हिमवर्षाव

Blogger Tricks

रविवार, २५ जानेवारी, २०१५

भारतीयांचा भारतीयासाठी पाहण्याजोगा बेबी

बेबी
वेनस्डे सारखा     सिनेमा देणार्‍या नीरज पांडे ने स्पेशल २६ सारखा सिनेमा बनवून आपले पहिले यश हा निव्वळ हा योगायोग नव्हता हे सिद्ध केले होते. आणि ह्या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाले ते बेबी पाहिल्यावर.
हॉलीवूड धाटणीचे कथा सादरीकरण ,चित्रीकरण अभिनय , कुठेही बटबटीतपणा  अतिरंजित सादरीकरण न होता  रोमांचक थरारक व क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारा सिनेमा म्हणणे बेबी

आपले सुपर स्पाय व सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित देवोल  ह्यांच्या व्यक्ती रेखेशी साधर्म्य असणारे पात्र

डॅनी डेंझोग्पा

  ने मस्त साकारली आहे , अक्षय कुमार चा संयत व वास्तववादी अभिनय

अनुपम व केके मेनन चा नेहमी सारखा सफाईदार  वावर  त्याला
राणा डुग्गुबाटी व तापसी पन्नू  ह्यांची मोलाची साथ लाभली आहे.
इस्तंबूल , दिल्ली , मुंबई , नेपाळ , सौदी अरेबिया अश्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर हा थरार रंगतो , सिनेमाची प्रत्येक फ्रेम
उठावदार झाली आहे आपल्याला क्षणभर सुद्धा उसंत घेऊ देत नाहीत.

सिनेमाची कथा सविस्तर सांगून मला तुमचा रसभंग करायचा नाही आहे.  मुंबई ताज हल्ल्यांच्या नंतर  भारताने एक स्पेशल टास्क ग्रुप बनवला ,  ज्यांना जगातील सर्वोत्तम प्रशिक्षण जगभरात पाठवून मिळवले , त्यांचे प्रमुख काम जगभरात भारताच्या मुळावर आलेल्या दहशतवाद्यांना भारताबाहेर जाऊन कंठस्नान घालणे असते , हि लोक पकडली गेली तर भारत सरकारशी त्यांची जबाबदारी नाकारणार ह्यांची ह्या लोकांना पूर्णपणे कल्पना दिलेली  असते ,थोडक्यात ही लोक देशासाठी नुसती मरायला नाही  तर जगायला तयार असतात,
  ,ह्या लोकांना   आपला सहकारी परदेशी सरकारच्या ताब्यात जाऊ नये ह्यासाठी त्याला अत्यंत जखमी अवस्थेत असतांना इस्पितळात नेण्यापेक्षा त्याला गोळी मारून देशाचा गद्दारांचा  पाठलाग करणे त्यांना सयुक्तिक वाटते. सिनेमातील भटकळ व मुंबई हल्ल्याचा सूत्रधार  मौलाना मसूद अजहर च्या व्यक्ती रेखांशी साधर्म्य   साधणारे पात्र ह्या सिनेमात दाखवून सिनेमा अधिक वास्तववादी केलेला आहे.

   अश्या अनेक गोष्टी आजपर्यंत भारतीय प्रेक्षकांनी पहिल्या नव्हता .थोडक्यात टिपिकल बॉलीवूड फिल्मी तडका नसून हा सिनेमा नवीन आधुनिक दहशतवादी युगात एका राष्ट्राने आपले संरक्षण कसे करावे व त्यास सरकार व जनतेने कशी साथ द्यावी ह्यांचे उत्तम उदाहरण आहे.
आत्मभान जागृत झालेल्या नव्या भारताची कहाणी सांगणारा हा सिनेमा जास्ती जास्त भारतीयांनी पाहणे गरजेचे आहे , त्यासाठी हा सिनेमा करमुक्त असणे गरजेचे आहे.
सिनेमात एकमेव गाणे  कठोर व पाषाणहृदयी अधिकार्‍याचे  आपल्या घरात बायकोशी मुलांशी असलेले नाते तरलतेने व्यक्त करते. . सुदीप चॅटर्जीचा कॅमेरा संपूर्ण सिनेमात चोख कामगिरी बजावतो. त्याच्यापाठी इक्बाल , दोर सारख्या सिनेमाचा अनुभव आहे.  त्या सिनेमासारखाच ह्यात सुद्धा     मानवी नातेसंबंध , व्यक्तिरेखांच्या भावमुद्रा व्यवस्थित टिपल्या गेल्या आहेत , तसेस चक दे इंडिया मध्ये केले तसे तणाव पूर्ण वेगवान क्षणाचे  चित्रीकरण  ताकदीने ह्या सिनेमात केलेले आहे.
दहशतवादाचे अनेक कांगोरे ह्या सिनेमात उलघडले आहेत ,

सोशल मिडीयाने जगभरातून कोठेही कुणाशी संपर्क साधून माथी भडकावणे व घातपाती कृत्ये पार पडणे कसे शक्य असते. किंवा पंतप्रधान कार्यालयात घडणारे संभाषण अश्या अनेक गोष्टींवर तो भाष्य करतो.
अक्षय कुमारने हा सिनेमा नमो ह्यांनी पाहावा अशी इच्छा व्यक्त केली आहे , माझ्यामते तद्दन मसाला व गल्लाभरू सिनेमे आपण नेहमीच आवडीने पाहतो पण हा सिनेमा न चुकता पाहायलाच हवा ह्यासाठीच हा लेखन प्रपंच
 सदर सिनेमावर  अपेक्षेप्रमाणे पाकिस्तान मध्ये बंदी आहे.
त्याच्या वाहिन्यांवर शरीफ ह्यांनी चांगले वाईट असा मतभेद न करता दहशतवादी संघटनेचा निःपात करण्याच्या घोषणेची खिल्ली उडवली आहे.  एकीकडे तेहेरीके तालिबान वर कारवाई व दुसरीकडे जमाते उद्दावा वर मेहेर नजर त्यांच्या कराची येथील मेळाव्यासाठी  साठी सरकारी रेल्वे गाड्या सोडणे असे दुटप्पी धोरणावर टीका होत असतांना ह्या समस्येवर उत्तर देण्याचा बेबी प्रयत्न करतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips