संध्याकाळी प्रसिद्ध सनसेट पोइंत कडे आम्ही निघालो. प्रसिद्ध दुध तलाई लेक जवळ हे ठिकाण आहे. तेथून रोपवे ने डोंगरावर पोहोचलो. तेथे करणी मातेचे मंदिर आहे. मंदिरात श्वेत मूषक पिंजर्यात बंदिस्त होते. आम्ही मात्र डोळे विस्फारून सूर्यास्त , आणि आकाशातील रंगाची उधळण व त्यात न्हाहून निघालेले उदयपुर पाहत होतो. तेथून ,सिटी पेलेस ..जगमंदिर सारेच गोजिरवाणे दिसत होते.
एक अनिवासी भारतीय ह्या नात्याने जगभरातील माझ्या मराठी बांधवांशी व माय मराठीची नाळ जोडली जावी म्हणून माझ्या जर्मनीतील वास्तव्यातील माझे अनुभव ,प्रवास वर्णन , आंतरराष्ट्रीय राजकारण ,सद्य परिस्थितीवर भाष्य करणारा हा पंचतारांकित ब्लॉग आठवड्यातून एकदा अद्ययावत ( अपडेट ) करायचा प्रयत्न करेन.
बुधवार, १८ सप्टेंबर, २०१३
दास्तान ए हिंदुस्तान भाग ३( उदयपुरी मनोरम सूर्यास्त आणि भव्य रेणकपूर जैन मंदीर )
संध्याकाळी प्रसिद्ध सनसेट पोइंत कडे आम्ही निघालो. प्रसिद्ध दुध तलाई लेक जवळ हे ठिकाण आहे. तेथून रोपवे ने डोंगरावर पोहोचलो. तेथे करणी मातेचे मंदिर आहे. मंदिरात श्वेत मूषक पिंजर्यात बंदिस्त होते. आम्ही मात्र डोळे विस्फारून सूर्यास्त , आणि आकाशातील रंगाची उधळण व त्यात न्हाहून निघालेले उदयपुर पाहत होतो. तेथून ,सिटी पेलेस ..जगमंदिर सारेच गोजिरवाणे दिसत होते.
मंगळवार, १० सप्टेंबर, २०१३
आठवणीतला गणराया
प्रथम तुला वंदितो ह्या गाण्यांसोबत पार्वतीच्या बाळा व चिक मोत्याची माळ अशी विविध वर्गात लोकप्रिय बाप्पाची गाणी दिवसभर सार्वजनिक मंडपात दिवसभर लावली जात. आज गणरायाची हि गाणी कानावर अनेक वर्ष कानावरून गेली असल्याने आता परदेशात नीरव शांततेत नुसते डोळे जरी मिटले तरी तो मंडप , त्याभोवती असणारे कार्यकर्ते , गुलाल अबीर ह्यांची रंगसंगती डोळ्यासमोर येते , लहान मुले अवती भोवती बागडताना दिसतात. मंडपाच्या मध्यभागी गणेशाची मूर्ती दिसते.
गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१३
टीचर्स डे ,सरकारी सेक्युलर दांभिकता
मुळात उठसूठ डे साजरे करणे हि परकीय संस्कृती राज्यकर्त्यांनी अनेक गोष्टींप्रमाणे शिक्षक दिन साजरा करतांना ह्यावेळी सुद्धा ती पाळली. परकीयांच्या अनेक उधार घेतलेल्या गोष्टींचे हे एक अजून उदाहरण ,आपल्या संस्कृतीत गुरु पौर्णिमा हा सण आहे , व त्यांचे महत्त्व
परदेशात सुद्धा मानले जाते ,
शिक्षक हा सुशिक्षित करतो तर गुरु सुसंस्कृत
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)