हिमवर्षाव

Blogger Tricks

सोमवार, २४ डिसेंबर, २०१२

सध्याच्या बलात्कार कायदा काही प्रकरणात पुरुषांवर अन्याय कारक आहे.

हे शीर्षक वाचून अनेक जणांना माझ्यावर तोंड सुख घेण्याचा मोह होईल ,
सध्या वातावरण तंग आहे , ह्या मुद्द्यावर लोकांच्या भावना प्रखर आहेत , अश्यावेळी पुरुषांच्या बाजूने काही लिहिणे म्हणजे ब्रह्म हत्येचे पातक अंगावर ओढून घेण्याचा प्रकार झाला.
मला आभासी जगतात ओळखणाऱ्या सर्वांनाच माहिती असेल की दिल्लीत घडलेल्या घटनेवर मी  सोशल नेटवर्किंग साईट वर  प्रतिक्रिया  दिल्या आहेत.

पण जर सध्या बलात्काराचा कायदा बदलां असा घोष सध्या सर्वत्र आहे , व मी त्याच्या बाजूने आहे ,
मात्र ह्या कायद्यातील काही गोष्टी पुरुषांवर अन्याय कारक आहेत असे मला वाटते म्हणून मनात आलेले विचार येथे मांडत आहे ,
मी कायदे तज्ञ नाही आहे , तेव्हा हे विचार आभासी जगतात मांडून ह्यावर चर्चा करून ह्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यास उत्सुक आहे.
थोडक्यात ह्या लेखातील माझ्या मतांशी मी ठाम असलो तरी त्यात जर कोणी त्रुटी दाखवून दिल्या किंवा वेगळ्या अंगाने ह्या विषयावर चर्चा केली तर त्याचे स्वागत होईल.



आपण  भारतीय लोक कायदे वाकावण्यात व मोडण्यात खूप माहीर आहोत कारण  ते करण्यात आपल्याकडे खूप जणांना भूषण वाटते.
बलात्कारावर कठोर कायदे व्हावेत ह्याचा अर्थ शिक्षेचा कालावधी वाढवावा किंवा फाशी सुद्धा द्यावी पण त्याचवेळी  बलात्काराचे निकष काय हे अजून तपशील पणे संशोधन करून  सुधारले पाहिजे.
पहिले उदाहरण
काही महिन्यापूर्वी वृत्त पत्रात बातमी वाचली
अनेक महिने लग्नाचे आमिष दाखवून शरीर संबंध राखून दुसर्या मुलीशी लग्न करायला निघालेल्या प्रियकराच्या विरुद्ध महिलेने तक्रार केली ,
सदर प्रियकर बलात्कारच्या गुन्ह्याखाली गजाआड गेला.
मुळात आमिष हा शब्दच सर्व काही सांगून जातो ,
एखादा मोहाला बळी पडून लाच घेतो तेव्हा कारवाई होते , आता लग्न करणार म्हणून लग्नाआधी स्वखुशीने मुलगी शरीर संबंध ठेवते व त्या मुलाने दुसार्या मुलीशी लग्न करायचे ठरवले तर ती बलात्काराची तक्रार कशी काय करू शकते ,
ह्या प्रकारात कदाचित त्या मुलाला त्या मुलीशी काळी बाजू समजली असेल किंवा तो एखाद्या दुसर्‍या मुलीच्या प्रेमात पडला असेल  असे होऊ शकते ,
आता समजा एका मुलीने लग्नाचे वाचन देऊन दुसरी कडे लग्न करायचे ठरवले तर मुलाने सुद्धा बलात्काराची तक्रार करावी का
दुसरे उदाहरण
अल्पवयीन मुलीशी संबंध ठेवल्यात बलात्कार मानला जातो.
मुळात असा संबंध स्वखुशीने झाला तरी मुलगी अल्पवयीन म्हणून एक वेगळा कायदा करून त्या मुलाला गजाआड करा ,
पण थेट बलात्कार म्हणून  गजाआड केले तर समाजात अत्याचारी पुरुष म्हणून त्याची प्रतिमा निर्माण होईल ,
ह्यावर एक उदाहरण द्यायचे तर अशीच काही महिन्यापूर्वी  बातमी आली
की अल्पवयीन मुलगी व नुकतच सज्ञान झालेला एक मुलाने पळून जाऊन लग्न केले तर त्या मुलीच्या घरच्यांनी त्याला बलात्काराच्या प्रकरणी गजाआड केले.
आता ह्या प्रकरणात त्यांच्या प्रेमाला घरच्यांचा विरोध होता , तेव्हा सिनेमांच्या प्रभावाने म्हणा किंवा  वयाचा दोष म्हणा त्या मुलांनी पळून जाण्याचा निर्णय राजी खुशीने घेतला तर त्या एकट्या मुलावर बलात्काराचा आरोप ,
ह्याला काय अर्थ आहे.
वरील दोन्ही उदाहरण दिलेल्या घटना दरवर्षी अंदाजे २ ते ४ वेळा मी वृत्त पत्रात वाचतो .
राजनीती मध्ये दाखवले तसे सीतापुर का टिकट मिळवण्यासाठी कोणतही पातळीवर जाणारी महिला पुढे बलात्काराचा खोटां आरोप लावते.
असे शरीर संबंध ठेवून बलात्कार झाल्याचा आरोप सुद्धा होऊ शकतो ,
म्हणजे कायदा जर कठोर झाला आणि जलद गतीने खटले चालणार असतील तेव्हा
एखाद्याला जीवनातून उठवण्यासाठी असे प्रकार घडू शकतात.
तेव्हा कायदा तर नवीन झाला पाहिजे ,पण त्यावर सविस्तर सर्व बाजूने चर्चा होऊन
आहे त्या कायद्यात आमुलाग्र बदल झाले पाहिजे.

४ टिप्पण्या :

  1. हर्षदजी आणि विनयजी दोघांचे धन्यवाद
    माझ्यामते बलपूर्वक अत्याचार म्हणजे बलात्कार
    पण येथे मुलगा मुलगी संगनमताने जर शरीरसंबंध ठेवत असतील तर फक्त मुलावर बलात्कारासारख्या गुन्ह्याचे बालंट का बरे आणावे.
    अल्पवयीन मुलगा किंवा मुलीशी शरीरसंबंध ठेवल्यास गुन्हा आहे हे मान्य पण त्याला वेगळे कलम व वेगळी शिक्षा हवी..
    एकदम बलात्कार हे अती होते.

    उत्तर द्याहटवा
  2. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/20163984.cms
    आज इतके दिवसांनी मी जो मुद्दा मांडला होता, त्याच योग्य ठरवणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
    खूप बरे वाटले.
    देशात काहीतरी चांगले होत आहे. महिलांवर अन्याय होणे जेवढे वाईट तेवढेच पुरुषांवर होणे देखील

    उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips