हिमवर्षाव

Blogger Tricks

शनिवार, ३० जून, २०१२

फुटबॉल वल्ड कप २०१० कलोन मंतरलेले दिवस भाग १



जर्मनी नुकताच युरोकप मधून बाहेर झाला. मात्र जोपर्यंत जर्मनी स्पर्धेत होता. तेव्हा येथे म्युनशन मध्ये भारलेले वातावरण होते. एक धुंदीत ,कैफात सर्व वावरत होते. अशी बेभान   करणारी ह्या खेळाची नशा मी २०१० च्या फुट बॉल च्या विश्वचषकाच्या वेळी मी अनुभवली होती. माझे मन मला भूतकाळातील रम्य आठवणीच्या दालनात नेत आहे. व म्हणूनच माझा त्याकाळात लिहिलेला    लिहिलेला लेख येथे अडकवत आहे..

विश्व चषक तोही फुटू बॉलचा ..माझा आणि माझ्या जर्मन पत्नी मध्ये दोन राष्ट्रात होतात तसा एक द्विपक्षीय अलिखित करार झाला आहे .फुट बॉल-च्या स्पर्धेत मी जर्मनीला पाठिंबा द्यायचा (माझा जर्मन सासरा एकेकाळचा नावाजलेला फुट बॉल पटू /कोच / रेफ्री व सध्या निवृत्तीनंतर स्वताच्या क्लब साठी काहीना काहीतरी करत असतात .) त्या बदलण्यास तिने क्रिकेट च्या विश्व चषक स्पर्धेत हिंदुस्थानला पाठिंबा द्यायचा .(आमच्या दोघांचेही हा करार करतांना  तिला क्रिकेट व मला फूटबॉल ह्या खेळा विषयी फारशी आवड नाही आहे. .)




लंडन मध्ये शिकत असताना माझा एक मित्र अचानक फुट बॉलच्या प्रेमात पडला मी मँचेस्टर युनाटेड ला पाठिंबा देतो असे उगाच जाहीर रित्या सांगत सुटायचा .मी त्याला विचारले "अरे गधड्या मँचेस्टर नक्की कुठे आहे हे तुला नीट माहितच नाही ,.उगाच काय लावले आहे.:" .त्याने काकुळतीला येऊन सांगितले. अरे येथे सगळेच फुट बॉल चा जयघोष करतात .क्रिकेट बद्दल बोलतही नाही .मग मी पण चालू झालो मी कपाळाला हात मारला .
 मी मात्र कोणी विचारले कोणत्या क्लब ला पाठिंबा देतो .तर मी चक्क सांगतो मुंबई इंडियन्स (अर्थात सचिन असे पर्यंत ) का नाही .आज कौंटी खेळणारे जगभरातील क्रिकेटर भारतात येतात .श्रींमत होतात .मागे वाचले होते त्यांच्याहून श्रीमंत फक्त अमेरिकन बास्केट बॉल च्या लीगचे खेळाडू आहेत .मुंबईकर असल्याने मला क्रिकेट आवडते .फुट बॉल नाही उगाच ओढून ताणून मला ह्यातले कळते वगैरे प्रकार मी केले नाही .कदाचित माझा हाच प्रामाणिक पण माझ्या सासऱ्याला आवडला .असो .


 तरी मी फुट बॉल चे सामने पाहायला जातो कधी सासरच्या बरोबर तर कधी बायको सोबत .कारण मला आवडते ती तेथील प्रचंड गर्दी अलोट उत्साह व सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याची शिस्तप्रिय क्रीडाप्रेमी समाज तेथे एकवटला असतो .वाद्यवृंद तसेच धमाल मस्ती व रोमहर्षक व काळजाचा ठोका चुकवणारा क्षण व त्या साक्षीने किती तरी रिचवले जाणारे बियरचे मग हे प्रत्यक्ष अनुभवण्यात लय मजा असते .सगळ्यात महत्वाचे म्हणजे क्रिकेट सारखे हे सामने प्रत्यक्ष पाहताना भले मला वाटले जर्मनी ने  जिंकावे .पण  तरी चुकून ते हरले तरी उगाच काळजाचे पाणी पाणी होत नाही.

 धमाल मस्ती करण्यात काही तास निघून जातात .(आपल्याकडे नाही का. क्रिकेट कळो न कळो चेहऱ्याला रंग रंगोटी करून अनेक लोक ड्रेसिंग रूमच्या बाजूच्या स्टँड मध्ये बसून बियर/ वाईन प्राशन करत गप्पा गोष्टी करत अधून मधून क्रिकेट पाहतात ..तसेच माझेही आहे ).


.ह्या वेळची विश्वचषक स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होती .शकिरा ताईने आग्रहाचे आमंत्रण आपल्या नृत्य व गायनातून आम्हाला दिले असले तरी प्रवास व तेथे निवास ह्याचा अवाजवी खर्च मला मला फकीरा (शशी कपूर फेम ) बनवायला कारणीभूत ठरला असता .म्हणून जर्मनीतून जर्मनीला पाठिंबा द्यायचे ठरले.


आमचे कुटुंबाकडून मौलिक माहिती अशी मिळाली की दुसऱ्या महायुद्धानंतर नाझी म्हणून शेजारी राष्ट्रातील लोक ह्यांना एवढे टोमणे मारीत की .मी जर्मन असून मला माझ्या देशाचा अभिमान आहे अशी चारचौघात सांगायची चोरी ( हे म्हणजे बहुसंख्य हिंदूंच्या देशात आम्हाला गर्व कहो म्हणायची चोरी असते ना लगेच कट्टर पंथीय असा शिक्का बसतो .) .त्यामुळे आधीच्या विश्व चषक स्पर्धेत इतर देशात कसे वातावरण असते तसा उत्साह ह्यांच्या कडे नसायच्या पण २००६ च्या वर्ड कप पासून तिने एका जर्मन ह्या नात्याने स्वताच ्या देशात झेंडे /लोकांचा उत्साह /आणि हो वूवूझेला सगळे कसे दणक्यात सुरु झाल्याचे निरीक्षण नोंदवले.


हे प्लास्टिक चे पिपाणी सदृश जर्मन वाद्य आहे. ते वाजवण्याची एक खास पद्धत आहे. आपल्या तुतारी सारखा त्यासाठी श्वास लावावा लागतो. बाटगा अधिक कट्टर असतो. ह्या तात्यारावांच्या उक्ती नुसार मी जर्मनीत आता बस्तान बसविल्याने अर्ध्या हळकूंडाने पिवळा होऊन त्याकाळात नुसता हैदोस मांडला होता. माझा उत्साह शेंपेन च्या फेसासारखा फसफसत होता.
व ह्या वेळी तर कहर होता ,मंदीमुळे आलेले नैराश्याचे मळभ दूर करण्यासाठी ह्यांचे सरकारच जर्मन फुट बॉल संघाची ह्यावेळी जिंकणार म्हणून हवा तापवत होते.

ह्यावेळच्या युरो कपची अशीच एक गोंडस जाहिरात


हळू हळू स्पर्धा जशी पुढे सरकत होती .तसा येथे क्रीडा ज्वर चढत होता .मंदीच्या काळात परत दुकानात गर्दी सुरू झाली होती .आम्ही पण सर्वात प्रथम जर्मन झेंडा विकत आणला. .घराबाहेर खिडकीत जसे दिवाळीला आकाश कंदील असतो .तसे जर्मन झेंड्याचे मोठे कापड आम्ही लावले होते .आमचा सर्व परिसरातील खिडक्या सजवल्या होत्या .बाकी दोन मोठे झेंडे पाठीवर सुपर मेन बांधतो तसे बांधायला घेतले होते .


त्यामुळे सगळे जर्मनी हे जर्मन झेंड्यात दिसत होते .त्यांच्या अस्मितेचे जाज्वल्य प्रतीक गरुड सर्वत्र आपला दरारा पसरवत होता ,मी त्याला मनोमन नमस्कार केला (आपल्या विष्णूचे वाहन नाही का ) बायकोने विष्णू कोण? तर ब्रम्ह विष्णू महेश ह्याची आख्यायिका थोडक्यात इंग्रजीत समजून सांगितली .(आमचे संवाद इंग्रजीत चालतात ) मी जातिवंत परप्रांतीय .म्हणून शिकू जर्मन भाषा आरामात असा खाक्या होता-



 .आपल्या देशाला आपण भारत माता म्हणतो म्हणून आपला राष्ट्रध्वज बाळगण्यासाठी आपल्या देशात कठोर नियमावली आहे .ह्या उलट पाश्चात्त्य देशात हे निर्बंध शिथिल आहेत .अगदी अंत वस्त्रे सुद्धा ते राष्ट्र ध्वजा ची करतात.

आर्य कन्या  येथे मोठ्या प्रमाणत आल्या होत्या. पण बहुतांशी आपल्या लाडक्या खेळाडूंना पाहण्यास आल्या असाव्यात. अर्थात हे माझे मत नाही., मी फक्त निरीक्षण नोंदवले.


 आपल्या झेंड्या प्रमाणे त्यांचा सुद्धा झेंडा ३ रंगाचा आहे .वरती काळा मध्ये लाल व खाली पिवळा कधी कधी त्यांच्या झेंड्यावर आपण जसे अशोकचक्र ठेवले आहे तसे पंख पसरलेला गरुड हि असतो .बाकी हातात व डोक्याला लावण्यासाठी बेंड असो वा शिट्या किंवा वूवूझेला हि सर्व सामग्री झेंड्याच्या रंगांत रंगून गेली होती .झेंड्याचे ३ रंग असणारे मार्कर सुद्धा घेतले होते
.जेणेकरून ते मार्कर कपाळावर व गालावर लावून झेंड्याच्या आकार निर्माण झाला होता.

त्या रोमहर्षक क्षणाची चित्रफीत (  आता ह्यात मी ती शिट्टी कर्कश का वाजवत आहे अशी विचारणा करू नका कारण खूप दिवसांनी ती माझ्या तोंडात आली होती. )








६ टिप्पण्या :

  1. काहीही असो, काल परवापासून हवेतल्या ऑक्सिजन चे प्रमाण खूप कमी झाले असे वाटतेय. एकदमच सगळीकडे निरुत्साह ...

    मला तर उद्याची अंतिम मेंच झाल्याशिवाय आराम नाहीये.

    लेख तर एकदम झकास!. बाकी शकिरा आणि फकिरा चे यमक आणि कल्पना विलास आवडला.
    आणि विष्णू तर एकदम महान कधी वामनावतार, तर कधी रामावतार आणि कधी काळी तर वराहावतार सुद्धा? आपल्याला तर सगळेच वंद्य...
    पुराणातली वांगी पुराणात, चल तर मग, शुभरात्री, कारण...उद्या च्या फायनल ची तयारी करायची आहे ना..

    उत्तर द्याहटवा
  2. प्रत्युत्तरे
    1. लेट्स गो . वी हेव टू विन ग्रुप असे काहीसे भाषांतर होऊ शकते.
      आपल्याकडील काही म्हणी किंवा बोलण्याची पद्धत असते जिचा शब्दशः अर्थ आपण दुसर्या भाषेत नाही केऊ शकत जसे
      मराठीत सचिन ने काल शोहेब ला कसला चोपला आहे.
      अर्थात येथे आपण फलंदाजीच्या बद्दल बोलत आहोत मात्र शब्दशः त्याचे भाषांतर
      कठीण असते.

      हटवा
  3. आता काय फायनल नी कसले काय
    आम्ही स्पर्धेबाहेर गेलो आणि अचानक आमच्या अवतीभवती फुटबॉल विषयी चर्चा थांबली.
    आपल्याकडे पानवाला ते दुधवाला भय्या सुद्धा भारताने सामना हरल्यावर धोनी ने नेमका कोणता चुकीचा निर्णय कोणत्या वेळी घेतला व सचिन ने कोणता फटका कसा मारायला हवा होता ह्यावर ठाम मत मांडतो.
    गल्लो गल्ली पराभवावर जाहीर चर्चा ,वाद ,आणि बरेचकाही घडते.
    येथे मात्र ,..
    असो

    उत्तर द्याहटवा
  4. सुंदर लेख छान भाषा शैली ,बाकी स्थानिक भाषा शिकण्यास परप्रांतीयांचा निरुत्साह हा टोला झकासच .

    उत्तर द्याहटवा
  5. विजयजी
    पण येथे मी इंग्रजीतून खुपदा बोललो तरी उत्तर जर्मनीतून देतात.
    आपल्या भाषेविषयी अभिमान पाहून मला सुद्धा माझ्या भाषेविषयी भावना अधिक प्रखर झाल्यात. म्हणून हा ब्लॉग मराठीत लिहिला आहे.
    मराठीशी माझे नाते टिकवण्याचा एकमेव उपाय माझ्या पुरता म्हणजे मायमराठीत लेखन व विचारांचे आदानप्रदान जेणेकरून ह्या निमित्ताने जगभरातील मराठी बांधवांशी माझे नाते जोडल्या जाईल.
    आपली आणि माझी ह्या नेट वर भेट होणे हि श्रींची इच्छा असे मी मानतो.

    उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips