सुरवातीपासून सांगायचे तर ह्यांची सुरवात मोदी ह्यांच्या अमेरिकन दौऱ्यापासून झाली.
मोदी ह्यांच्या अमेरिकनवारी व युएन मधील भाषाबाद्द्ल तमाम
भारतीय व परकीय प्रसार माध्यमांनी कौतुक सुमन उधळली.
पण मोदी द्वेषाने आंधळ्या झालेल्या एक विदुषीने शोधून शोधून बीबीसी हिंदी मधील एखादा लेख शोधून काढला व त्यात मोदी युएन मध्ये भाषण करतांना कसे अडखळले व त्याबद्दल परकीय माध्यमात चर्चा आहे अश्या धाटणीचा नाठाळ लेख स्वतःच्या चेहरा पुस्तकाच्या भिंतीवर चिटकवून आपली गांधी घराण्याची असलेली व नसलेली निष्ठा जपण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला ,
गंमत मध्ये
त्याचं लेखाच्या शेवटी १५ मिनिटे वेळ दिली असतांना मोदी ह्यांनी ३५ मिनिटे घेऊन आपले मुद्दे मांडले हे देखील सांगितले होते. ते वाचून न वाचल्या सारखे करून उगाच आपल्या देशाच्या पंत प्रधानांची खिल्ली उडवणारा लेख तिला जिव्हाळ्याचा वाटला ,
ह्या लेखाचा फोलपणा असा कि ह्या मुद्द्यावर खुद भारतात मोदींच्या कट्टर राजकीय विरोधकांनी छोट्या पडद्यावर एक अवाक्षर काढले नाही व त्यास दीड दमडीचे महत्त्व दिले नाही.
मला अश्या लोकांच्या बुद्धीची खरच कीव वाटते, राहुल गांधी ह्याने पंतप्रधान व्हावे असे ज्या विदुषीला मनापासून वाटते निदान तसे जाहीररीत्या लिहिले जाते त्या विदुषी कडून अलीकडच्या काळात मोदी ह्यांची जगभराच्या नेत्यांची भेटीगाठी व अमेरिकेत
अनिवासी भारतीयांकडून स्वागत ह्यामुळे वैचारिक अल्सर उबाळून आला, पुढे तर मोदी ह्यांनी अनिवासी भारतीयांच्या साठी जाहीर केलेल्या योजना प्रत्यक्षात मनमोहन ह्यांनी मांडल्या होत्या अश्या अर्थांची पोस्ट चिटकवून झाल्यावर मला राहवले नाही.
अप्रवासी भारतीयांनी ज्या मागण्या अनेक वर्ष भारत सरकार कडे केल्या त्या मनमोहन ह्यांनी पूर्ण करतो असे आश्वासन देणे पुढे जाऊन अनिवासी भारतीयांना मतदानाचा हक्क देतो असे सांगून पुढील १० वर्षात काहीही न करणे हा एक मुद्दा व मोदी ह्यांनी अनिवासी भारतीयांना प्रथमच भेटतांना ह्या योजना जाहीर केल्या. एक अनिवासी म्हणून माझ्या मुलीला भारताशी आपले नाते वृद्धिंगत करण्याची सुवर्णसंधी मिळाली. अश्यावेळी अश्या काही दळभद्री पोस्ट पाहून माथे ठणकते.
गेल्या दहा वर्षात यु पी ए चा भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त भ्रष्ट सरकार असा उल्लेख केला जातो अश्या सरकारचे नेते म्हणून गुळाच्या ढेपेला चिटकून राहणाऱ्या मुंगळ्याप्रमाणे
वर्तन असणारे व आपल्या सरकार मधील भ्रष्टाचार असाहाय्यतेने पाहणाऱ्या कलियुगातील धूत राष्ट्राबद्दल मला आदर बाळगा असे सांगणाऱ्या तथाकथित विदुषीने मला तिच्या मित्र यादीतून वगळले व मोठ्या फुशारकीने आपल्या चेपुच्या भीतीवर ह्याबद्दल खरडले.
ह्या विदुशीची चेपुची भिंत पहिली तर मध्यमवर्ग , ब्राह्मण त्यांच्या मानसिकतेविषयी ह्यांच्या विषयी अनेक प्रकारे निंदा नालस्ती चालते. त्यांना उपदेशाचे डोस पाजले जातात.आमच्या समाजात मुलांना इंजिनियर व्हावेसे वाटत नाही कारण त्यांच्या नात्यातील कोणाचे तरी स्वतःचे इंजिनिअरचे कॉलेज असते अश्या बढाया मारून बुद्धिजीवी मध्यम वर्गीयांची खिल्ली उडवली जाते. सत्तेचा माज असणार्या अश्या लोकांचे पानिपत नजीकच्या निवडणुकीत होईलच मग आपले लेख विविध वृत्तपत्रातून कसे आणायचे स्वतःच्या ब्लॉग ला ह्या न त्या प्रकारे बक्षिश कसे मिळवायचे हा तिच्यापुढे यक्षप्रश्न उभा राहील. तो मुद्दा वेगळा. प्रत्यक्षात आजही ह्यांच्याकडे महिलांना घराचा उंबरठा ओलांडता आला नाही आहे , स्त्री भ्रूण हत्या व अनेक सनातनी खुळचट रूढी नच्या मध्ये ह्यांची लोक अडकली आहेत त्या बद्दल चाकर शब्द काढला जात नाही.
आपण एखाद्या व्यक्तीचे जाहीर नाव लिहिले नाही म्हणजे त्यांच्या विषयी काही लिहिण्याचा परवाना आपणास मिळाला आहे असा काहीच समज ह्या विदुशीचा आहे. तिची नुकतीच एक पोस्ट वाचण्यात आली होती त्यात तिने आपल्या एका मैत्रिणीचे नाव जाहीर न करता तिच्या आर्थिक परिस्थिती व तिच्या नवर्याचे दारू पिणे , अभक्ष्य भक्षण करणे अश्या अनेक खाजगी व वैयक्तिक गोष्टींवर जाहीररीत्या लिहिले होते. तिचा तिच्या मैत्रिणीने तिच्यावर केलेल्या टिप्पणी ने दुखावून जाऊन तिच्या बिचार्या नवर्याला ह्या प्रकरणात नाहक ओढून आपली वैचारिक कुवत दाखवून दिली.
मला मित्र यादीतून वगळून जर राहुल मोदींना हरवून पंत प्रधान होणार असेल व त्याला ब्रिक देशांच्या संबंधी अमुल्य मार्गदर्शन करण्याची संधी ह्या विदुषीला मिळणार असेल म्हणजे अशी राजकीय महत्त्वाकांक्षा जाहीररीत्या सांगून स्वतःचे हसे करून घेणाऱ्या स्वतःची प्रत्येक पोस्ट म्हणून लाल करणाऱ्या विदुषीच्या आत्मप्रौढी पोस्ट पासून सुटल्याचा निःश्वास म्हणून हि पोस्ट लिहिली ,
अवांतर , त्या महान विषयीच्या स्वतः विषयी रोज नित्य रोज मारत असणार्या टिमक्या बढाया वाचून काही काळ माझे फु बाई फु धाटणीचे मनोरंजन व्हायचे हे प्रांजळ पणे कबूल करतो.
त्या आनंदास आता मी मुकलो.
पण तुम्ही राहुल सोनिया त्यांचे खंदे , कर्तबगार साथीदार ह्यांची स्तुती सुमने गाणार्या काही ओळी तुमच्या चेपू च्या भिंतीवर टाका
व मग त्या विदुशीची मैत्री झाली की रोज फुकट घरबसल्या
बढाया युक्त पोस्ट हमखास वाचा , व निर्भेळ हसा.
आजच्या ताणतणावाच्या काळात हसाल तर वाचाल अनेक दुर्धर रोगांपासून
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा