हिमवर्षाव

Blogger Tricks

शुक्रवार, ७ डिसेंबर, २०१२

कलोन , जर्मनी चे सांस्कृतिक वैभव

 माझ्या अनुदिनी मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे माझे जर्मनी मधील वास्तव्यातील अनुभव जर्मन आख्यान ह्या सदरात देत आहे.
अबुधाबीहून जर्मनीला केट सर्वप्रथम आली व मी मुंबईला जर्मन भाषेची मुळाक्षरे गिरवून दोन महिन्यांनी कलोनला आलो.
जर्मनीत दीर्घ वास्तव्यासाठी यायचे असेल तर भाषेची तोंडओळख असणे अनिवार्य आहे तसा सरकारचा कायदा आहे ,त्यासाठी कोणालाही आंदोलन करायला लागत नाहीत.
 



कलोनच्या विमानतळावर उतरलो तेव्हा गडद धुके होते थंडी होती. पण दोन महिन्यांनी बायकोला भेटणार असल्याने ह्या सर्व गोष्टींची तमा न बाळगत माझे समान घेऊन मी बाहेर आलो .केट माझी वाट पाहत होती मला पाहताच तिचा मुळात गोड असलेला चेहरा अजूनच खुलला .मग प्रवास कसा झाला वगैरे शिळोप्याच्या गप्पा झाल्या .मीही उगाच शेजारी एक तरुणी सुबक ठेंगणी बसली होती .तिच्या सोबतीत प्रवास सुखकारक झाला .तिने ह्याच शहरात राहत असल्याने दूरध्वनी क्रमांक दिली .व ह्याचा वापर कर हे सांगायला विसरली नाही .असे सांगताच बाई साहेबांनी  . मुळात तू नंबर घेतलाच कशाला ?अश्या अर्थाचा चेहरा केला तिच्या चेहऱ्यावरचा तो लटका राग व मत्सर पाहून मी खुश झालो 
.मत्सर हा प्रेमापोटी व आवडत्या व्यक्ती वर असलेल्या अधिकारा पोटी निर्माण होतो .तो यायचा संपला कि नात्यांमधली आकर्षण कमी होत जाते .मी लगेच मस्करीची कुस्करी होणार नाही ह्याची दक्षता बाळगून योग्य तो खुलासा केला .मग कलोन शहरात आमच्या आवडत्या अमेरिकन कॉफी शॉप स्टारबक्स मध्ये कॉफी प्यायलो
   .हा अमेरिकन ब्र्यांड  . युकेत रुळायला जास्त त्रास झाला नाही. .पण जर्मनीत त्याचे बस्तान हळू हळू बसतंय .ह्याचे कारण म्हणजे चीबो .हा चोबो एक अस्सल जर्मन ब्र्यांड असून स्वस्त नि मस्त अशी ख्याती असणारे बेकरी पदार्थ कॉफी व कपडेसुद्धा जर्मनीत लोकप्रिय आहेत .येथे बेकरी हा एक बडा ख्याल आहे . त्या जश्या चीबो किंवा इतर नामवंत जर्मन ब्यांड च्या असतात तसे लघु उद्योगासारख्या स्वतंत्र सुद्धा असतात .वेगवेगळे आकाराचे ताजे पाव .तोंडाला पाणी सुटेल अश्या विविध चवीच्या आकाराच्या गोड पेस्ट्रीज ह्या बेकर्या केवळ १ त्ते दीड युरोमध्ये देतात .त्यांची दीड युरोची मोठ्या कपातली कॉफी हि अमेरिकन स्टार बग्ज च्या लहान  कपाच्या साडेयुरोच्या मानाने स्वस्त असते .व मोठी असते .खुल्या बाजारात चीन व अमेरिकाच अश्या नावाला न घाबरता स्वताच सत्त्व ओळखले तर जनता जनार्दन  देशाच्या ब्रॅन्डला प्राधान्य देते .हे लक्षात आले .

तेथून आमची स्वारी एस बान म्हणजे लोकल मधून १५ मिनिट लांब असलेल्या होल वायदा ह्या टुमदार उपनगर आलो .घर तिसऱ्या मजल्यावर होते त्यामुळे कुली नंबर १ कामाला लागला.
 .घर मात्र प्रशस्त होते .माझी अवस्था येथे नुकतेच अनिवासी भारतीयांशी भारतातून लग्न होऊन अमेरिका वा परदेशी नवऱ्याच्या घरी आलेल्या बायको सारखी होती .
 घर व्यवस्थित रित्या सजलेले होते हे घरकूल मी जर्मन भाषा मुंबईत शिकत असताना तिने एकटीने जर्मनीत येऊन आईबाबांकडे राहून पहिले घर शोधले .  ते शोधणे म्हणजे आपल्या कडील अरेंज विवाह करण्यासारखे असते 
.येथे नेटवरून किंवा पेपरात घराच्या जाहिराती पाहायच्या .शक्यतो दलाल टाळायचे कारण ते ५०० ते ८०० युरो दक्षिणा घेतात (८०० युरो फांक फ्रुट साठी मोजले .)मग मुलाखतीचा कार्यक्रम असतो म्हणजे प्रत्यक्ष घर पाहण्यासाठी वेळ दिली जाते त्या वेळेवर अनेक इच्छुक येतात घर पाहून जर ते आवडले तर थांबायचे नाही तर कलटी मारायची .ज्यांना घर आवडले त्यांनी आपला नावं व्यवसाय अशी प्राथमिक माहिती द्यायची .त्यातून एक दोन दिवसात शोर्ट लिस्ट झालो तर मुलाखतीला जायचे .ह्यातून प्रश्न उत्तराच्या माध्यमातून भाडेकरूंच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीचा अंदाज घेऊन मग घर हातात येते .त्यासाठी ३ महिन्याचे भाडे अनामत रक्कम म्हणून द्यायची .व दर महिन्याच्या पहिल्या तारखेला भाडे अंदाजे ६०० युरो विथ वार्म म्हणजे काय  तर   साडे ४०० युरो हे घराचे मूळ भाडे व हीटर /गॅस.वीज ./पाणी ह्या सर्वांचे मिळून दिडशे युरो म्हणजे गरम वार्म ( हीटर    मुळे त्याला वार्म म्हणतात )
 अबुधाबीला सर्व घरात एसी तर येथे सर्वत्र हीटर हा आवश्यक भाग असतो .थोडक्यात काय तर ह्यांवर आम्ही परावलंबी होतो .अबुधाबीत एसी बिघडला तर त्या घरात ४५ ते ५० च्या तापमानात राहणे शक्य नसल्याने मुक्काम हलवावा लागतो .तोच न्याय येथे हीटर  बिघडल्यावर असतो . पंख्याशिवाय नुसत्या खिडक्या उघड्या ठेवून झोपायला हे काही पुणे नाही . नशीबवान आहेत लेकाचे.
कलोन हे शहर मला प्रथमदर्शनी आवडले .माझ्या बायकोने आलम जर्मनीतून ह्या शहराची का निवड केली हे कळले .शेवटी तिच्या निवडीवर माझा पूर्ण विश्वास आहे (मी सुद्धा तिचीच निवड नाही का ?) जर्मनीतील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेले कलोन हि जर्मनीची सांस्कृतिक राजधानीच.  रैइन ह्या त्यांच्या प्रमुख नदीवर वसलेले हे शहर.     ह्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे स्टेशन बाहेर ९०० वर्षापूर्वीचे भव्य चर्च अत्यंत भव्य व अप्रतिम कला कृतीचे हे कॅथेड्रल   म्हणजे सुंदर लेणे आहे.



 .माझी बायको व तिचे कुटुंब  पक्के   नास्तिक कर्म वादावर विश्वास ह्याबाबत तिने मला सांगितले आमच्या कडे दुसर्या महायुद्धानंतर स्व कर्तृत्वावर प्रगती केल्याने कर्म वादाचा पगडा जनतेवर बसला .पण आर्ट व शिल्प कला मायलेकींच्या आवडीचा विषय.  त्यामुळे ह्या कॅथेड्रलकडे एक उत्कृष्ट शिल्प ह्या द्र्ष्टीकोनातून पहायचे आम्ही  ठरविले.     आम्ही त्या भव्य कॅथेड्रल   पासून माझे कलोन दर्शन सुरु केले .नंतर सासू आल्यावर आम्ही दोघांनी त्या कॅथेड्रल चा  माथा गाठला तेही एकाच वेळी जेमतेम दोन माणसे जातील इतका रुंद नागमोडी जिना चढत गेलो .वरून बर्फात बुडालेले कलोन दिसत होते .आखीव रेखीव तारुण्याने मुसमुसलेल्या (मी कलोन शहराबद्दल बोलतोय ).ह्या शहरात नेहमीच काही ना काहीतरी जलसे अथवा कार्यक्रम होत असतात .कारण हे शहर प्रसार माध्यमे व रेडीयो ह्याचे माहेर घर आहे .आपल्या सारखे सगळे  उद्योग धंदे    मुंबईत आल्याने सर्व परप्रांतीयांना दुसरा पर्याय उरला नाही .येथे प्रत्येक शेत्र जर्मनीच्या विविध भागात विभागले गेले आहे .जसे आर्थिक भाग फ्रेंकफुर्त वगैरे .
 क्योल्न हा कलोन शहराचा  टिपिकल जर्मन उच्चार   (Köln) हे जर्मनी देशाच्या नोर्डर्‍हाईन-वेस्टफालन राज्यातील सर्वात मोठे व जर्मनीतील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

 कलोन ची माणसे माझ्या मते सर्व जर्मनीत प्रेमळ म्हणून प्रसिद्ध आहेत .हे माझ्या बायकोचे म्हणणे मला पटले .नदीकाठी फेरफटका मारून झाला. ह्या शहराची बांधणी म्हणजे नव्या जुन्याचा संगम आहे .सगळ्यात प्रसिद्ध चॉकलेट्स    म्युझियम मला पाहायला जायचे होते . जर्मनीत फूटबॉल वर्ल्डकप एक महिन्यांवर येवून ठेपला होता. त्यातला एक सामना कलोनला देखील होणार होता. त्याकाळात मी कलोनला भेट दिली होती. सारं शहर फुटबॉल झालं होतं. आपल्याकडच्या दुकानात जसं गोवा, बॉम्बे, माणिकचंद आदी पाकिटं लोंबत असतात तसं इकडे जर्मन झेंडे, फूटबॉल किचन, बियरच्या बॉटल किचन, जर्मन जर्सीज आदी माल दुकाना दुकानातून भरभरून वाहात होता. कलोन कॅथेड्रल पाहायला आम्ही गेलो. 
दोन उंच मनोरे! वर जायला मनोऱ्याच्या आतून पायऱ्या आहेत. पायऱ्या त्यावेळी मोजल्या हो त्या, आता नक्की आठवत नाही. पण एका दमात चढेल तो ग्रेटच! वर एक मोठी लोखंडी घंटा आहे.
 कॅथेड्रल  क्योल्न मुख्य रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडल्यावर लगेच डोळ्यात भरते.कॅथेड्रल चढून वर आलो आणि डोळ्याचे पारणे फिटले.
चारी बाजूला तारांची तटबंदी असल्याने पर्यटक निर्धास्तपणे वर्तुळाकृती कॅथेड्रलच्या सज्ज्यातून हिम वर्षावाची  दुलई ओढलेले शहर विविध कोनातून दिसत होते.
ते पाहून माझ्यातील गौतम राज्याध्यक्ष जागे झाले व किती फोटो काढून नी किती नको असे मला झाले मला जमले तसे मी ह्या शहराला माझ्या केमेर्यात बंदिस्त केले.

तारांची तटबंदी असली तरी काही नाठाळ पर्यटकांनी आपली नावे त्या  कॅथेड्रल  च्या मनोर्यावर कोरली होती. हे पाहून रसभंग झाला.
वरतून रायन नदी व तिच्यावरील पूल  फारच सुंदर दिसत होता.
आखीव ,रेखीव क्योल्न शहर फारच गोजिरवाणे दिसत होते.
रविवारी पूर्ण जर्मनी मध्ये सुट्टीचा दिवस असल्याने आपत्कालीन सेवा सोडल्यास बाकी सर्व बंद असते. सर्वत्र शुकशुकाट असतो. अश्यावेळी दुपारी बारा वाजता ह्या घंटीचे टोळ अर्ध्या शहराला ऐकू जातात.

बान स्टेशन ते   कॅथेड्रल   ह्यांच्या मध्ये विस्तृत पटांगण आहे ते नेहमीच गर्दीने गजबजले असते. लोक तेथे बसून कॉफी अथवा बियर पीत वाचत बसलेले असतात. किंवा गप्पा फड जमला असतो. ह्याच पटांगणात अनेक देशी ,विदेशी कलाकार आपले कला कौशल्य दाखवत असतात.
  

कॅथेड्रल  चा आतील भाग तेवढाच भव्य होता ९ व्या शतकात बांधले गेलेले हे चर्च मध्ये रंगीबेरंगी आरश्याचा तावदाने होती.
   कॅथेड्रल  च्या स्टेज जेथे महत्त्वाचे विधी पार पाडले जातात. तो देखील विस्तृत होता.   कॅथेड्रल  चा आतील भाग त्याचे नक्षीदार मनोरे पाहून मी दंग झालो होतो.
एक विलक्षण शांतता मनाला मिळाली होती. मी  भारावलेल्या अवस्थेत  तेथे बसलो
मनात स्वामी समर्थांचा जप म्हणायला लागलो. आणि मी माझा उरलोच नाही,
आपल्या कडे देवळाभोवती असते तशी बाजारपेठ , तेथील विक्रेते आणि हमखास असतो तो गडबड ,गोंधळ अजिबात नव्हता.

. वरून कलोन शहराचं नयनरम्य दर्शन घडतं. संध्याकाळी गणेशा नावाच्या इंडीयन रेस्टॉरन्टमध्ये जेवायला गेलो होतो. तिथलं लोणचं म्हणजे अप्रतिम होतं! भयानक तिखट. खावून माझ्या कानातून वाफाच निघाल्या. हे गोरे काय खाणार हे. चुकून खाल्लेच तर तासाभरात नक्कीच दहावेळा 'एकांतवासात' पळतील.

 चॉकलेट्सचे म्युझियम म्हणजे काय असा प्रश्न मी बायकोला नि सासूला विचारला तेव्हा त्यांनी सांगितले.
चॉकलेट् खाण्यात जर्मनी जगात पहिल्या ३ नात येते .ते आणि बियर जर्मन आयुष्यातील अविभाज्य अंग आहे . ह्या चॉकलेट बद्दलची समग्र माहिती ह्या ,म्युझियम मध्ये मिळेल .तेथे गेल्यावर चॉकलेट बनण्याची प्रक्रिया अगदी कोको जगात कुठे किती प्रमाणात बनते ,मग जगभरात कोणते देश ह्याचे प्रमुख भोक्ते आहेत .व जगातील प्रमुख चॉकलेट चे उत्पादक व त्यांचे लोकप्रिय ब्र्यांड ह्या बद्दल बौद्धिक झाले .मी मात्र थियरी खूप झाली जरा
       प्रत्यक्ष पाहण्यासाठी मी आतुर झालो होतो.

पहिल्या भागात आत त्यांनी कॉफी ज्या वातावरणात बनवतात तसे कृत्रिम वातावरण, नर्सरी निर्माण केली होती. जेणेकरून तिचे पिक कसे घेतात हे लक्षात  येते.
दुसऱ्या भागात चॉकलेट्स बनविण्याची संपूर्ण प्रक्रिया समजावी म्हणून तेथे त्याच्या कारखान्याचे छोटे मोडेल बनवले  आहे. 


.नि समोर चक्क चॉकलेट चे कारंजे होते .ज्यातून फक्त चॉकलेट चा एक संथ फवारा येते होता .लांब अंतराने ते चिखलाचे डबके वाटत होते .
पण ह्या डबक्यात चुकून पडलो तर उठायचे कोण नाव घेईल .? बाकी गाईची अस्सल प्रतिकृती असलेला पुतळा व हत्तीची छोटी छबी खूपच चांगली होती
 .डबक्यात हात घालावा असा मला मोह होत होता .पण डबक्याच्या जवळ चॉकलेट एवढी गोड स्वयंसेविका एक रेफेल त्या डबक्यात व्यवस्थित बुचकळून आम्हाला देत होती .चव निव्वळ अवर्णनीय होती .तिथून आम्ही आलो ते रायन नदीच्या पुलावर
 येथे ट्रेन करता मोठा पूल होता व त्याच्या लागत पादचारी लोकांकरिता एक छोटा पूल होता त्या पुलाला जाळ्यांची कुंपण होते .त्या कुंपणावर हजारो कुलपे लावली होती .मग कलोन शहराची आगळी वेगळी प्रथा कळली
 .ह्या शहरात लग्नाच्या गाठी जुळल्या  कि नव विवाहित जोडपे येथे येथे व जाळीला कुलूप बांधते




 व चावी नदीत फेकून देतात .कुलपाचा  अर्थ येथे विवाहाच्या पवित्र बंधनात अडकल्याचे  सिम्बॉल ह्या अर्थी होतो..  काही कुलपाच्या    आपण पूर्वी डब्यावर जशी नावे लिहायचो तशी नावे व लग्नाची तारीख लिहिली होती..तेथून

आम्ही स्टेशन वर आलो .अल्बर्ट येणार होता .आता पित्याला पाहून दाटून कंठ येतो कि काय अशी गमतीदार कल्पना माझ्या डोक्यात आली.  त्याने आल्या आल्या आज त्याचा क्लब जिंकला म्हणून मी खुशीत आहे .असे सांगितले .बाकी ह्या फूटबॉल पटू व गाढवा मध्ये एक साम्य असते म्हणजे दोघेही लाथा मारतात . आपण सर्व भारतीय गाढव असल्याची समजूत नेते आपल्याला आश्वासनाचे गाजर दाखवत असतात .
असो .दुसऱ्या दिवशी आम्ही भटकंतीला निघालो .जर्मनचे रस्त्यावरचे खाद्य म्हणून प्रसिद्धीला आलेले करी सोसेज .हा पदार्थ बर्लिन मध्ये १९४९
 क्रमशः

३ टिप्पण्या :

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips