सिनेमे आणि त्यांच्याशी निगडित आपल्या फक्त आपल्या काही खास आठवणी असतात.
आभासी जगतात भटकत असतांना ह्या भन्नाट विषयावर वाचायला मिळाले.
ह्या निमित्ताने माझ्या आठवणींना लागलेला पाझर मी येथे रिता करतो.
भारतात सिनेमे आवडत नाही अथवा पाहत नाही असा माणूस विरळाच
आपण सिनेमे पाहतो म्हणजे काय तर एकतर थेटर माफ करा मल्टिप्लेक्स. , किंवा घरी केबल व आजच्या काळात इंटर नेट किंवा रस्त्यावरून बनावट सीड्या घेऊन.
माझ्या बालपणी थेटर सोडल्यास सिनेमा पाहायचा असेल तर वी सी आर वर पहायला लागायचे. ते पाहणे म्हणजे आपल्या घरातील नव्हे तर आजू बाजूच्या घरातील माणसे सुद्धा यायची.
आज आठवणीच्या भावविश्वात शिरलो तर बालपणीच्या काळावर बॉलीवूड ची अधिसत्ता असल्याचे दिसून येते. आपण अनेक सिनेमे पहिले असतील किंवा आजही पाहतो. पण काही सिनेमांची नावे जरी आपण अनेक वर्षानंतर ऐकली तर त्या सिनेमांच्या निमित्ताने एखादा प्रसंग ,घटना किंवा एखादी वस्तू ,संवाद आपल्या डोळ्यासमोर येतो
उदा
हम आपले हे कौन पाहून मी ९ वाजता रात्री थेट गच्चीवर आलो. व गच्चीवर साजरी केलेली कोजागिरी , आजही माझ्या लक्षात आहे. व हम आपके हे कौन आजही लागला
तरी तो कोजागिरीचा चंद्र डोळ्यासमोर येतो.
बेताब सिनेमाच्या वेळी थेटर मध्ये वय वर्ष ५ असतांना सनीच्या कुत्र्याला गोळी लागल्यावर , तो मेला नाही आहे असे मी जोरात ओरडून संपूर्ण थेटरवासियांना सांगितले होते.बेताब सिनेमा म्हटला की माझे अवखळ बालपण माळा आठवते.
एक मोठा भाई चेंबूर मध्ये वारला म्हणून अर्धे चेंबूर बंद झाले आता बसंत टोकीज मध्ये काढलेली दिल तो पागल हे ची तिकीट वाया जाणार का
ह्या विवंचनेत पाहिलेला सिनेमा व सिनेमा संपल्यावर पाहिलेली त्या भाई ची विराट अंत्ययात्रा पाहिली होती.
आजही दिल तो पागल हे ची गाणी ऐकली तर सगळा प्रसंग डोळ्यासमोर येतो.
आजही दिल तो पागल हे ची गाणी ऐकली तर सगळा प्रसंग डोळ्यासमोर येतो.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वय वर्ष ४ ते ६ ह्या कालखंडात वडलांच्या सोबत डोंबिवली येथे टिळक व गोपी टोकीज ला लागलेला जवळ जवळ सर्व सिनेमे दुपारी साडे तीनच्या शोला मी पहिले , सिनेमा संपल्यावर आम्ही दोघे साळसूद पणे आईची डोंबिवली स्टेशन वर वाट पाहायचो . व आईला बाप लेक मला घ्यायला स्टेशन वर येतात म्हणून झालेला आनंद व माझ्या चेहऱ्यावरील बिलंदर भाव.......
आईला मला अमिताभ च्या सर्व सिनेमातील गाणी व डायलॉग कसे माहिती आहेत असा पडलेला प्रश्न
अश्या कितीतरी आठवणी आहेत .
टिळक नगर चेंबूर हा छोटा राजन चा अड्डा आणि तेथे माझा काका राहायचा
मी ७ वर्षाचा होतो व.पांढरपेशा . डोंबिवली मध्ये राहत असल्याने भाई वगैरे प्रकरण माहित नव्हते.
तर काकांच्या बिल्डिंग मध्ये राहत असलेल्या एका मित्राकडे मी शिवा सिनेमा पहिला.
आणि खाली आल्यावर एका सायकल ची चेन काढायचा प्रयत्न करू लागलो.
एक भाई सारखा दिसणारा माणूस आला व त्याने काय करतोय असा प्रश्न विचारला.
मी त्याला शिवा सारखी सायकल मधून चेन काढण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न सांगितला. ह्या नंतर पुढील ३ वर्ष जेव्हा मी काकांच्या बिल्डींग मध्ये आलो त्याने मला पाहताच
काय रे चेन काढायला जमली का ,का मी शिकवू असे सगळ्याच्या समोर विचारायचा.
अश्या कितीतरी आठवणी मनात आहेत.
पण ह्याहून खतरनाक आठवण आजही माझ्या लक्षात आहे
ती म्हणजे 8 वीत असतांना आम्ही मित्र ,मैत्रिणीनी नाईटमेअर at इल्म स्ट्रीट हा भुताचा सिनेमा पहिला. फ्रेडी गृगर ह्या भुताचा माझ्यावर त्याच्या नंतर पडलेला पगडा आजही तसाच आहे.
त्या दिवशी रात्री आमच्या खालती राहणारा माझ्या 3 री मधील मित्राची आई रात्री अकरा वाजता आमच्या घरी आली ,तेव्हा ती रागात व काळजीत होती.
तिने मला पहिला प्रश्न विचारला की तू रोहन ला काय सांगितले की तो आता झोपायला तयार नाही आहे , सारखा ,झोपलो तर भूत येईल. एवढेच म्हणत आहे.
व तुझे नाव घेत आहे.
मी घाबरून खुलासा केला की आज दुपारी पाहिलेल्या सिनेमात तो फ्रेडी फक्त लहान मुलांच्या स्वप्नात येतो व क्रूरपणे त्यांना ठार मारतो , व स्वप्नात घडलेली गोष्ट प्रत्यक्षात घडून ती मुलं मरतात. म्हणून सिनेमा संपल्यावर मी त्याला गंमतीने म्हटले.
की आज रात्री झोपू नको , फ्रेडी तुझ्या स्वप्नात येईल , आता त्याने ही गंमत खरी समजली.
माझे वाक्य संपल्यावर माझ्या कानाखाली आईची ५ बोटे हळुवारपणे .......
मांजरीची नखे काय तिच्या पिल्लाला लागतात का . असो
तर मग मी त्या रोहनच्या घरी जाऊन त्याला अर्धा तास असे काहीही होणार नाही ,
उलटपक्षी फ्रेडी तर मेला, हे आपण नाही का सिनेमाच्या शेवटी पहिले.अश्याप्रकारे समजून सांगितले..
पण मनात माझ्या विचार होता की फ्रेडी जरी मेला तरी सिनेमाचा दुसरा व तिसरा पार्ट
सुद्धा आहे व तो सुद्धा पाहायचा .हे आम्ही मुलांनी संभाषण केले होते , ते कृपा करून रोहन ने ऐकले नसेल.
शेवटी तो कसाबसा झोपला , त्यांच्या अंगात ताप भरला होता.
ह्या निमित्ताने आमच्या इमारतीमधून सर्व जागृत पालकांनी मुलांच्या वर लक्ष ठेवले पाहिजे ह्या अर्थी एक परिसंवाद रात्री एक पर्यंत केला.
मला भुताचे सिनेमे पहिले तर माझे तंगडे तोडून माझ्या गळ्यात टांगू अशी सामूहिक हिंसक धमकी दोघांकडून ऐकावी लागली. ही पालक मंडळी गांधी आपल्या पाकिटात ठेवतात पण सर्व सामान्य जीवनात गांधीवाद , अहिंसा वादाला पार तिलांजली देतात.
एरवी सायको आणि ड्राय कुला , काय सिनेमे होते , आम्ही ते कसे रिगल , इरोस ला पाहायचो अश्या रस भरीत कहाण्या सांगणारे माझे बाबा मात्र मला ह्या धर्म संकटात एकट्याला सोडून आईच्या गटात सामील झाले होते.
म्हटलं च आहे , सुख के सब साथी दुख मे ना कोई
अश्या कितीतरी आठवणी आहेत. टिळक ला मैने प्यार किया हा सिनेमा आईबाबांच्या सोबत पहिला आलो होतो. , आम्ही अधून मधून आईला सुद्धा सिनेमे दाखवायचो.
तर त्यावेळी माझ्या वर्गातील सर्वात सुंदर मुलगी तिच्या आई बाबांच्या समवेत सिनेमा पाहण्यास आली होती. आम्ही ५ वीत असतांना बाल्कनीत बसून मैने प्यार किया पहिला , सोबत असलेल्या आमच्या आईवडिलांना सुद्धा दाखवला .
मनात आले त्यांना सांगावे काय तुमच्या काळातील शिनेमे म्हणे हम तुम , एक कमरेमे बंद हो .
नाहीतर आमचा प्रेम पहा म्हणतो कसा सुमनला
मी तुझ्या दुखत्या पायावर मलम लावतो , पण घाबरू नको मी डोळे मिटून घेतो.
आता हा प्रेम अधून मधून भणंगपणा करतो, पण ते महत्त्वाचे नाही.
आजही जुने सिनेमे काहीही कारणास्तव पाहण्यात आले की त्यांच्याशी जडलेल्या माझ्या आंबटगोड आठवणी कस्तूरी प्रमाणे माझ्या भावविश्वात दर वळतात..
तर त्यावेळी माझ्या वर्गातील सर्वात सुंदर मुलगी तिच्या आई बाबांच्या समवेत सिनेमा पाहण्यास आली होती. आम्ही ५ वीत असतांना बाल्कनीत बसून मैने प्यार किया पहिला , सोबत असलेल्या आमच्या आईवडिलांना सुद्धा दाखवला .
मनात आले त्यांना सांगावे काय तुमच्या काळातील शिनेमे म्हणे हम तुम , एक कमरेमे बंद हो .
नाहीतर आमचा प्रेम पहा म्हणतो कसा सुमनला
मी तुझ्या दुखत्या पायावर मलम लावतो , पण घाबरू नको मी डोळे मिटून घेतो.
आता हा प्रेम अधून मधून भणंगपणा करतो, पण ते महत्त्वाचे नाही.
आजही जुने सिनेमे काहीही कारणास्तव पाहण्यात आले की त्यांच्याशी जडलेल्या माझ्या आंबटगोड आठवणी कस्तूरी प्रमाणे माझ्या भावविश्वात दर वळतात..
तुमच्या सुद्धा अश्या सिनेमांच्या गमतीदार आठवणी असतील तर त्या जरूर माझ्या समवेत शेअर करा.
ह्या लेखाची प्रेरणा मला चुळबुळ मंजुळा ताई मुळे आली.
.
तुमचा लेख आवडला . हा लेख वाचता-वाचता माझ्यापण आठवणी ताज्या झाल्या .
उत्तर द्याहटवाआम्ही खेडेगावात राहतो .सिनेमा पहायचा म्हटले कि आम्हाला जिल्ह्याला जावं लागतं .
त्यावेळी 'हम आपके है कौन ?' सिनेमा तुफान गर्दी खेचत होता.आमच्या पण घरी ठरलं कि ह्या सिनेमाला जायचं !
पण आमचं नशीब म्हणावं कि लोकांचं 'हम आपके..' बद्दलचं वेड,३-४ वेळेस जाऊन सुद्धा आम्हाला तिकीट काही भेटलं नाही आणि आम्ही दरवेळी दुसराच सिनेमा पाहून आलो.
शेवटी काही वर्षानंतर तो सिनेमा टीव्ही वर पाहिला.
सौरभ ,पंचतारांकित नगरीत तुंचे मनापासून स्वागत,
उत्तर द्याहटवाहम आपके हे कौन ह्या सिनेमाने एक इतिहास घडवला.
मध्यमवर्गीय ,पांढरपेशा माणूस आपल्या परिवाराला घेऊन एखाद्या लग्नसराई किंवा सोहळ्याला जातात त्या थाटात सहकुटुंब सहपरीवार ह्या सांस्कृतिक उत्सवाला जायचा.
ह्या सिनेमाच्या निमित्ताने लिबर्टी थेटर चे रुपडे पालटले व पडद्याच्या भोवताली दिव्यांच्या माळा असे अनेक प्रयोग करण्यात आले.
माझ्या नातेवाईकांसोबत मी हा सिनेमा डोंबिवली येथे पहिला ,पण मग लिबर्टी ला जाऊन सुद्धा पहिला.
मध्यमवर्गाला उपनगरांतून थेट मुंबईत फक्त सिनेमा पाहायला आणणारा हा माझ्यामते एकमेव सिनेमा