संध्याकाळी प्रसिद्ध सनसेट पोइंत कडे आम्ही निघालो. प्रसिद्ध दुध तलाई लेक जवळ हे ठिकाण आहे. तेथून रोपवे ने डोंगरावर पोहोचलो. तेथे करणी मातेचे मंदिर आहे. मंदिरात श्वेत मूषक पिंजर्यात बंदिस्त होते. आम्ही मात्र डोळे विस्फारून सूर्यास्त , आणि आकाशातील रंगाची उधळण व त्यात न्हाहून निघालेले उदयपुर पाहत होतो. तेथून ,सिटी पेलेस ..जगमंदिर सारेच गोजिरवाणे दिसत होते.
चंद्रोदय व चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेले उदयपुर
सकाळी आम्ही उदय पूर सोडले आणि गाडी रानकपूरच्या दिशेने जाऊ निघाली.रानकपूर हे अरवलीच्या पर्वत रांगामध्ये वसले असून जैनच्या पा
च पवित्र तीर्थशेत्रांपैकी एक आहे: येथील प्रमुख आकर्षण रानकपूर जैन मंदिर आहे.
राणा कुंभाच्या कारकिर्दीत त्यांच्या मदतीने त्याकाळातील सर्वात श्रीमंत भारतीय जो एक जैन व्यापारी होता सेठ धरणा साह ह्याने पंधराव्या
शतकात जैनांचे सर्वात मोठे जगप्रसिध्ध मंदिर उभारण्यात आले:म्हणूनच राणा कुंभाच्या आदराप्रीत्यार्थ ह्या जागेचे नाव रानकपुर पडले. व आजही त्यांच्या पवित्र दिवशी ह्या धारणा साह च्या परिवारातील वंशज ह्या मंदिरात येऊन पूजा करतात. :
त्या काळात मंदिर निर्मितीला पन्नास वर्ष लागली: व खर्च त्या काळात एक कोटी रुपये आला:मंदिराच्या आजूबाजूला जंगल असून सर्वत्र घनदाट वनराई आहे.
चार मुखी मंदिर भगवान ऋषभदेवाला समर्पित असून मंदिर्याच्या मुख्य मंडपात जैनांचे पहिले तीर्थकर आदिनाथ ह्यांच्या संगमरावराच्या चार भव्य अश्य७२ इंची मुर्त्या मंदिराच्या चारही बाजूंना आहेत: म्हणूनच ह्या मंदिराला चतुर्मुख जैन मंदिर व रिषभदेव जैन मंदिर म्हणता.
मंदिर्याच्या चार भव्य प्रवेश दारांपैकी पुढील दारातून आम्ही आता प्रवेश केला: ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे १४४४ संगमरवरी नक्षीदार खांब आहेत.जेथे पाहावे थेथे खांबच खांब दिसत होते.आणि त्यांची रचन अश्या खुबीने केली आहे कि कुठंही मंदिराचे मुख्य प्रार्थना स्थळ दिसते. आणि प्रत्येक खांबावर वेगळे नक्षीकाम केले आहे. मंदिरात २४ मोठ्या खोल्या आहेत.मंदिराच्या मंडपात जैनच्या २४ तीर्थकरांची शिल्पे कोरली आहेत. मंदिरात चार मोठे प्रार्थनेसाठी मंडप आणि चार पूजाअर्चा करण्याचे मंडप आहेत. मंदिराच्या भव्य आवारात नेमीनाथ आणि पारसनाथ ,सूर्य , आणि आंबा मातेचे अशी अन्य मंदिरे सुद्धा आहेत. ज्यावरील नक्षीकाम खाजुरावो च्या शैलीत केले आहे. आणि ८ व्या शतकात बांधलेल्या सूर्य मंदिरात योद्धे आणि घोड्याची शिल्पे साकारली आहेत.
हे चित्र पाहुन मान काही केल्या खाली करवत नव्हती .
येथील मुख्य पुजार्याने अजून एक महत्वाची माहिती दिली कि मुघल आक्रमणात मंदिरातील प्रमुख मुर्त्या तळघरात लपवून ठेवल्या. पुढे अनेक वर्षानंतर ह्यातील काही मुर्त्या शोधून वर परत प्रस्थपित करण्यात आल्या.
मात्र अनेक मूर्त्यांचा अजून शोध लागला नाही आहे. ह्या तळघरात मुख्य पुजारी ध्यान करतात. त्यांनी पुढे मंदिराच्या उत्तरेला स्थित रायन झाड दाखवले. अत्यंत प्राचीन . ह्या झाडाच्या बुंध्याशी नैसर्गिक अवस्थेत गणेशाचे शिल्प आहे. ते पाहतच माझे हात आपसुकच जोडल्या गेले. ह्या शिवाय संगमरवरी तुकड्यावर ऋषभ देवाचे पायाची चिन्हे दिसून येतात. ह्या दोन मजली मंदिरात अनेक तळघरे आहेत. ती त्याकाळातील भावी परकीय आक्रमणांचा विचार करून हि तळघरे बांधण्यात आली.
संपूर्ण मंदिर संगमरवरी व आजूबाजूला वनराई ह्यामुळे
मंदिरात निरव शांतता व गारवा होता, अनेक प्रसिद्ध देव स्थानात होणारी ढकला ढकली पाहता जैन मंदिरातील प्रशासन व तेथे येणाऱ्या भाविकांची शिस्तबद्धता कौतुकास पात्र होती.
गणपती बाप्पा मोरया .( नैसर्गिक स्वरुपात प्रकटलेला गणराया )
बॉलीवूड ने राजस्थान म्हणजे वाळवंट अशी आपली गोड गैरसमजूत करून दिली आहे.उदयपूर आणि त्याच्या सभोवतालचा मेवाड परिसर हा नेहमीच सदाहरित असतो.
आणी सरता शेवटी मंदिर पाहून प्रफुल्लित झालेले आम्ही
जर्मनीत भारताच्या ट्रीप बद्दल माझी पत्नी आणी तिच्या बहिणीला एक प्रश्न त्यांचे सहकारी हमखास विचारतात " भारतातील तुमचा स्मरणीय क्षण किंवा अनुभव कोणता आहे.?
ह्यावर त्यांना अपेक्षित उत्तर ताजमहाल पाहतांना आलेली अनुभूती हे असते.
मात्र माझी पत्नी आणी तिच्या बहिणीचे उत्तर मात्र ह्या जैन मंदिरात व्यतीत केलेला काळ, खर तर त्याचे भानच आम्हाला राहिले नव्हते.
अप्रतिम , सुंदर , अश्या अर्थी जर्मन शब्दांची लयलूट
दोघी जर्मन बहिणी करत असतांना माझ्या मनात विचार आला
इंक्रेडीटेबल इंडिया
मंदिर संगमरवरी असल्यामुळे आत गारवा अनुभवास मिळतो. चित्त आणी भान हरपून जाणे म्हणजे काय ह्यांचा प्रत्यय येथे येतो.. ताजमहालाच्या भिंतीवरील रत्ने, आभूषणे , माणिक ह्यांची लुटालूट झाल्याने
तो चित्रात दिसतो तेवढा काही आकर्षक वाटत नाही. किंबहुना तो चित्रातच सुंदर दिसतो. भारतातील आमच्या पाहण्यातली सर्वात आकर्षक वास्तु म्हणजे जोधपुर चा किल्ला. सदर किल्ला हा जोधपुर आणी उदयपूर च्या राजवाड्याहून अधिक लोभसवाणा आहे.. तो पुढील भागात पाहूया.
रणकपुरात आम्ही रमलो होतो. पण आम्हाला मनावर कॅम्पात जायचे होते. हा कॅम्प भर वाळवंटात उभारला होता. आणि एक राजेशाही अनुभव घेण्या आम्ही आतुर झालो होतो. येथे जवळच रणकपूर चे अभयारण्य होते. पण लवकरच भारतातील प्रसिद्ध रणथंबोर ह्या वाघांच्या गुहेत आम्ही जंगल सफारी करणार होतो. म्हणून तो मोह टाळून मनवार कॅंपाकडे मार्गस्थ झालो.
छान.. फोटो अजून थोडे मोठे असते तर अजून मजा आली असती..
उत्तर द्याहटवाअसो.. शेवटी पिकासा स्लाईडशोच्या आधी त्याचाच (बहुतेक) एच.टी.एम.एल कोड चुकून आलाय.. तो जाण्यासाठी एकतर तो काढून तरी टाकावा लागेल नाहीतर तो व्यवस्थित दिसण्यासाठी ब्लॉगर मध्ये पोस्टच्या एच.टी.एम.एल टॅब मध्ये टाकावा लागेल..
यशोधन
उत्तर द्याहटवाधन्यवाद मित्रा
अरे माझ्या दास्ताने हिंदुस्थान च्या २ र्या भागात मी पिकासाचा स्लाईड शो एच.टी.एम.एल टॅब मध्ये टाकला होता व तो व्यवस्थित चालला होता पण आता मला तो बंद दिसत आहे म्हणून ह्यावेळी दुसर्या टेब मध्ये टाकून पहिले
वेळ मिळाला की मी लक्ष देईल
सध्या ऑक्टोबर फेस्ट सुरु होणार असल्याने त्यामुळे मी व्यस्त आहे.
आक सो.. झेर गुट..!!
उत्तर द्याहटवा