भारत दौरा करून आता ४ महिन्याहून जास्त काळ लोटला पण अजून दोन आठवडे केलेल्या मनसोक्त भटकंतीच्या रम्य आठवणी मनात रुंजी घालत आहेत. प्रत्येक वेळी भारतात येणे हे मी सहसा एखाद्या चुलत, मावस भावांचे लग्न ठरले की ठरवतो. ह्यामुळे बहुसंख्य नातेवाईकांना एकाच वेळी भेटता येते. एरवी अश्या अनेक आप्त परकीयांच्या लग्नात येणे जमत नाही. मग फेसबुक वर त्यांच्या फोटोवर आपल्या प्रतिक्रिया देणे व आपण हुकलेले क्षण ह्या आभासी जगतातील आभासी दुनियेत पहाणे, उपभोगणे एवढेच माझ्या हाती उरते
.
दुसरा प्रमुख हेतू म्हणजे भारत दर्शन. परदेशात पंचतारांकित हॉटेलात माझ्या कामानिमित्त मला अनेक पर्यटन मी भारतीय आहे हे कळल्यावर त्यांच्या भारत सहलीची रसभरित गाथा ऐकवत. व मी अजून भारतीय असून ताजमहाल पहिला नाही.ह्या बद्दल कुहुतल वजा कीव करत. . वयाची २३ वर्षे भारतात होतो तेव्हा आमचे पर्यटन हे शाळेच्या सहली किंवा नातेवाईकांची लग्ने किंवा महाराष्ट्रातील जवळपासच्या राज्या पर्यंत मर्यादित होते. त्यामुळे ठरवून समग्र भारत दर्शन करायचे मी ठरवले होते.. लग्नानंतर मधुचंद्रासाठी आम्ही देवाची भूमी केरळात जाऊन आलो. तेथील रम्य समुद्र किनारे ,निसर्ग ,हाऊस बोट ,खाद्य संस्कृती ,आयुर्वेद व त्यांचा पर्यटनातून सुयोग्य वापर ह्यामुळे माझी पत्नी भारताच्या प्रेमात पडली.
. जर्मनीत गेल्यावर आपल्या मूठभर नातेवाईकात ह्या सफारीचे रसभरित वर्णन केले.म्हणून ह्यावेळी तिची धाकटी बहीण सुद्धा आमच्यासोबत येणार होती. . ह्या मोहिमेचे पडघम मोहिमेच्या सहा महिन्यापूर्वी वाजायला सुरुवात झाली. सरत शेवटी एखाद्या टूर चे पॅकेज घेण्यापेक्षा आपण स्वतः ची खाजगी टूर आखायची व एखाद्या टूर कंपनीला ती व्यवस्थित आखायला द्यायची असे ठरले. ठाण्यातील मराठी टूर कंपनी क्रॉस वल्ड ह्यांच्याशी अनेक सल्लामसलत झाल्यावर उदयपूर ,जोधपुर कनकपुर , मनवर केम्प ,जयपूर , अजमेर व पुष्कर , रणथंबोर , आग्रा व मग दिल्ली ते मुंबई असा भरगच्च कार्यक्रम आखला.मुंबई ते उदयपूर विमान प्रवास मग चारचाकी वाहनाने भटकंती करत दिल्ली व तेथून मुंबई विमानाने गाठायची असा बेत होता. सोबत आईबाबा सुद्धा होते. ह्या दोन आठवड्यांच्या भटकंतीत भारताच्या विराट व अर्वाचीन संस्कृतींचे दर्शन घडले. आम्ही सारेच इतिहासाचा भव्य कालखंडाचे ओझरते दर्शन पाहून मंत्रमुग्ध झालो. तोच अनुभव मोजक्या शब्दात सचित्र मांडायचे ठरवले आहे.
"केल्याने पर्यटन" असे म्हटलेच आहे. हॉटेल व्यवस्थापनाला पर्यटनाची जोड देत आम्ही आमचे शिक्षणाचे अवतार कार्य समाप्त केले. अंगभूत असलेली पर्यटनाची आवडीला आता व्यावसायिक परिमाण लाभले. भारत जगात पर्यटनास अव्वल स्थान मिळवू शकतो हे माझे ठाम मत आहे. भारताची भौगोलिक संरचना ही जणू जगाचे प्रतिनिधित्व करते. मयोका किंवा करीबियन किंवा जगातील इतर प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यासारखं किनारे आपल्याकडे गोवा व केरळ येथे आहेत. उत्कृष्ट सागरी खाद्ये व मदहोश करणारे वातावरण आणि प्रत्येक राज्यातील समुद्र किनाऱ्यावरील स्थानिक संस्कृती जसे केरळात उपलब्ध असणारे आयुर्वेद तर गोव्यातील पोर्तुगीज स्थापत्य शैली , आखात ाच्या किंवा सहारा च्या डेझर्ट सारखे आपले राजस्थानी डेझर्ट त्याला लाभलेले राजस्थानी राजवाडे आणि किल्ले. स्विस च्या निसर्ग सौंदर्याला काश्मीर तर त्यांच्या आल्प ला आपला हिमालय असे अनेक दर्जेदार पर्याय आहेत. पण काश्मिरात मिळणारे दर्जेदार गालीचे , केशर , रुचकर जेवण आणि हिमालयातील उत्तुंग गिरी शिखरे , ह्यामुळे जगभरातून पर्यटक येथे येऊ शकतात.
परदेशातील इतके राजवाडे व किल्ले पहिले पण भारतातील भव्य दिव्य राजवाड्याची येथे सर नाही. जेव्हा जेव्हा भारतात येतो तेव्हा त्या निमित्ताने नेहमीच मी व केट भारतातील एखाद्या राज्यात सहलीला जातो. तिच्यासाठी एक सर्वस्वी नवे जग तर मला माझा देश नव्याने उमजते.मागच्या वेळी केरळ ला जाऊन आल्यावर ह्यावेळी. आम्हाला ५ जणांना राजस्थान टूर करायची होती. वाजवी दरात जास्ती-जास्त पर्यटन करायचा मनसुबा होता. म्हणून आम्ही सहा महि न्या अगोदर ह्या प्रवासाची आखणी केली होती. विमान प्रवास स्वस्त हवा असेल तर आगाऊ बुकींग करणे गरजेचे होते. आमचे भारतातील वास्तव्य दोन आठवड्यांचे होते.
तेव्हा एखाद्या प्रख्यात प्रवासी कंपन्यांकडून आधीच आयोजित केलेली टूर करणे आम्हाला जमणे शक्य नव्हते. तेव्हा आमच्या साठी सर्वोत्तम पर्याय स्वतः साठी खाजगी टूर स्वतः आयोजित करणे हा होता. त्या नंतर आंजा वर विपुल संशोधन करून अनेक टूर कंपन्यातून काही कंपन्या शॉर्ट लिस्ट केल्या.
ज्यांच्या कडे ४ दिवस ते १ आठवडा ते दोन आठवडे अश्या कालखंडात तुम्हाला तुमच्या सोयीने टूर आखून देतात. ह्या टूर चा फॉरमॅट हा त्यांच्या साईट वर आधीच दिला असतो. म्हणजे उदा आमची टूर १० दिवसांची होती. ह्यात कोणत्या शहरात कोणती स्थळे पाहणार व कोणत्या हॉटेलात उतरणार ह्याची पूर्व कल्पना असते. आमची टूर मुंबई ते दिल्ली हा विमान प्रवास त्यांच्या नंतर इनोवा गाडीतून त्यांचा ड्राइवर आम्हाला हिंडवून शेवटचा टप्पा उदयपूर येथे सोडून तेथून विमानाने मुंबई गाठायचा होता. आम्हाला मुंबईत ते दिल्ली आणि मग उदयपूर ते मुंबई असा विमानप्रवास होता. पण आजांवर शोधल्यावर उदयपूर ते मुंबई प्रवास महाग पडत होता, म्हणून आम्ही टूर कंपनीला विनंती करून आमची टूर उदयपूर येथे सुरु करून शेवटी दिल्ली ते मुंबई असा प्रवास केला. म्हणजे उलट प्रवास केला. एकूण टूर चे बजेट हे तुम्ही कोणत्या सिझन ला जाणार ह्यावर अवलंबून असते. आम्ही हिवाळा हा ऑफ सिझन निवडल्याचे आणि ६ महिने आधी बुकींग केल्याने आम्हाला हॉटेलचे रेट व पर्यायाने टूर अत्यंत स्वस्तात पडली.
ह्या टूर चे वैशिष्ट्य म्हणजे गाडी आणि वाहनचालक २४ तास आमच्या सोबत होता. त्यांची खायची आणि प्यायची सोय केल्याने तो आम्हाला सहलीचा कार्यक्रम फिरवून आणायचा पण शहरात जर बाजारहाट किंवा उदरभरण करायचे असेल तरी फिरवून आणायचा. दिवस भर एखाद्या शहरात काय काय पहायचे हे आधीच ठरले होते. त्यामुळे ते कधी आणि कितीवेळ पहायचे हे आम्ही ठरवू शकत होतो. नियोजित सहलींमध्ये टूर लिडर च्या मर्जीवर सगळे अवलंबून असते. हॉटेलात सकाळची न्याहारी मोफत होती. मात्र नंतरचे जेवण स्वखर्चाने होते. ह्यामुळे आम्हाला स्थानिक शहरातील प्रसिद्ध खाद्य पदार्थ त्या ठिकाणच्या प्रसिद्ध ठिकाणी खाण्याचे भाग्य लाभले. मात्र दोन शहरामधील अंतर किमान ५ तास ते १० तास होते. तेव्हा दिवसाआड एवढा प्रवास घडवायचा. पण राजस्थान चे महामार्ग सुस्थित असल्याने तो बऱ्यापैकी घडला. येथे १० तासाच्या प्रवासात खूपदा मुश्किलीने काही चांगली हॉटेल दिसायची. आम्हाला मग कळले कि आमच्या वाहन चालकाचा एखाद्या विशिष्ट हॉटेलात खाचा असल्याने तो आम्हाला ते स्थान सुचवायचा. मात्र एकदा सुमार चवीचे महागडे अन्न खाऊन आम्ही धडा शिकलो. व आम्हाला हवे तेच हॉटेल आम्ही निवडू लागलो. पण प्रवासात कोरडा खाऊ किंवा टिकणाऱ्या पूरण पोळ्या किंवा चिवडा असे बरोबर जरूर न्यावे. असा सल्ला देऊ इच्छितो. कोणतीही प्रसिद्ध टूर कंपनी अश्या प्रकारच्या खाजगी टूर आयोजित करते. तेव्हा आपल्याला हवी ती आपण निवडायची त्यात हवे ते बदल करून घ्यायचे. सरत शेवटी आम्ही ठाण्यातील घाणेकर ह्यांच्या टूर कंपनीची जी टूर निवडली ती हि
केल्याने पर्यटन, दास्तान ए हिंदुस्तान
( राजस्थान दौरा तर सादर होत आहे टुर टुर ( दास्ताने राजस्थान एक शाही अनुभव )
कलाकार
( निनाद ह्या टुर चा आयोजक.टुर लीडर ,अष्टपैलू चतुरस्र , बहुरंगी , बहुढंगी , हजरजबाबी , इनोदी व्यक्तिमत्व ,आता आवरते घेतो,
. व इतर सदस्याचे सामाजिक , सांस्कृतिक , आर्थिक, राजकीय , व कोणत्याही विषयावर प्रश्नाच्या भडीमाराला लीलया तोंड देणारा अवलिया
( केट निनाद ह्यांचे एकुलते एक कुटुंबं ज्यांनी हि टुर व्हावी हि तर श्री ची ( इच्छा ह्याच हेतूने निनाद ह्यांच्या डोक्याचे भजे केले)
( केरोलीन जगातील सर्वात मोठी लोकशाही , काम सूत्र ,योगा ,आयुर्वेद ते (थेट आयटी म्हणजे भारत ह्या संकल्पनेची व्याप्ती वाढवत इंक्रेडीटेबल इंडिया (,म्हणजेच अतुलनीय भारत ह्या भारतीय पर्यटन खात्याने जर्मनीत केलेल्या (जाहिरातीला फशी पडलेली एक अबला आमची मेहुणी )
( सौ , मंदा , केट ची सासू , आपल्या मुलासोबत व सुनेसोबत १२ दिवस एकत्र भटकायला मिळत आहे. मुंबईतील रोजच्या दैनंदिन जीवनातील धकाधकी ला फाटा देत , आपल्या बी ए इन इंग्लिश लिटरेचर ह्या एकेकाळी मिळवलेल्या पदवीची बूज राखत सरकारी नोकरीत जेवढे बोलतात तेवढे इंग्रजी बोलत आमच्या कंपूतले सर्वात बडबडे व्यक्तिमत्व )
( श्रीयुत सुहास , सौ मंदा ह्यांच्या सहली विषयी असलेल्या हेतूशी साधर्म्य असलेले शांत , सुस्वभावी व वेळप्रसंगी व सध्या आपल्या निवृत्त आयुष्यात शिकलेल्या तुटपुंज्या जर्मन भाषेत सुनेशी व आलेल्या पाहुणी शी गप्पा मारणारे शांत ,सुस्वभावी व्यक्तिमत्व )
भ्रमंती करणे म्हणजे आपल्या नेहमीच्या कूपमंडूक जगातून बाहेर येऊन जगातील विशाल अथांग समुद्रात भेटणारी कलंदर व्यक्तिमत्व व अनुभव हे आपले अनुभव विश्व तर समृद्ध करतेच पण आपल्या वैचारिक कक्षा वाढवते आपल्या जाणिवा प्रगल्भ होतात.म्हणून प्रवास करावा असे मला नेहमीच मनापासून वाटते. माझ्या
तर आमची टुर निघाली. त्यात आलेले विलक्षण , विलोभनीय , अतुलनीय , प्रेक्षणीय , मधाळ , तर काही कटू अनुभवा सह पेश हे टुर टुर
राजस्थान चे राजेशाही प्रासाद पहिल्यापासून केट ला युरोपातील प्रासाद अगदीच पानीकम वाटतात.
उत्तर द्याहटवापाहण्यासारखे आहे राजस्थान
आहेच आपला भारत ह्याबाबतीत अतुल्य !
हटवाइतकी विविधता आणि सौंदर्य जगात कुठे पाहायला मिळणार नाही.
पण एक प्रश्न नेहमीच सतावतो तो म्हणजे ते टिकवण्याचा !
सौरभ अगदी माझ्या मनातले बोलला
हटवासरकारी अनास्था असल्यामुळे पर्यटन शेत्रात बड्या कंपन्या पैसे गुंतवत नाही.
येथे पैसा गुंतवणे म्हणजे पर्यटन स्थळाचा विकास त्याच्या बाजूला दळण वळणाची साधने व मुलभूत पायाभूत सुविधा विकसित करणे आवश्यक आहे.
जाहिरात सध्या भारत प्रशासन करत आहे अतुल्य भारत पण तिचा भर फक्त श्रीमंत राष्ट्रातील लोकांना पंचतारांकित हॉटेलात उतरवून भारत दाखवणे असा होतो.
आज आशिया व दक्षिण अमेरिका व आफ्रिकेतील अरब देश येथे बॉलीवूड ,योग किंवा आयुर्वेद ह्यामुळे भारताविषयी आकर्षण आहे व त्यांना भारत पहायचा आहे पण खर्च परवडत नाही , भारतात स्वस्त नि मस्त मोटेल अमेरिकन च्या धर्तीवर विकसित केली पाहिजे ( तेथील मोटेल व्यवसाय आपल्या पटेल लोकांच्या ताब्यात आहे
आणि बरेच उपक्रम राबविता येतील पण सरकारी लाल फितीचा कारभार आडवा येतो .
महागड्या व सुमार दर्जाच्या हॉटेलवर नेल्यामुळे माझे ड्रायवर शी भांडण झाले. आम्ही सांगितलेल्या हॉटेलवर ने असे सांगितले असता तिकडे जेवलात तर जुलाब वगैरेचा त्रास होईल असे सांगून घाबरवायचा प्रयत्न केला. मी म्हटलं मी तिकडेच जेवेन आणि झाले जुलाब तर मी बघून घेईल . रस्त्यावरचा ढाबा होता तो. प्रवासातले सर्वात मस्त व वाजवी दरातले जेवण होते ते.
उत्तर द्याहटवासाधक
हटवातुमच्या सारखाच अनुभव मला सुद्धा आला हे मी नमूद केलेच आहे.
खाचा म्हणजे कमिशन चे पर्यटन व्यवसायातील पर्यायी शब्द.
ह्या वाहनचालकांना अत्यंत कमी पैशात त्यांचे मालक राबवून घेतात.
त्यांच्या निवासाची ,राहण्याची विशेष काहीच सोय करत नाहीत. मग पर्यटकांकडून ते ही मुंबई किंवा बड्या शहरांच्या
जमेल तेवढा पैसा ते उकळायला निमित्त शोधतात.
ह्यासाठी ज्या ठिकाणी प्रवास करायचा त्या ठिकाणाची माहिती नेट वरून आधीच काढून
घ्यावी.
व भ्रमण ध्वनींमधून नेट उपलब्ध असेल तर मग दुधात साखर.
माझ्या प्रवासवर्णनात मी माझे सर्व अनुभव म्हणूनच तपशील वार देत आहेत.
पुढच्यास ठेस, मागचा शहाणा.
'राज'स्थान नावातच बरेच काही आले आहे. खरे तर दक्षिण-उत्तर भाग हा परकियांच्या खूपच जवळ आणि बरीच शतके आक्रमणे परतवत, झेलत आणि लढत राहिला. ती खरे तर एक अभेद्य सरंक्षक भिंतच होती...पराक्रमी महाराणा, झुंझार मनोवृत्ती तरीही, निगर्वी आणि खूप आदरातीथ्याशील संस्कृती समृद्ध होती. परंतु एकदा पाडाव झाल्यावर सगळेच हळूहळू मांडलिक झालेत..अजूनही त्यातले ऐश्वर्य फारच थोडेफार शिल्लक राहिले तरी तरीही खूपच समाधान यात आहे तेव्हढेही अचंबित करणारे आणि अभिमानाने उर भरून आणणारे आहे.
उत्तर द्याहटवाटूरटूर ची कल्पना अफलातून.- आवडली.
अष्टपैलू चतुरस्र , बहुरंगी , बहुढंगी , हजरजबाबी , इनोदी, -एकदम चपखल.
आणि प्रवासात सावध राहणे नेहमीच चांगले. हॉटेल व्यवस्थापनात पारंगत असल्यामुळे, तुला तर खूपच आतल्या 'खाचा'खोचा चांगल्याच सहजपणे उमजत असतील.
अजून एक म्हणजे, चोखी-दाणी ठिकठिकाणी स्थापन करून, ह्या राजस्थानची मिनी-ट्रेलर ची सोय वेगवेगळ्या शहरात उपलब्ध करून दिली आहे...त्यामुळे एक झलक तरी मिळते.
लेख आवडला मित्रा. खूपच छान!.
पराग चोखीदानी ला आम्ही भेट देऊन आलो.
उत्तर द्याहटवाकेट व केरोलीन ला भयंकर आवडले.( सचित्र अहवाल पुढे देईलच )
जयपूर ला जाणार तर ह्या ठिकाणाला भेट दिलीच पाहिजे असे आग्रहाचे सल्ले माझी आप्त स्वकीयांकडून मला मिळाले होते.
आमच्या मातोश्री ने लगेच अपडेट्स पुरवले की अश्याच धर्तीवर एक गाव कोल्हापूर जवळ स्थापन केले आहे. पाहुया कधी इथे जाण्याचा योग येतो ते.
निनाद,
उत्तर द्याहटवालेख आवडला...US वरुन परत आल्यावर मी आणि माझ्या अहोँनी देखील भारत पर्यटनाचा चंग बांधला...कारण कामानिमित्त बरीचशी भारताबाहेरील ठिकाण पाहिल्यानंतर आपण आपलाच देश नीट पहिला नाही ह्याची खंत वाटत होती. अहो काश्मीर, राजस्थान ,दिल्लीच काय साधा महाबळेश्वर सुद्धा आम्ही पहिलेल न्हवत...म्हणून भारतात आल्या आल्या सुरूवात केली...गेल्या एका वर्षात लोणावळा, खंडाळा, कोकण, नाशिक, शिर्डी ही महाराष्ट्रातली तर दिल्ली, आग्रा(ताज) ही ठिकाण पाहिली आणि येत्या काही महिन्यात-जयपूर, उदयपूर, जैसलमेर, कुंभारगढ,नवलगढ करण्याची योजना आखात आहोत. तेव्हा तुम्हाला राजस्थानचे आलेले सुखद अनुभव आम्हालाही अनुभवायला मिळतील अशी आशा आहे. आणि भारतामधे उत्तमौत्तम पर्यटनाच्या बर्याच संध्या असून केवळ प्रशासनाच्या उदासिनतेमुळे आपण बरेच मागे पडतोय या गोष्टीची अगदी सहमत आहे.
तृप्ती
तृप्ती तुझ्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
उत्तर द्याहटवामध्यंतरी कार्यबाहुल्यामुळे लिखाणात खंड पडला होता ,माझे अनुभव नक्कीच शेअर करेन.