मला खरच कळत नाही की सचिनच्या निवृत्ती वर चर्चा करून आपण त्याला संघापेक्षा मोठे करत आहोत. आणि बाकीच्यांचे काय
ते त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी करत आहे का क्रिकेट हा सांघिक खेळ आहे हे विसरून कसे चालेल. एकदा सचिनवर सर्व चर्चा केंद्रित केली की भारताच्या पराभवाला , संघाच्या भिकार कामगिरीवर कानाडोळा करायला प्रसारमाध्यम व त्यांच्या आहारी गेलेली जनता मोकळी .
सध्या ऐरणीवर आलेला प्रश्न हा आहे की भारतीय कसोटी संघाला गतवैभव कसे प्राप्त होईल.
कसोटी सामने गोलंदाज जिंकून देतात आणि आपले गोलंदाज त्यात प्रमुख गोलंदाज झहीर पूर्णतः अपयशी व फिटनेस गमावलेला आहे , त्यावर एक चकार भाष्य कोणी करत नाही , आपला अश्विन सोडल्यास कोणताही गोलंदाज पूर्ण बहरात नसतांना ४ गोलंदाज खेळवण्याची अवदसा सलग दोन सामन्यात का बरे ह्यांना सुचली. २० गडी बाद करणे हे काय खायचे काम आहे का
संघाच्या ऐक्याला तडे गेले आहेत. गंभीर स्वतःसाठी खेळतो म्हणणारा धोनीला मी इतकेच म्हणेन की तो निदान स्वतःसाठी खेळतो , तू व इतर फलंदाज तर स्वतःसाठी सुद्धा खेळत नाहीत. इतर सर्व फलंदाज अगदी भविष्यातील द्रविड म्हणून संभावना झालेला पुजाऱ्याच्या फलंदाजी पाहता आता काय त्याची पूजा बांधायची का अरे भारतात तुमची ही अवस्था पर्थ च्या खेळ पट्टीवर काय होईल.
संघात अनेक आमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे , नुसते सचिन , सचिन करून काय अर्थ आहे, उद्या तो गेल्यावर अचानक सगळे गोलंदाज प्रत्येकी ५ बळी व फलंदाज प्रत्येकी अर्ध शतक झळकणार आहे का माझे मत विचारलं तर सचिन , द्रवीड शिवाय भारतीय संघ काम चालवू शकतो ,कारण भारत फलंदाजी साठी ओळखला जातो.
पान ३० सलग खतरुड ओवर टाकणारा व देशी , विदेशी हमखास बळी घेणारा दुसरा जंबो कुठून आणायचा. इंग्लंड लेग स्पिनर ला टरकतात हा त्यांचा जुना इतिहास आहे. चंद्रशेखर ते मुश्ताक ते अब्दूल कादिर ते वॉर्न किंवा कुंबळे ह्या लोकांचे इंग्लंड विरुद्ध रेकॉर्ड पहा. मग कळेल दर्जेदार लेग स्पिनर किती महत्त्वाचा असतो.
आज भारतात चावला सोडल्यास दर्जेदार स्पिनर ची वानवा आहे , आणि चावलाला लहान वयात संशी मिळून तो आजही तळ्यात मळ्यात आहे. एकेकाळी शिवलकर सारख्या प्रख्यात फिरकी गोलंदाजाला भारतीय संघात स्थान मिळाले नाही कारण प्रसन्ना , बेदी व असे अनके फिरकी गोलंदाज भारताकडे होते . अमोल मुझुमदार ला मधल्या फळीत स्थान मिळाले नाही कारण भारताकडे भक्कम मधली फळी होती. आज अशी परिस्थिती आहे का उगाच सचिन सचिन बोंबा मारण्यात काय हशील आहे.
येथे एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की असे काय आक्रित घडले की एकेकाळी कसोटी संघ क्रमांक १ किंवा २ च्या स्थानी असायचा नुकताच वर्ल्ड कप जिंकला होता अचानक गोलंदाजी ,फलंदाजी चालेनाशी झाली.
,सगळे मेल्यागत झाले.
ह्याचे दोन प्रमुख कारणे आहेत पहिले म्हणजे अती म्हणजे अती क्रिकेट मुळात भारतीय क्रिकेट संघांचा आंतरराष्ट्रीय वेळापत्रक व्यस्त त्यात त्या भिकार आय पी एल ची भर येथे एक लक्षात घेतले पाहिजे.
जेव्हा २० २० सुरु झाले सचिन ने त्यातून अंग काढून घेतले कारण दोन सामन्यामध्ये अंतर कमी असल्याने प्रचंड थकवा येतो , मात्र आय पी एल सुरु झाले व प्रचन म्हणजे अतिप्रचंड पैसा ओतल्या गेला. सचिनला खेळावे लागले, त्यालाच बिचार्या द्रविड व लक्ष्मण ला सुद्धा खेळावे लागले. मुळात ह्या वल्ड क्लास खेळाडूंचा दर्जा आणि पाटा खेळपट्टीवर नवशिक्या खेळाडूंचा एका दिवशी चुकून माकून मटका लागून झालेल्या चटकदार फलंदाजी करणाऱ्या सोम्या गोम्यासमवेत करण्यात आला. आणि अचानक भारतात ह्या आय पी एल मुळे नव्या गुणवान व प्रतिभावान खेळाडूंचा शोध लागला मात्र पुढील आय पी एल च्या स्पर्धेत पाटा खेळपट्टीवर त्यांची त्रेधातिरपीट उडाली.
, ह्यामुळे आपले सर्व वरिष्ठ खेळाडू पार म्हणजे पार गळून गेले.
दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सगळ्या वरिष्ठ खेळाडूंना कंपन्या करारबद्ध करतात , व त्यांची साहजिक अपेक्षा अशी आहे की ह्या खेळाडूंनी जास्तीतजास्त सामने खेळावे म्हणजे त्यांची कंपन्यांचे लोगो मैदानावर झळकतील
,पण ह्या सुमारास आय पी एल मुळे अनेक नव्या खेळाडूंना अनेक कंपन्यांनी करार बद्ध केले , आता २० ते २५ खेळाडू व संघात जागा ११ म्हणजे प्रतिस्पर्धी कंपन्यांचे युद्ध थेट खेळाडूंच्या मुळावर आले व वरिष्ठ व कनिष्ट असा नाहक संघर्ष निर्माण केला गेला.
कोणत्याही संघात नवीन व जुन्याचा संगम असणे महत्त्वाचे हे धोनी सकट सगळ्यांना कळते पण अतिप्रचंड पैसा व ज्याला क्रिकेट काळात नाही असे राजकारणी व व्यापारी लोकांचा पगडा क्रिकेट वर असल्याने , सत्तेपुढे शहाणपण चालत नाही ह्या उक्ती नुसार धोनीला वागावे लागते.
सचिन मध्ये क्रिकेट अजून आहे हे माझे मत आहे .
फक्त वयाचा विचार करता त्याने क्रिकेट चा फक्त एक प्रकार खेळावा.
म्हणजे त्या प्रकारात त्याला लक्ष देत येईल. व फुकटचा दमवणारा नाही.
सध्या आपले क्रिकेटपटू म्हणजे घाण्याला जुंपलेलं बैल आहेत
जेव्हा ते क्रिकेट खेळत नाहीत तेव्हा जाहिरात ,सोहळे व पार्ट्या ज्या व्यावसायिक संपर्क वाढवायला गरज बनली आहे ह्यामुळे परिवाराला वेळ देता येत नाही व दगदग व धावपळ ह्यामुळे शारिरीक व मानसिक ताण शरीरावर पडतात.
सचिन व इतर वरिष्ठ खेळाडूंनी जर निक्षून ठरवले की आपण काय खेळायचे व काय खेळायचे नाही उदा फक्त कसोटी किंवा १ डे किंवा किंवा २० २० त्याला निवड समितीने साथ देऊन तीन वेगवेगळे संघ निवडून एक खेळाडू जास्तीतजास्त दोन संघात उदा अश्विन कसोटी व 1de खेळले तर त्यांचा निभाव लागेल.
वासिम व वकार च्या उमेदीच्या काळात अतिक्रिकेटचे नव्हते , जे जाहीर व अख्तर च्या काळात आले म्हणून त्यांना फिटनेस समस्या जाणवली. थोडक्यात काय अतिक्रिकेटचे व अति पैसा म्हणजेच अति तेथे माती प्रेक्षक व खेळाडू ह्या दोघांसाठी
सध्या जेव्हा संपूर्ण संघाची कामगिरी चांगली होत नाही आहे. कुठेतरी पाणी मुरत आहे. भारत पाक च्या सामन्यात २००० कोटींचा सट्टा लागतो. ह्यावरून कल्पना येते की ह्या खेळा भोवती प्रचंड पैसा व त्याने येणाऱ्या अ प्रवृत्ती आहेत.
बहुराष्ट्रीय कंपन्यांनी पहिले फुटबॉल व आता क्रिकेट चे अपरिमित नुकसान केले आहेत. त्यांना खेळांशी काहीही देणेघेणे नाही त्यांना फक्त त्यांचा माल विकायचा आहे. व आपला धंदा वाढविण्याच्या नादात त्यांनी क्रिकेट खेळला धंदेवाईक स्वरुप दिले आहे.
भारताकडे जर सचिन संघात असल्याने काही गुणी खेळाडू बेंच वर बसून आहेत असे अजिबात चित्र दिसत नाही. कसोटी संघात येण्याजोगे कोणीही आजच्या घडीला दिसत नाही आहेत. सेहेवाग व युवराज व जहीर हरभजन येथे संघात जागा टिकवू शकत तेथे सचिन जाण्याने काय फरक पडणार आहे.
प्रसार माध्यमे सचिनच्या निमित्ताने संघाची सतत अपयशी कामगिरी ह्या मूळ मुद्द्याला बगल देत आहेत. आणि मनोरंजनाची इतर साधने उपलब्ध असल्याने व आय पी एल मुळे क्रिकेटकडे मनोरंजनाचा बाप म्हणून पाहण्याची वृत्ती आपल्यात बळावल्याने आपला संघ हरो किंवा जिंकू ह्याने काडीमात्र फरक पडत नाही.
इंग्लंड फूटबॉल च्या वर्ल्डकप मधून बाहेर पडली ह्याचे एका दिवस दुख करून दुसर्या दिवशी त्यांचे चाहते इंग्लिश प्रिमीअर लीग विषयी चर्चा करतात. आपल्याकडे असे आय पी एल विषयी करतात. सुदैवाने अति धंदेवाईक पणा करून आय पी एल लोकप्रियता गमावतो आहेत. ते बंद पडेल अशी देवाकडे विनंती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा