जर्मनीत महिन्याच्या शेवटच्या शनिवारी बॉलीवूड सिनेमे बहुतांशी शाहरूख खान ,चोप्रा जोहर प्रभूतींचे जर्मनीतडब करून दाखवतात. कालच रा १ हा शिणेमा दाखवला.
तो पाहून एकेकाळी ह्या सिनेमावर व्यक्त केलेले माझे मत आज अनेक दिवसांनी ह्या ब्लॉग वर देत आहे. मधल्या काळात माझा ब्लॉग हिम निद्रेत होता.
आता जमेल तसे त्यावर खरडाखरडी करत राहील.
तो पाहून एकेकाळी ह्या सिनेमावर व्यक्त केलेले माझे मत आज अनेक दिवसांनी ह्या ब्लॉग वर देत आहे. मधल्या काळात माझा ब्लॉग हिम निद्रेत होता.
आता जमेल तसे त्यावर खरडाखरडी करत राहील.
रा १ असा अत्यंत फुटकळ पटकथा असलेला ,सुमार व भिकार अभिनय , अत्यंत फालतू डायलॉग व अर्थहीन डायरेक्शन ( हा सिनेमा २००७ साली बनविण्याचे ठरवले तेव्हा पासून आजतागायत बनलेल्या ह्या सिनेमात अनेक प्रसंगांची ठिगळ लाऊन बनवलेला वाटतो. कथेची मूळ संकल्पना व्हिडीयो गेम व मुले अशी भन्नाट असली तरी
कथा मात्र एकदम फालतू . मुळात एका संगणक खेळ निर्माण करणारा हुशार दाक्षिणात्य अभिनेता एवढा बावळत दाखवणे. ह्यात जर्मन जाहिरातीची नक्कल करतांना डॉक्टर लहान मुलगा जन्मल्यावर त्याने रडावे म्हणून फटका देतो तेव्हा हा हुशार अभियंता त्या डॉक्टर ने आपल्या पोरावर हात उचलला म्हणून त्यांची धुलाई करतो. व हाच अभियंता गांधी ह्यांच्या अहिंसेचे तत्त्व चोरा समोर सर्व पैसे प्रतिकार न करता देऊन करतो .
'' अरे भारतीय पब्लिक म्हणजे ह्यांना वाटले काय ?( आधीच सांगायचे मेंदू बाहेर ठेवून सिनेमा पाहायला या .) जे सलमान च्या सिनेमात आपण नेहमीच न सांगता करतो .म्हणून अपेक्षाभंग होत नाही. पण हा सिनेमा
अनिवासी भारतीय(, परदेशात जन्मलेले ) व पाकिस्तानी बांगलादेशी व काही गोरे ह्यांना हा सिनेमा जबरदस्त आवडेल.(कथा आणी तिच्या सादरीकरणात रेड्डी सारख्या सिनेमांना सकस स्पर्धा निर्माण झाली आहे.) बाळबोध विनोदांचा लुफ्त घेतांना वर उल्लेख केलेल्या वर्गाला अनेकदा पहिले आहे. त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणून हा सिनेमा येथे जर्मन मध्ये संस्करीत केला आहे.
येथील लोकांमध्ये व प्रसारमाध्यमात तो चांगलाच लोकप्रिय आहे. येथील सरकार सुद्धा त्यांच्यावर मेहरबान आहे. येथील लोकांमध्ये व प्रसारमाध्यमात तो चांगलाच लोकप्रिय आहे. त्यांच्या कोणत्याही व कसल्याही शिणेमाला येथील लोक डोक्यावर घेतात.
केट ला रुकरुक खान आवडतो.( तर मला आमीर) तिच्या मते कथा , अभिनय ह्या साठी बॉलीवूड येथे प्रसिद्ध नाहीच आहे. ते प्रसिद्ध आहे ते त्याच्या गाण्यांसाठी
त्यात शाहरूखला शिणेमा बनविण्यापेक्षा विकता चांगला येतो . 2o हून जास्त ब्रेन्ड शी करार झाला आहे. १२५ करोड हून जास्त खर्च झालेला सिनेमा साडे तीन हजार पडद्यावर झळकला. ह्यात ४०० थ्रीडी पडदे आहेत.
ह्या सिनेमा द्वारे शाहरूख चे पुनरागमन होणार आहे. तेव्हा हा सिनेमा कमी आणी शाहरूख एक ब्रॅन्ड म्हणून प्रस्थापित करण्याकडे त्याचा कल दिसत आहे.
शटर आयलंड् सारख्या दर्जेदार रहस्यमय सिनेमा आणि त्यातील नायक अर्धा जर्मन लीओनोर्डो ( जो मोडके तोडके जर्मन बोलतो) व
त्याचा सिनेमा बर्लिन मध्ये लीओ च्य जन्मगावी प्रदर्शित होत असतांना सर्व बर्लिनकर माय नेम इज खान च्या रंगात रंगलेले पाहून मी तर थक्क झालो होतो .
''माझा सिनेमा काहींना आवडले ,काहींना आवडणार नाही ,पण हा सिनेमा बॉलीवूड मध्ये मैलाचा दगड ठरेल'' - इति शाहरूख खान
बाकी दिवाळी - शाहरूख ,ईद - सलमान खान - क्रिसमस - आमीर खान
असे प्रत्येक सणाच्या दिवशी हे त्रिकुट सर्वसामान्य भारतीयांच्या आयुष्यात डोकावते.
ह्या सिनेमात रजनी चे आगमन अनाकलनीय आहे. उथळ व सवंग प्रसिद्धीचा तो केविलवाणा प्रसंग आहे. नवरा अकस्मात वारल्याचा धक्क्यातून करीना क्षणार्धात चिट्टी चे आगमन झाल्यावर पांचट विनोदी अभिनय करते.हे पाहिल्यावर तिचा बॉडी गार्ड मधील अभिनय बरा म्हणावा ( त्यात निदान ती तिच्या भूमिकेशी प्रामाणिक राहिली आहे ,)
सिनेमातील ग्राफिक्स आजपर्यंत बॉलीवूड मधील अव्वल दर्जाचे आहे व त्याने बॉलीवूड मध्ये अश्या प्रकारची डिजिटल त्रिमिती सिनेमांचे पेव फुटेल .
मात्र ह्याच जातकुळीतलं अनेक हॉलीवूड सिनेमे निकृष्ट कथा व ठून भिकार तिचे सादरीकरण व सुमार अभिनयाने साफ झोपले .
रा १ वर १७५ कोटी खर्च झाला असून तो कसाबसा वसूल होईल असे वाटते ( शाहरूख ने शेखर कपूर ला दिग्दर्शक म्हणून घेतले असते तर समीकरण खूपच वेगळे असते ) त्याने आमीर खान ला घेऊन काल यंत्रावर सिनेमा सुरु केला होता. पण तो काही कारणाने पूर्ण झाला नाही.मुळात आंतरराष्ट्रीय पातळीवर सिनेमा बनविण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे.
त्यांची हुशारीबद्दल वेगळे लिहायला नको.
पण तुटपुंज्या तंत्रज्ञान असतांना त्याने मिस्टर इंडिया बनवला. ह्यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सर्व पात्रांकडून अभिनय करवून घेतला व मिस्टर इंडियाच्या अदृश्य होण्यामागील लॉजिक दर्शकांना पटवून देण्यात यशस्वी ठरला .व त्यात नायिकेला बर्या पैकी वाव होता.
.( करीना चा त्या मुलासोबत गाडीतील प्रसंग विशेषतः तिच्या डोळ्यांचा रंग व आवाज बदल्यांचा प्रसंग मस्त जमलाय तिलाच खलनायक म्हणून काहीकाळ आणले असते तर ते अर्जुन व त्या चीनी अभिनेत्यां पेक्षा नक्कीच सरस वाटले असते.)
सतीश शहा व अनेक अभिनेत्यांना वाया घालवण्यात आले आहे.
शाहरूख यावेळच्या पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट सिनेमा व नायक ,नायिका पटकथा ,संगीत अश्या कुठल्याही गटात पुरस्कार मिळवू शकत नाही. तेव्हा आपल्या लाडक्या फिल्म फेअर मध्ये तांत्रिक बाबींमध्ये अजून काही श्रेणी निर्माण करायला लावेल.( त्या शेत्रात त्यांचे पुरस्कार नक्की आहेत.)
पण थोडक्यात रा १ सिनेमाचे वर्णन उल्हासनगरचे फटाके असाच होईल.
''बुराई संग जो मेल रचाया ,तो कभी न छुटे उसका साया''
आताच नेट वर ऑन लाईन रा वन पहिला .
त्यातील बोध वाक्याला स्मरून हा बुरा म्हणजे अत्यंत बुरा सिनेमा थिएटर मध्ये अजिबात पाहणार नाही आहे .
कारण बुराई शी उगाच मेल कशाला रचायचा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा