हिमवर्षाव

Blogger Tricks

सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१२

आमची ओमा

जर्मनी दुसऱ्या महायुद्धानंतर दोन भागात विभागला केला .भांडवलदार पाश्चिमात्य ज्या पैकी फ्रांस व अमेरिकेने वेस्ट जर्मनीचा विकासाचा मक्ता घेतला .जर्मन नवीन पिढीला इतिहास व भांडवलशाही आपल्या पद्घतीने शिकवली.तर पूर्व जर्मनी साम्यवादी रशियाच्या ताब्यात आला . दोघांची बर्लिन येथे भिंत उभी करून ह्या देशाची फाळणी केली .एकि कडे मुक्त व्यापार व्यवस्था /लोकशाही व विकासाच्या मार्फत अमेरिकेतून जन्माला आलेला चंगळवाद होता .व दुसरीकडे पूर्व जर्मनीत रशियन आदर्शवाद / साम्यवादी विचारसरणी व सरकारी व्यवस्थेने पूर्ण कब्जा केलेले लोकांचे जीवन होते .आजही एकसंध झाल्यावर त्यांच्यातील मुल्ये व जीवन पद्धती वेगळ्या असल्याने भौगोलिक दृष्ट्या जरी एक आले असले तरी त्यांचे मनोमिलन अजून झाले नाही आहे .
.एखादा पूर्वेचे जुने खोड येथे अजूनही साम्यवाद /नैतिकता /आदर्शवाद /मूल्ये थोडक्यात मार्क वादाचे गोडवे गातो .त्यावर वेस्ट जर्मनीची लोक अगदी माझी बायको सुद्धा मग त्यांना सुनावते" येवढा पुळका आहे, तर मग जा परत पूर्व जर्मनीत". अर्थात हा प्रांत अजूनही आपल्या बिमारू राज्यांसारखा काही प्रमाणात आहे .पण तिथे आता विकासाचे वारे वाहू लागले आहेत .भारताच्या आय टी व इतर कंपन्या तेथे गुंतवणूक करत आहेत .आपल्या महाराष्ट्र राज्याने त्यांच्या एन आर डब्लू ह्या राज्याची करार केला आहे .त्या राज्याची राजधानी कलोन हिला युरोपची सिलिकॉन व्याली बनविण्याचा विडा आपल्या राज्याने घेतला आहे .पुण्याच्या बाबा कल्याणी ह्यांची व इतर अनेक कंपन्या येथे तळ ठोकून आहेत .थोडक्यात काय आपली भारतीय कॉलर ताठ होती 

.जर्मनीत अनिता बोस ( सुभाष चंद्र बोस ह्यांच्या जर्मन बायकोची एकमेव कन्या ). ह्यांना भेटण्याचा मानस आहे .पाहूयाच कधी योग येतो ते .   रोबोट हा तामिळ भाषेत जर्मनीत ४० ठिकाणी लागला होता .तो पाहायला प्रत्यक्ष थिएतर मध्ये गेलो .आम्ही तो पाहणार म्हणून खास माझ्या हॉटेल मधील तमीळ( निर्वासित) कलीग ने खास काही तास रांगेत उभी राहून आमच्या साठी तिकीट काढली होती . अर्थात स्वतासाठी पण (तो तिसऱ्यांदा सिनेमा पहात होता. )ह्या सिनेमाची भाषा आम्हाला परकीय होती .पण माझी पत्नी केट ला काही एवढा हा सिनेमा आवडला नाही .शाहरुख ची सर नाही. अशी मताची एक पिंक आमच्या कुटुंबाने टाकली .. पण मी तिला तिथे नेले होते ते भारतीय खास करून दाक्षिणात्य पंखे दाखविण्यासाठी जे बेभान होऊन शिट्या .आरोळ्या व फोटो काढत होते,.येथे सिनेमागृहात फोटो काढायला साहजिकच बंदी आहे .पण रजनी भक्त मात्र त्याची छबी टिपण्यासाठी खुशाल आपल्या खुर्चीवर चढून आपला कार्यभाग सिद्धीस नेत होते .

 केट च्या ओमा म्हणजे आजीचा वाढदिवस जवळ आल्याने तिच्या वाढ दिवसानिम्मित आम्हाला येत येईल का? अशी चाचपणी अनिताने( माझी सासूने ) केट कडे करून पहिली .वाढ दिवस हा रविवारी आल्यामुळे आम्ही लगेच होकार दिला .माहेरी जायला मिळणार म्हणून बाईसाहेब खुशीत होत्या .आपल्या आई वडलांना भेटण्याचा आनंद पाहून मी विचारले .एवढे आवडतात तुला तुझे पालक. तर त्याच्या जवळच्या एका शहरात स्थलांतरित होवुया .म्हणजे तुमच्या नित्य गाठी भेटी होत राहतील ..ह्यावर बाईसाहेब म्हणाल्या हेच मला नको आहे .माझ्या संसारात मला आपल्या व्यतिरिक्त अजून कोणाचीही दखल चालणार नाही . मला आपल्या घरात त्यांनी व इतरांनी पाहुणे म्हणूनच आलेले आवडेल . .मी तिला ह्यावर आमच्या मराठीत दुरून डोंगर साजरे हि म्हण सुनावली. अश्या म्हणी मी तिला सारख्या सुनावतच असतो .मागे मुंबई मुक्कामी तिने माझ्या नातेवाईकांना बॉलिवूड मध्ये कोणत्याही प्रसंगाला गाणे व मराठीत कोणत्याही प्रसंगाला म्हणी असतात. असे विधान करून भर उन्हाळ्यात सर्वाना गार केले होते.

. तिचे आई वडील स्टूट गार्ड जवळ रैन सबन ह्या टुमदार गावात राहतात ..अर्थात हे पाश्चिमात्य गाव असल्याने येथे शहरात असणाऱ्या सर्व सुखसोयी . शेजारच्या गावात ५०० किशोर वयीन तरूणाईला नाईट क्लब देखील होता . अर्थात हे क्लब त्याच्या गावापासून दूर माळरानावर असल्याने गावाच्या शांततेत विघ्न येत नाही ."च्यायला आम्हीच तेवढे कर्म दरिद्री ,( पब सोडा पण दहावीच्या शालांत परीक्षा नामक यज्ञकुंडात आमच्या तारुण्य सुलभ भावना स्वाहा झाल्या होत्या .)" .कोणत्याही गावात अपेक्षित अशी शांतता कोणत्याही चोप्रा /जोहर सिनेमात दिसणारी रम्य हिरवळ गर्द वनराई व राज ठाकरे ह्यांना अपेक्षित असा जीन्स घालून यात्रिक शेती करणारा शेतकरी असे मनोहर दृश्य होते ..येथे हवामानाची साथ नसल्याने काही महिने निसर्ग व मान्सून ह्यावर न अवलंबून हा जर्मन शेतकरी यंत्रांच्या सहाय्याने शेकडो एकर जमिनीत बटाटे व आदी गोष्टीचे उत्पादन लीलया काढतो .हे पाहतांना मला विदर्भातील शेतकरी आठवला .आय मीन त्यांच्या कडे जर्मन वाहिनीवर एक लघु पट दाखवला. त्यात एक पत्रकार भारताच्या खेड्यापाड्यातून भारत हिंडून भारत दर्शन करत होता .( भारतावर येथे खंडीभर कायर्क्रम दाखवत असतात .).माझ्या शायनिंग इंडियाचे म्हणजे प्रचाराचे त्या दिवशी पितळ उघडे पडले. .स्वत अन्न पिकवून हा बळीराजा स्वत उपाशी कसा ? असा प्रश्न सासू सासरे ह्यांनी मला विचारला अर्थात ह्याचे उत्तर माझ्यापाशी नव्हते.

ओमा आपल्या अविवाहित मुलीसोबत म्हणजे केट च्या मावशीसह  शेजारच्या गावात सरकारी घरात राहतात. .अर्थात ते घर त्यांना सरकारने त्यांच्या पतीने दुसर्या महायुद्धात रशियात शहीद होऊन हिम निद्रा घेतली त्या बद्ल्यात दिले होते. आपण सुद्धा कारगिल शहीदांसाठी आदर्श व्यवस्था नाही का केली ? आजीने ह्या दोन मुली व एक मुलगा असा परिवार वाढवला .थोडक्यात केट ला एक मामा व मावशी आहे अर्थात आपल्या एवढी शब्द संपत्ती त्यांच्या जवळ नसल्याने अंकल व आंटी ह्यावर बोळवण करावी लागते .आजीच्या घरी गेलो. तेव्हा म्हातारपणी घराची निगा नीट राखता येत नसल्याचे आढळले .अर्थत तिचा व तिच्या मुलीचा अर्ध्याहून अधिक वेळ तिच्या कोंबड्या बदके / नि जुना सोबती रुबी हा माझ्याहून उंच घोडा व एक श्वान ह्यांच्या साठी खर्ची होतो .अनिताकडे ताजी अंडी नियमित येतात .गंमत म्हणजे म्हातारपणी एकटेपणाच्या जाणिवेने म्हणा कि अजून कशाने म्हातारीला ह्या प्राण्याचा अतोनात लळा लागला आहे .एवढा कि ति आता कोबंड्या किंवा बदके जिभेच्या चोचाल्यासाठी उदर भरणासाठी मारत नाही .तर त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यावर दफनविधी करते 

 ..पूर्वी शर्यतीसाठी घोड्याचे ब्रीडिंग हा त्यांचा प्रमुख व्यवसाय होता .अनेक शर्यतींसाठी घोडे पोहचवण्यासाठी छोटी केट स्वत आजी आणि मामा सोबत गाडीतून जायची .रुबीने तरुण वयात अनेक शर्यती गाजवल्या होत्या .त्याच्या पाठीवर केट व तिची बहिण खेळली होती .अर्थात उतार वयातही तो विलक्षण देखणा दिसत होता .वाढ दिवाच्या निम्मित आजी एकदम नटली होती. .आम्ही सगळे आजीच्या आवडत्या उपाहारगृहात जेवायला आलो .७० रीची आजी वयाच्या ५ पासून येथे येत होती .उपहारगृहाची मालकीण आजी पेक्षा १ वयाने मोठी पण एकाच शाळेतील असल्याने त्यांची व तमाम काम करणाऱ्या इमानी नोकर मंडळी जी उपहार गृहाच्या परिवाराचे सदस्य होते ते आजीच्या परिचयाचे होते. .आजी म्हणाली शेत कामाव्यतिरिक्त तिच्या वडिलांना शिकारीचा छंद होता व लहान वयापासून आजी त्यांच्या सोबत असायची .पान कोबड्या .ससे ह्याची शिकार ते करायचे पण कधी जर शिकार मिळाली नाही तर मात्र संध्याकाळी उपहार गृहाकडे मोर्चा वळायचा.
ओमाचे लग्न दुसर्या महायुद्धाच्या अगदी मध्यावर झाले होते. आमचे ओपा ( आजोबा ) त्यावेळी सैन्यात होते शेजारच्या फ्रांस मधून विजयी होऊन आले होते. ह्या विजयी वीरांचे गावात यथोचित स्वागत झाले होते, परत मोहीमेवर निघण्याअगोदर लग्न करून ध्यावे म्हणून आमचे ओपा व त्यांची प्रेयसी आमची ओमा आणि त्यांचे परिवार व समस्त मित्र मंडळी गावातील चर्च मध्ये पोहोचले. पण तेथे तोबा गर्दी जमली होती. गावातील बहुतेक तरुण हा सैन्यात असल्याने बहुतेक सर्वांनी सुट्टीचा सदुपयोग करून लग्न उरकून घ्यावे ह्या हेतूने चर्च मध्ये जमा झाले होते. आता काय करावे ह्या विवंचनेत सगळे असतांना आमच्या ओपाच्या मनात सैनिकी खाक्या प्रमाणे अफलातून कल्पना आली
. काही कोस दूर ह्या भागात जर्मनी मधील फार मोठे प्राचीन चर्च आहे, जगात ते पहिल्या ५ चात येते. तेथे लग्न करायचे ठरवले. आता तेथे जायचे म्हणून सर्व बस थांब्यांवर जवळ गेले असता तेथेही प्रचंड गर्दी होती त्याची तुलना फक्त आपल्या कडे गणपती साठी मुंबईहून कोकणात जाण्यासाठी एसटी स्टँड च्या गर्दीशी होऊ शकते. मग जेव्हा त्यांची बस आली तेव्हा प्रचंड धक्काबुक्की करत बस मध्ये आमचे ओपा , ओमा आणि दोन नातेवाईक व ३ मित्र चढू शकले, बाकीचे मागे राहिले. मग त्या भव्य चर्च मध्ये ह्या दोघांचे लग्न झाले

. अश्या आजीचा गोड निरोप घेतल्यावर अनिता व केट खरेदीसाठी बाहेर पडल्या .अल्बर्ट म्हाणाला मी व माझे काही मित्र सौना बाथ ला जाणार आहोत येशील का ? मी लगेच हो म्हटले .ह्यावर केट जाताना कानात कुजाबली तुला माहिती आहे का येथे सौना बाथ महिला व पुरुषांच एकच असतो. व सगळे दिगंबर पंथीय असतात .तिथे .मला खरच वाटेना १०० एक स्त्री पुरुष आदी मानवासारखेच कसे सौना एकत्र घेऊ शकतात ?
 क्रमशः

४ टिप्पण्या :

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips