जर्मनीत आता .हिवाळा सुरू झाला तोच मुळी अंगात हुडहुडी भरायला लावेल इतक्या ताकदीचा म्हणजे उणे ५ पर्यंत तापमान घसरले .हिमवर्षाव सुरू झाला .माझी लहान मुलांसारखी पावसाळ्याची खरेदी असते तशी तशी हिवाळ्याची खरेदी सुरू झाली .सर्वात प्रथम लोकरीचे मोजे व टोपी ती पण आवडत्या प्रसिद्ध जर्मन ब्र्यांड एसस्प्रिट चे .अंगावर अद्ययावत कोट चढविण्यात आला .मग सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आतून लोकर असलेले लेदरचे जाड हिवाळा व हिमवर्षाव ह्यासाठी खास बनविलेले वजनदार बूट घेण्यात आले .त्याआधी दोन दिवस हिम वर्षावात मी साधे बूट घालून फिरत होतो .तेव्हा काही वेळात माझे सर्व शरीर व आतील रक्त गोठले जातेय अशी भावना व अवस्था निर्माण व्हायची .अश्यावेळी ड्रॅक्युला ने जर माझे रक्त शोषले. तर त्याला गोळे वाल्याचा चा लाल भडक बर्फाचा गोळा चाखायला मिळेल अशी कल्पना मनात आली.
.दोन दिवसांनी आमची सुट्टी असल्याने तडक बूट खरेदी करायला बाहेर पडलो .माझ्या बुटांचे त्या दोन दिवसातील दयनीय हाल पाहून दुकानदार म्हणाला. कि दोन दिवस तुम्ही फिरला ह्या बुटात? तेव्हा मी उत्तरलो काही इलाज नव्हता. .(मनात विचार आला ह्याहून जास्त हिमवर्षाव कारगील मध्ये आपले सैन्य हिवाळ्याचे बूट व कपडे पुरेसे नसताना सुद्धा लढले नि जिंकले .करदात्यांचे पैसे ह्याच्या कामी आला नाही तो कोणाकडे जातो हे जगजाहीर आहे. कोणा विकी लीग ची गरज नाही असो) .मग घराच्या बाजूला फार मोठे म्हणजे लांबीच्या बाबतीत वानखेडेच्या दुप्पट असे मैदान आहे. तेथे प्रचंड वनराई आजू बाजूला आहे .काही भाग कुंपण घालून वन्य जीवासाठी आरक्षित केला आहे .तर बाकीच्या भागात कडेला प्रशस्त जॉगिंग ट्रेक आहे .( युरोपात १००० युरो कमवत असाल तर ८०० युरो हातात येतात .कारण विमा व कर ह्यात पैसा जातो .पण पंचतारांकित वैद्यकीय सेवा व भरलेल्या कराचे असे सार्थक झाले पहिले तर तो देताना वाईट वाटत नाही .
लोक तिथे स्केटिंग करायला लागली होती .आम्ही त्या बर्फाळ प्रदेशात भटकायला सज्ज झालो मध्येच एक नदी लागली .एका मोठ्या ओढ्या सारखी नदी वाटत होती. .तिच्या सोबतीने आम्ही थोडी मजल मारत पुढे गेलो. तर सुरेख राजहंस व बदके आणि बीवर ह्यांचा समूह आम्हाला दिसला. ही लोक त्यांना गाजर ब्रेड खायला घालत होते
..
थोड्याच अंतरावर एका छोट्या हिम टेकडी वरून दोन छोटी पोर व त्यांची आई एका लाकडी बाकावर बसून घसर घुंडी खेळत होते. .मी फोटो काढतोय असे पाहतच त्यांचा उत्साह द्विगुणित झाला. .मग बर्फाच्या गोळ्यांची फेका फेक आई विरुद्ध पोरे अशी सुरु झाली. .मी हे सर्व पाहताना दंग होतो
.तेव्हा गानिमाने वेळ साधली नि माझ्या पाठीत किसलेला बर्फ टाकला. .मी अनपेक्षित हल्ल्याने बिथरलो. ,आता इट का जवाब पत्थर से म्हणून मुठी वळल्या. अब संभाल मेरा वार ह्या अर्थी महाभारतातील विरासारखी. गर्जना केली .. व बर्फ उचलणार तेव्हा सॉरी अशी गोड लाडिक हाक एकू आली .नि आमचा आरपार लढाईचा बेत रद्द झाला .च्यायला माझे म्हणजे भारताच्या परराष्ट्रीय खात्यासारखे झाले. .निषेधाचा खलिता पाठविला. .नि प्रत्यक्ष कृती शून्य .
घरी परत येतांना भली मोठी गाड्यांची रांग दिसत होती .पहिल्या हिमवर्षाव झाल्याने तडाखा जबरदस्त बसल्याने अनेकांनी खाजगी वाहने रस्त्यावर न आणण्याचा शहाणपणा केला होता. .पण जी वाहने २ दिवसापासून जागेवर उभी होती ..त्यांच्या सर्वांगावर बर्फ पसरला होता .मी लगेच सहचारिणी ला कायदा पाळा गतीचा, थांबला तो संपला हि म्हण संदर्भाच्या सहित स्पष्टीकरण करून सांगितली.आमच्या घराच्या घराच्या अंगणात एक सुरेख बर्फाचा पुतळा केट ने बनविला .
जे जर्मनीतील नाताळचे प्रमुख आकर्षण असते . ख्रिसमस मार्केट हे जर्मन नाताळचे प्रमुख आकर्षण ते साधारणतः डिसेंबरच्या सुरवातीला शहरातील मुख्य व मध्यवर्ती ठिकाणी भरतात. भर थंडीत हिम वर्षावात हे मार्केट दिवसभर गजबजलेले असते .येथे विविध प्रकारचे स्टॉल लावले जातात
.तेथे पारंपरिक जर्मन खाद्य पदार्थ विक्रीस ठेवले असतात .प्रमुख आकर्षण म्हणजे ग्लू वाईन .एरवी बियर प्राशन करणारे जर्मन त्यांच्या मुख्य सणाच्या वेळी चक्क वाईन पितात म्हणजे घोर पातक हे म्हणजे भर दिवाळीत शिरखुर्मा खाण्या सारखे झाले . असे माझे मत काही वर्षापूर्वी जेव्हा ह्या प्रथांबद्दल एकले तेव्हा झाले होते .पण जेव्हा कळले कि अत्यंत पारंपरिक पद्घतीने वेगळ्या धाटणीची हि वाईन अत्यंत गरम असताना पिणे हे भर थंडीत सुखद गरमागरम अनुभव असतो .
. ग्लू वाईन थोडक्यात वर्णन करावे म्हणजे जर्मन हॉट spiced वाईन ह्यातील प्रमुख घटक म्हणजे ड्राय रेड वाईन /लिंबाचा रस / लवंग /दालचिनी / जायफळ ची पूड व चवीपुरता साखर .कृती एकदम सोप्पी साखरे व्यतिरिक्त सर्व जिन्नस एका भांड्यात घेऊन उकलावा याचा .नि मग चवी पुरता नाममात्र साखर घालून तो उकळता द्रव थंडीत घशाखाली उतारवयाची प्रती ग्लास अडीच युरो व अडीच युरो ग्लास ची अमानत भरली तर ह्या ह्या वाईन चे घुटके घेत पूर्ण मार्केट आपण फिरू शकतो
.काही घोटात अंगात उष्णतेचे प्रवाह वाहू लागतो . मग शरीर बर्फाला जुमानत नाही न त्याने निर्माण झालेल्या थंडीला .एक चहाचा कप मध्ये हि वाईन नरड्या खाली उतरल्यावर मग पोटासाठी अनेक खाद्य पदार्थाच्या स्टॉल पैकी एकात जायचे .चविष्ट पारंपरिक जर्मन पदार्थ चाखायचा .तेही त्यांनी उभारलेल्या तंबूत बसून वेगळीच मजा असते .आपल्याकडे एखादा मालवणी फूड फेस्टीवल च्या वेळी जो एक प्रकारचे वातावरण असते तसे तसेच येथे हो होते.
असेच एका तंबूत शिरलो तर तेथे
भलामोठा चौकोनी तरंगता झुला व खाली भली मोठी कोळशाची शेगडी व
व त्यावर खरपूस भाजले जाणारे अभक्ष्य पाहून आपोआप भूक चाळवली गेली.
मग ग्लू वाईन घेऊन थोडे खायला घेतले , व आमचा जठराग्नी शांत केला.
.मग तांदळाचे गोड दाम्प्लिंग ( साधारण इडल्यांएवढ्या आकाराचे ) असे गरम वॅनिला सॉस बरोबर खाण्यात लई मजा आली
.त्याच्या नंतर नाताळ निमित्त कुकीज बेक्स केल्या जातात त्यात बटर /वॅनिला, चॉकलेट असे अनेक प्रकार असतात .त्याचा पण विकत घेऊन फन्ना उडवला.जर्मनीत नाताळ ह्या सणाला खूपच महत्त्व आहे. सध्याचा पोप हा जर्मन आहे, ह्यावरून कल्पना येथे की हा सण येथे अत्यंत धार्मिक व पारंपारिकरीत्या साजरा करतात. जर्मनीत जर तुम्हाला नाताळ व नववर्षांच्या शुभेच्छा एकत्र द्यायच्या असतील तर Frohe Weihnachnten und ein gutes neues Jahr असे म्हटले जाते,
जर्मनी मध्ये ख्रिसमस ची सुरुवात १ डिसेंबर च्या आधीपासून सुरु होते मात्र ६ डिसेंबर पासून त्यात खरा रंग भरू लागतो. ६ डिसेंबर हा दिवस संत निकोलस डे ह्या नावाने ओळखला जातो. ५ डिसेंबर च्या रात्री लहान मुले घराबाहेर आपले मोजे किंवा बूट बाहेर ठेवतात, ही प्रथा युरोपच्या अनेक देशांमध्ये आढळून येते, जर्मन दंतकथेनुसार ह्या रात्री संत निकोलस चा आत्मा बुक ऑफ सीन ह्या नावाचे पुस्तक घेऊन फिरत असतो ह्या पुस्तकात वर्षभरात मुलांनी केलेल्या दंगा मस्ती ची नोंद केली असते. असे म्हणतात की चांगल्या मुलांच्या मो ज्यात निकोलस चॉकलेट व गोड पदार्थ ठेवतो , तर मस्तीखोर मुलांच्या मो ज्यात फक्त हिरवी पाने ठेवतो. जर्मनीत अद्वेंत व्रेअथ्स ला ह्या सणामध्ये खूप महत्त्व आहे, हिरव्या पानांची वर्तुळाकार रिंग व मधोमध चार लाल मेणबत्त्या असतात , ह्या चार मेणबत्त्या म्हणजे सरत्या चार आठवडे ख्रिस्ताच्या जन्माची वाट पाहण्याच्या असतात, ती मेजाच्या मध्यभागी घेवून दर रविवारी एक मेणबत्ती पेटवली जाते. आणि ख्रिसमस इव च्या दिवशी शेवटची मेणबत्ती पेटवली जाते , प्रत्येक मेणबत्ती ही लहान मुलांना नाताळ येण्यास किती दिवस राहिले ह्याची आठवण करून देत असते.
महत्त्वाची गोष्ट जी मला यंदा कळाली की नाताळचे अविभाज्य घटक असलेला ख्रिसमस ट्री ही संकल्पना जर्मनीतून उगम पावली. जर्मन प्रथेनुसार ख्रिसमस ट्री च्या सजावटीत लहान मुलांना भाग घेऊ देत नाहीत. त्यांच्या समजुती नुसार ह्या ख्रिसमस ट्री वर रहस्यमय शाप असतो म्हणूनच वडील लहान मुलांना वेगळ्या खोलीत ठेवून आई हे झाड केंडी, नट्स, कुकीज , कार्स ,ट्रेन्स , अंजेल . आणि घरातील पारंपरिक गोष्टींच्या सहाय्याने सजवले जाते, झाडाखाली लहान मुलांच्या भेटवस्तू ठेवल्या जातात. व शेजारी मिठाया व चॉकलेट ह्यांच्या थाळ्या सजवून ठेवल्या जातात मग सर्व तयारी पूर्ण झाली की लहान मुलांना खोलीत बोलावले जाते , व ते बोलावण्याची सांकेतिक खुण म्हणून वडीलधारी मंडळी घंटी वाजवून करतात. ह्या काळात मुलांना नाताळच्या गोष्टी वाचवून दाखवल्या जातात व करोल गायले जातात. लहान मुलांसोबत गिफ्ट उघडले जातात.
ह्या निमित्त केट ने मला संत निकोलस ची आठवण सांगितली ,ती ८ वर्षांची असतांना संत निकोलस त्यांच्या चक्क वर्गात आला त्यांच्या हातात एक बुक ऑफ सीन चे पुस्तक होते , व त्याने वर्गातील सर्व मुलांचे वर्षभरातील कारनामे वाचून दाखवले, सर्व मुले चकीतच झाली , मग त्याने चांगल्या मुलांना खाऊ दिला , आता केट ला असे वाटते की तिच्या शिक्षिकेने त्या निकोलस चा वेश धारण केलेल्या व्यक्तीला ते पुस्तक देऊन आतल्या गोटातील गोपनीय माहिती पुरवली होती. पण तिला खाऊ मिळाला की नाही ह्या माझ्या प्रश्नाला मात्र तिने बगल दिली.
संध्याकाळी ख्रिसमस इव ला खाद्यपदार्थांची जंत्री असते. खारवलेले वराह मास ,पांढरे सोसेज , माक्रोनी सेलेड रैस ब्राय म्हणजे गोड सिनमन आणि अनेक स्थानिक खाद्य पदार्थ असतात. ख्रिसमस इव येथे डिक बाऊ ह्या नावाने ओळखली जाते.डिक म्हणजे जाडा आणि बाऊ म्हणजे पोट म्हणजे जाडे पोट कारण जर्मन दंतकथेनुसार ह्या संध्याकाळी जो भरपेट जेवत नाही त्याला वाईट आत्मे ,पछाडतात म्हणून सगळे पोट गच्च भरेपर्यंत खातात. दुसर्या दिवशी ख्रिसमस डे ला सर्व परिसरासह मोठी मेजवानी केली जाते.
ह्यातील उल्लेखनीय स्थानिक पदार्थ म्हणजे प्लम रोस्ट गुस , ख्रिस्तोनेल म्हणजे पावत मनुका , बेदाणे , काजू व इतर सुकामेवा ठासून भरला असतो, लेब कुखन, मार्झीपेन , आणि ड्रेस्डेन स्टोलेन असे अनेक खाद्य पदार्थांची रेलचेल असते. ख्रिसमस ट्री हा जर्मन नाताळचे खरे आकर्षण पण २३ डिसेंबर च्या आधी ते उभारायचे नसते. असा वैशिष्ट्यपूर्ण जर्मन नाताळ म्हणजे अनेक दंतकथा , प्रथा ,परंपरा ह्यांचे मिश्रण असते. २५ व २६ हे सार्वजनिक सुट्टीचे दिवस असतात. जर्मनीत सार्वजनिक सुट्टी म्हणजे आपत्कालीन सेवा सोडल्यास सर्व म्हणजे दुकान , बार ,उपाहारगृह सारे बंद थोडक्यात कर्फ्यू सदृश परिस्थिती असते. येथे रविवारी सुद्धा हीच परिस्थिती असते. जेव्हा लोकांना सुट्टी असते तेव्हा खरे तर भारतात लोक घराबाहेर पडतात , सिनेमा ,खाणे पिणे खरेदी ह्यांना बहर आला असतो , नेमका ह्याच्या उलट परिस्थिती जर्मनीत असते. ह्याचे कारण धार्मिक आहे. जर्मनी हा अधिकृतरीत्या ख्रिश्चनांचा देश आहे, व त्यांच्या धर्मानुसार रविवार हा परिवारातील सर्व सदस्य घरी एकत्र जमून येशु ची आराधना करावी अशी धार्मिक वागणूक सरकार व येथील धर्मसंस्था ह्यांना अपेक्षित असते म्हणूनच येथे सरकार तर्फे रविवार हा सर्व काही बंद करून लोकांनी घरी राहावे . म्हणून हा कडकडीत बंद असतो. लंडन मध्ये तर लोकांनी ह्या दिवशी बाहेर प्रवास करू नये म्हणून सार्वजनिक सेवा खंडित केल्या जातात. .
( .एकाच गोष्टीचे आमच्या बाई साहेबांना दुख वाटले. ते म्हणजे जर्मनीत अनेक ठिकाणी मार्केट असतात ,तेथे एक परंपरा म्हणून एक उंच व भलामोठ्ठा डेरेदार पाईन वृक्ष जो ख्रिसमस त्रि म्हणूनही ओळखला जातो तो तोडून मार्केटच्या मध्यभागी उभारून सजवला जातो .अर्थात जानेवारीत त्याचे तुकडे तुकडे सरपण म्हणून वापरले जातील .येथील वृक्ष चांगला ८० वर्ष जुना होता .केट म्हणाली ८० वर्ष हा वृक्ष उभा होता डवरला होता तो ह्या दिवसाची वाट पाहत कि एखाद्या नाताळात माझा नंबर येणार आणि मी असा मुळापासून वेगळा होऊन शोभेचे झाड म्हणून महिन्यांपुरतेच उभे राहणार .तिचे हे पर्यावरणाचे अनोखे ममत्व पाहून माझ्याही काळजाला पाझर फुटला नि माझ्यातला जय राम जागा झाला .मी म्हणालो अग वेडे तो ८० वर्ष ह्याच दिवसाची तर वाट पाहत होता त्याच्या जजमेंट डे ची . अगदी दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांचे विमानातील पडणारे अग्नीचे गोळे त्याला ठार करू शकले नाही ते स्वकीयांचा परंपरेने केले .(आमच्या कडे हिंदीत ह्या प्रसंगाच्या साजेसे एक गाणे आहे दुश्मन न करे दोस्त न वो काम किया हे ) तर मथितार्थ काय तर त्या वृक्षाचा परंपरेसाठी बळी गेला .आमच्या कडे भारतात बळी जातो ते आमच्या वाढत्या लोकसंख्येच्या उदरभरणासाठीची सोय म्हणून . विकासासाठी , पण अजूनही आम्ही म्हणतो वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरी.
सविस्तर वर्णन. भारतीय असो कि विदेशातला सण म्हटला कि भरभरून आठवणी असतात.
उत्तर द्याहटवातुझ्या लेखाच्या निमित्तानं तू मला माझ्या पहिल्या Weihnachnten ची आठवण करून दिली. खरे म्हणजे ती एक गम्मतच होती. मला तर Weihnachnten नावाबद्दल असे वाटायचे कि ते त्या दिवसात Weihnachnten markt ग्लूवाईन पितात म्हणून पडले असावे!
असो, अवांतर माहिती...सध्या माझे वास्तव्य स्टोकहोम येथे आहे आणि स्वीडिश मध्ये ख्रिसमसला यूल असे म्हणतात!
ख्रिस्तमस ट्री ची तुझी फिलोसोफी परफेक्ट फीट, एकदम आवडली. ती सिद्ध करते कि तूझे roots पक्के भारतीय आहेत.. फक्त भारतीय विचारसरणीच असा निर्विकार, परोपकारीं, निस्वार्थी आणि सर्वात महत्वाची म्हणजे त्यागाची शिकवण देतो. (जरी का ती आजकाल अभावानेच आचरणात असते) परंतु तेही नसे थोडके.
फोटो मुळे लेखाला झळाळी आलीये!.
पराग तुझ्या प्रतिसादाने मला नेहमीच हुरूप मिळतो.
उत्तर द्याहटवाआता औपचारिकरीत्या उगाच मी तुझे आभार मानत नाही , पण तुझे माझ्या अनुदिनीवर असेच लक्ष असू दे. व काही सल्ले ,सूचना असल्यास खुशाल लिही.