शीर्षक सुचले नाही,
थांक्यू नही बोलनेका , आगे तीन लोगो की मदत करनेका
आज मैने तीन लोगोकि एकसाथ मदत कर दि
सोहेल , अरबाज ,सलमान खान की
जय हो देख लिया
हालाकी सलमान ने पहेले कहा था ,
मुझ पे एक एहेसान करना , के मुझ पे कोई एहेसान न करना,
अनेक वर्षांनी हा सलमान चा शिनेमा पाहून पकलो
नुसती मारामारी ,किमानपक्षी त्या सना ला एखादा आयटम नंबर तरी द्यायचा.सलमान चे सिनेमे म्हणजे मुन्नी , फेविकोल ह्यांची जंत्री असते. अस्तित्व सारखा सिनेमा देणारी तब्बू आणी महेश हे केवळ सलमानच्या मैत्रीखातर ह्या सिनेमात फुकट गेले.
नाही म्हणा पैसा कोणाला प्यारा नसतो.
संगीताच्या पातळीवर सिनेमाने घोर निराशा केली , म्हणजे त्याच्या सिनेमातील संगीत हे दशकातील अजरामर कलाकृती नसते ,पण सारखा कानावर मारा करून एखाद दुसरे गाणे तोंडात बसते , ते एखादा महिना गुणगुणले सुद्धा जाते, येथे तोही प्रश्न नाही.
डेझी शाह हि एकेकाळची डोंबिवलीकर
तिचे शिक्षण डोंबिवली मध्ये झाले आहे त्यामुळे आपसूकच ती फर्डे मराठी बोलते ,
तिचे बॉलीवूड मध्ये जमले नाही तर मराठी सिनेमा तिचा आधार होऊ शकतो ,
ह्या मुलीला ना अभिनय येतो ना तिच्याकडे अभिजात सौंदर्य
ना अदा
पण हिचे नशीब लाखात एक आहे. एक बेक स्टेज डान्सर ते सलमान ची नायिका म्हणजे अगदी रंगीला मधील उर्मिला सारखा तिचा स्वप्नवत प्रवास कुणालाही हेवा वाटावा असाच आहे.
जनेलीया देशमुख हिचे विशेष कौतुक
तिने एक वेगळी छोटी भूमिका साकारली.
ह्या वयात सलीम ह्याहून जास्त चांगली कथा लिहू शकतील.
एखाद्या व्यावसायिक समीक्षका सारखी मी शिनेमचि शास्त्रीय चिरफाड करत नाही.
पण सलीम खान ह्यांनी सोहेल ला जरा आवरावे.
कथा तिचा स्क्रीन प्ले ह्यांची परत एकदा उजळणी क्लास सोहेल चा घ्यावा.
ह्यात नुसते मदतीची चेन देशभर पसरवण्याचा प्रसार.
चायला सिनेमा आहे का एम वे ची एजन्सी
मला तर वाटते सलमान आम आदमी च्या पक्षात जाणार.
Blogger Gadgets
Widgets By My Blogger Tips
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा