occasion for me.

१३ टिप्पण्या :

  1. दारूला उगाच बदनाम करण्यात येत आहे. असे माझे स्पष्ट मत आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. रिकामे डोके म्हणजे सैतानाचे घर.
    आणि सतत असुरक्षिततेची भावना असणाऱ्या लोकांनी मानसिक तज्ञांच्या सल्ला न घेता दारू ला एक पर्याय म्हणून पहिले की सगळा घोळ निर्माण होतो.दारू पिणे आणि त्याचे व्यसन असणे ह्यातही दोन प्रकार आहेत
    मान्य की दारू नियमितपणे पोटभरून पिणे हे शरीराला अपायकारक आहे. पण समाजातील प्रतिष्टीत मंडळी अगदी सिनेजगतातील अनेक मान्यवर अनेक वर्ष दारूची साथ लाभून सुद्धा आपल्या सामाजिक आर्थिक व व आरोग्याची स्थिती संभाळून समाजात वावरत असतात. तर एखद्या गरीब गरीब घरातील मनुष्य परिस्थितीला हार जाऊन दारूला शरण जातो. त्याचा मात्र दारू निकाल लावते.
    दारू आपण कोणत्या उद्देशाने आणि कशी पीत आहोत ह्यावर सुद्धा बरेच काही अवलंबून असते.
    उदा सिने सृष्टीतील कुत्ते कमीने असे पडद्यावर म्हणणारा ७० वर्षीय तरणाबांड म्हातारा आजही मदिरा नित्यनियमाने भरपेट पितो. मात्र कसरत व आहार व जीवनाकडे व दारूकडे पाहण्याचा निकोप दृष्टीकोन त्याला अजूनही ह्या वयात गब्रू जवान ठेवतात.

    आपला आहार व शारीरिक व्यायाम असेल तर दारू शरीराला सोसते.
    नियमित पिणाऱ्या लोकांचे सामाजिक , सार्वजनिक जीवन पाहून माझे हे मत बनले आहे.
    पण दारू कडे आयुष्याकडे पळवाट किंवा निराशावादी जीवनाला दारूची साथ लाभली की दारू ही गरज बनते.
    माणूस दारू पितो इथपर्यंत ठीक आहे पण दारूने माणसाला प्यायला सुरवात केली की आयुष्य खडतर बनते.
    चाळ नावाची वाचाळ वस्ती मध्ये चंदू पारखी ची दारू सोडवण्यासाठी सर्व चाळकरी माणसे त्यांच्या आयुष्यात इंटरव्हेन्शन करतात. आणि त्याची दारू सुटते.
    by wikii baba
    An intervention is an orchestrated attempt by one or many, people – usually family and friends – to get someone to seek professional help with an addiction or some kind of traumatic event or crisis, or other serious problem. The term intervention is most often used when the traumatic event involves addiction to drugs or other items.

    भारतीय समाज हा जास्त एकसंघ व कुटुंब प्रधान व समाजाला विशेतः आपल्या कम्युनिटी मधील लोक काय विचार करतील ह्याचा विचार करून आपले सामाजिक वर्तन ठरवतो. उदा मुलाने शिक्षण कोणते घ्यावे असे अनेक निर्णय तो आपल्या कम्युनिटी चा ट्रेंड पाहून ठरवतो. तेव्हा दारू पिण्याच्या समस्येवर त्या व्यक्तीच्या जवळील व्यक्तीने किंवा मित्र , नातेवाईकांनी इंटरव्हेन्शन करणे हा निदान भारतात तरी चांगाच कारगीर ठरेल

    सोनाराने कान टोचलेले चांगले असतात
    भारतात काय सोनारांना तोटा नाही

    उत्तर द्याहटवा
  3. आज रविवार चा सुट्टीचा दिवस
    नुकतेच चमचमीत संमिश्र जेवण झाली.
    पावसाने सडकून आपली नित्यनियमाने हजेरी लावली.
    लेख छान आहे. तुम्ही कुठे असता ते कळले नाही. पण रविवारी तुमच्या कडे पावसाने हजेरी लावली हे वाचून आमच्याकडेही दिवसा दोन दिवसात पाऊस येईल अशी आशा निर्माण झालीय. पावसा अभावी जळणारी पिका आता मला आभाळाकडे पहायला भाग पडतात.

    उत्तर द्याहटवा
  4. विजय
    अगदी हाच म्हणजे असाच विचार मी नको तो गारवा ह्या माझ्या पोस्ट मध्ये मांडला आहे.

    हे विश्व शी आमुचे घर
    पण सध्या वास्तव्यासाठी

    मुक्काम पोस्ट जर्मनी
    राज्य बायर्न
    शहर म्युनिक
    आपले विचार जुळले हे पाहून आनंद
    वाटला.

    उत्तर द्याहटवा
  5. तुमच्याकडचा पाऊस पाहून तुम्ही भारतीय आहात पण भारतात नसावेत हे लक्षात आलं होतंच. मागील पाच सहा महिन्यांपासून पुण्यापासून १२० किलोमीटरवर असणाऱ्या शेतीवर असल्यामुळे नेटवर बसणं होत नाही. आपला सरकार ग्रामीण भागाला निटसी विझी पुरवत नाही मग स्न्गानक आणि नेत कुठून येणार. त्यामुळेच दोनचार दिवसांसाठी पुण्यात येतो तेव्हा अनेक कामं करता करता चार दोन पोस्ट करतो. पण इतरांच्या पोस्ट पहायला सवड मिळत नाही. पण भेटत राहू. तुमच्या जर्मनीतल्या वास्तव्यास मनापासून शुभेछा.

    उत्तर द्याहटवा
  6. वीज पुरवठा व भारताला अत्यावशक असे स्वतंत्र व दीर्घकालीन उर्जाधोरण
    हे अत्यंत कळीचे मुद्दे आहेत.
    माझ्या ब्लोकिंग च्या प्रवासात आपली अशीच साथसोबत लाभू दे.

    उत्तर द्याहटवा
  7. दारू?
    द्राक्षासव...
    सोमरस...
    खरे तर एक औषध,
    नाहीतर वरदान म्हणा की,

    दारूकामात आम्ही तसे अशिक्षितच, पण वाटते कि प्रमाणात असेल तरच मजा आहे, तरंगायला लागले म्हणजे मुळासकट सॉरी म्हणजे बाटलीसकट उडू नयेच.

    उत्तर द्याहटवा
  8. पराग सहमत आहे.
    कोणतीही गोष्ट माफक प्रमाणात केल्यास तिचा लुफ्त घेता येतो.

    उत्तर द्याहटवा
  9. दारूपेक्षा सिगरेटचं व्यसन वाईट...परफेक्ट..:) गेली कित्येक वर्षं मी अनेक अग्निहोत्रींना हेच सांगतोय..

    उत्तर द्याहटवा
  10. जोशी साहेब
    येथे युरोपात सिगरेट एवढी महाग आहे की ५ युरो दिवसाला खुर्दा होतात.
    मी ती पीत नसल्याने महिन्याचे दीडशे असे आमचे एकूण ३०० युरो वाचतात.
    मग महिन्यातून एकदा आम्ही भटकंती करतो.
    पैसा खर्च करण्यासाठीच कमवायचा असतो, मात्र तो कशावर आणि कश्यासाठी खर्च करायचा ह्याचे निकष आयुष्यात अचूक लावावे लागतात.

    उत्तर द्याहटवा
  11. Nice articles...
    I think there also some other reason behind the being alcoholic...
    First, when we are young our friends force us to drink, if we don't then they start making laugh at we, that's the turning point of life, The guy who can handle these stuff and strictly say No to alcohol he wins,but others start taking drinks for friends and to get their company.
    I have gone through same situation, I say No and I kick out from my collage group. (Doesn't matter to me)
    Its nice to take drink occasionally but not all people have control to make strict to themselves.
    Keep writing...

    उत्तर द्याहटवा
  12. Dear Ninad.....Lot of Marathi Blogs I have read so far,but your blog is superb than any other blogs, happily to know you that, I read there word and word without monotonus, I feel quite relax while reading your all articles....Thanks.

    उत्तर द्याहटवा
  13. तुलसीदास
    तुमचे पंचतारांकित नगरीत स्वागत आहे.
    ब्लॉग नियमितपणे लिहिण्याचा प्रयत्न करेल.

    उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips