मोदींचा विजयी अश्वमेध आप ने दिल्लीत रोखला ह्याचा ज्याचा जास्त आनंद आप समर्थकांच्या पेक्ष्या जास्त आनंद हा मोदी विरोधकांना झाला., त्यात मित्र पक्ष सुद्धा आहे.थ्री इडियट ह्या सिनेमाटेल एक वाक्य येथे नमूद करावेसे वाटते.
जब दोस्त फेल हो जाये तो बुरा लगता हे पर जब दोस्त पेहेला आ जाये तो और भी बुरा लगता हे
असेच काही शिवसनेचे इतके दिवस झाले होते , आज ह्या निमित्ताने त्यांनी खास पत्रकार परिषद घेऊन आनंद साजरा केला
इतर राज्यातील निवडणुकी च्या निकालावर ममता व उद्धव साहेबांनी दिलेल्या प्रतिक्रिया वाचून सुख हे शेवटी मानण्यात असते हेच सिद्ध झाले. आपल्याला नाही पण कोणाला तरी जमले ह्यातच ते खुश होते, कम्युनिस्ट
पक्षाच्या ऐवजी ममता ला संधी देऊन बंगाली जनता आता भाजपला संधी देईल का ह्या भीतीने ग्रस्त ममता ह्यांना आप चा विजय दिलासा देणारा ठरला.
मुळात आप च्या ह्या अतुलनीय विजयाचा थोडक्यात आढावा घेतला तर काही प्रमुख बाबी अश्या आहेत.
आप हा पक्ष निर्माण होण्याच्या आधी अण्णा हजारे ह्यांचे रामलीला आंदोलन त्यातून केजरीवाल योगेंद्र सारख्या नव व सुशिक्षित नेत्यांचा उदय झाला. ज्याची परिणीती हि आप ह्या राजकीय पक्षात झाली.आंदोलन करून जनतेचे प्रश्न सुटत नाहीत ते सुटण्याची प्रकिया जलद व सुलभ होते , जनतेचे प्रश्न सुटण्यासाठी शेवटी राजकारणात उतरावे लागते, सिस्टम चा भाग बनवा लागतो हे जेपी व अण्णा ह्यांना उमजले नाही. किंवा संत पद ठीक आहे पण राजकारण करण्याची आपली कुवत नाही हे ते जाणून असावेत. पण केजरीवाल ह्या सुशिक्षित व प्रशासकीय कामाचा अनुभव असलेले नेतृत्व आप ला लाभले त्यांनी दिल्लीत आपल्या पक्षाची स्थापना केली व तिला आपले कार्य शेत्र ठरवले .आपल्या पक्षाचा विस्तार भारतभर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला , मात्र दिल्लीत झालेले जन आंदोलन त्याने प्रस्थापित सरकार विरुद्ध राग ह्या आधीच्या निवडणुकीत दिसून आला.
व आप ला पहिल्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. बहुमत नसले तरी नवीन पक्षाला हे यश नक्कीच कौतुकास्पद होते.
भाजपला मोदींच्या कर्तृत्वावर.
आप च्या तोडीस तोड यश मिळाले मात्र दिल्लीत सरकार एकट्याच्या बळावर कोणीच स्थापन करू शकत नव्हते व कोन्ग्रेज ला बरोबर घेणे हि राजकीय आत्महत्या ठरली असती .केजू ह्यांनी कॉंग ला बरोबर घेऊन सरकार स्थापन केले पहिल्या ४९ दिवसात काम करण्याचा आव आणला व पुढे कॉंग व भाजपचा चा नाकर्तेपणा लोकपाल चे निमित्त हे कारण सांगून राजीनामा दिला.
त्यांचा होरा होता लगेच निवडणुका होतील व आपल्याला बहुमत मिळेल , पण लगेच निवडणुका झाल्या नाहीत व त्यामुळे राजीनाम्याचा आपला निर्णय चुकला असे केजू ह्यांनी जाहीर कबुली दिली.पण खरी मेख ह्यातच दडली होती, नियतीच्या मनात वेगळेच होते.
जर लगेच निवडणुका झाल्या असत्या तर केजूचा राजकीय अपरिपक्वता व नामोचा उदय ह्याने आजच्या निकालाच्या विरुद्ध निकाल दिला असता पण निवडणुका लांबल्या ह्याने काय झाले तर जनतेचा संयम संपुष्टात यायला लागला. भाजपच्या निवडणूक पूर्व अति उत्साहात केलेल्या घोषणा काळा पैसा आणणे ह्या त्यांना वचन पूर्ती करण्यास झालेला विलंब त्यातून जनतेत निर्माण झालेला रोष हा आप च्या पथ्यावर पडला. मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते केजरीवाल ह्यांनी जनतेची राजीनाम्यासाठी माफी मागितली व परत असे अतितायी कृत्य करणार नाही ह्याची खात्री दिली सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे राजकीय आचरटपणा टाळला.
लोकसभेत सपाटून मार खाणार्या केजू ह्यांनी राज्यभरातील निवडणुकांच्या मध्ये सारासार विचार न करता आपले उमेदवार लोकसभेप्रमाणेच उभे केले नाहीत. थोडक्यात मी दिल्लीचा व दिल्ली माझी असा संदेश केजुने दिल्ली करांना दिला. नेटाने पक्ष सावरला , ह्यावेळी आप वगळता कोन्ग्रेज व भाजप कडे प्रोजेक्ट करायला शेवटपर्यंत नेतृत्व नव्हते. थोडक्यात मोदी जसे पी एम पदांचे दावेदार होते तसे केजू हे दिल्लीच्या सिएम पदाचे दावेदार होते.
समर्थ पर्याय असेल तरच जनता सत्ताधारी पक्षाला खाली खेचते. कमकुमवत विरोधक हा नेहरू इंदिरा पर्वाचा पाया आहे अगदी महाराष्ट्रात आघाडी सरकार दशक भर राज्य ह्यामुळे करू शकली मोदी भरारीस सुद्धा दिशाहीन विरोधक कारणीभूत होते. आप जे दिल्लीत करू शकली ते इतर राज्यात अन्य कुणाला शक्य नाही सारेच एका माळेचे मणी.
आता बिहार व युपीच्या आगामी निवडणुकीत भाजप कोणत्या मुद्द्यांची घर वापसी करतो व कोणते नवीन मुद्दे आपल्या पोतडीतून बाहेर काढतो त्यांचा अजेंडा काय आहे ह्यावर त्यांचे यश अवलंबून आहे तेथे केजू सारखा सुशिक्षित सुसंस्कृत व प्रामाणिक नेता नसणे भाजपला फायद्याचे ठरू शकते.
, बेदी ह्यांना अत्यंत उशीरा आणण्यात आले व ते केवळ केजुला राजकीय प्रत्युत्तर असा एक संदेश जनतेत केला. ह्यामुळे केजुचे जनतेत महत्त्व आपसूकच वाढले बेदी ह्यांनी एक वर्ष आधी भाजपात प्रवेश केला असता व त्याची मुख्यमंत्री पदासाठी दावेदारी नक्की झाली असती तर ऐनवेळी भाजपात त्यांच्या येण्याने जी धुसपूस झाली ती झाली नसती, त्यांना भाजप व त्यांचे कार्यकर्ते ह्यांच्याशी सूर जुळवून घेण्यास अवधी निर्माण झाला असता, अण्णा ह्यांना बेदी ह्यांनी आपले मुद्दे व योजना पटवून दिल्या असत्या तर दिल्ली करांना वेगळा संदेश देण्यात आला असता
. ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐन मोक्याच्या क्षणी अण्णा ह्यांना मोदी सरकारवर टीका करावीशी वाटली , टीका केली ह्यावर आक्षेप नाही मात्र ती करण्याचे टायमिंग हे आण्णा सारख्या संताचे राजकारणी रूप दाखवते. तेही त्यांची शिष्या
बेदी हिच्या हातात निवडणुकीची कमान असताना .आता अण्णा राम लीला वर राज्याभिषेकाच्या सोहळ्यास जाणार का त्यांना आमंत्रण मिळणार का त्यांची पत्रास केजू ठेवणार का ह्या गोष्टी पाहणे मौजेचे ठरेल.
ह्या निवडणुकीच्या निमिताने किरण बेदी ह्या एका डेअर सच्च्या व कर्तुत्ववान महिलेचे भाजपात आगमन झाले तिला तिच्या योग्यतेचे पद व काम पक्षात मिळेल अशी आशा करू यात.
भाजपच्या ह्या पानिपातामुळे अनेक उदार मानवतावादी धर्मनिरपेक्ष लोकांना आनंदाचे भरते आले.
लोकसभेत मोदी व विधान सभेत केजरीवाल जनता नेहमीच ज्यावर विश्वास आहे त्याला मत देते.
विश्वास हा शाश्वत कधीच नसतो पुढील ५ वर्षात दिल्लीत राज्यात केजू व केंद्रात नमो ह्यांनी हा विश्वास जनतेच्या मनात टिकवला नाही तर कुणी सांगावे राहुल सुद्धा ...
कल्पना करवत नाही पण अशक्य असे काही नाही.
प्रत्येक राज्यात निवडणुकांचे निकाल स्थानिक पातळीवरील राज अर्थ सामाजिक करणावर अवलंबून असते. दिल्ली शेजारी हरयाणा आहे , असो
आनंद कशात मानायचा कशाचा काय अर्थ घ्यायचा ह्याचा जो तो मुखत्यार आहे.
कुमकवत कॉंग हे महाराष्ट्रात भाजपला लाभदायक तर दिल्लीत त्रासदायक ठरले. आप ने देशभरातील गल्ल्या सोडून दिल्लीवर लक्ष केंद्रित केले त्याचे राजकीय फळ आप ला मिळाले राजकारणाची गणिते अचूक ठरली त्यात जनतेचे सामाजिक आत्मभान जागृत झाले असा निष्कर्ष काढणे म्हणजे ....
असो
भाजपातील योगी संत महंत ह्यांच्या वक्तव्यामुळे लोकांच्या कृत्यामुळे मोदींना व पर्यायाने भाजपला दिल्लीकरांनी नाकारले असा अर्थ लावणे म्हणजे केजरीवाल व त्यांच्या कार्यकर्त्यांचे विजयाचे श्रेय नाकारणे असा होतो.
दिल्लीत केजरीवाल हे समर्थ नेतृत्व दिल्लीकरांनी मानले .
एकहाती सत्ता तर अखिलेश व मायावती सुद्धा आलटून पालटून मिळवतात हाच खेळ तामिळनाडू मध्ये सुद्धा होतो ,
योगी ,संत , महंत व त्यांची वक्तव्य समर्थनीय नाही पण त्यांचा दिल्लीशी संबंध जोडणे कठीण आहे
स्पष्ट सांगायचे तर मला भाजपच्या सच्च्या समर्थ काला शिवसेनेसारख्या मित्रापेक्षा आप सारख्या विरोधी पक्षावर जास्त विश्वास आहे.
.त्यांच्या हातून चांगले काहीतरी घडू दे अशी आशा करतो.
आता त्यांना धरणे देणे थांबून कृती करणे भाग आहे नाहीतर
जनता झाडूने ......
परफॉर्मन्स ऑर पेरीश हे लोकशाही व भांडवलशाही चे प्रमुख तत्व आहे,.
५०० शाळा, सगळी दिल्ली वायफाय युक्त करणे, २ लाख पब्लिक टॉयलेट बांधणे अश्या लोकप्रिय घोषणा आप ने पुढील ५ वर्षात प्रत्यक्षात अमलात आणल्या नाहीत तर त्यांची घर वापसी जनता करेल. व ह्यापुढे भाजप निवडणूक काळात घोषणा देतांना सारासार विचार करतील.
त्याच प्रमाणे लोकपाल बिल , दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा
वीज बिल अर्धे व वीज कंपन्यांचे ऑडित करण्याचे बिल ,
दिल्लीचे स्वतःचे इलेक्ट्रिक स्टेशन , दिल्ली ला सोलर सिटी बनवणे पाणी माफिया विरुद्ध कारवाई , यमुना पुनर्जीवन
अश्या ७० सूत्री घोषणा आपने बटाट्याच्या चाळीच्या नवीन मालकाने चाळकार्यांना दिल्या तश्या दिल्लीकरांना दिल्या आहेत , त्यातील निम्या जरी खर्या ठरल्या तरी मी आप चा पंखा होण्यास तयार आहे तूर्तास जागृत विरोधकाची भूमिका पर पाडणे हाती आहे .
अवांतर
जनतेला गृहीत धरू नये असे म्हणतात
पण युवराजांनी जनतेला गृहीत धरले होते .
जनता आपल्या पक्षाला मत देणार नाही ह्याची पक्की खात्री असल्याने त्यांनी दिल्ली करांच्या कडून अपेक्षा ठेवल्या नाहीत म्हणूनच अपेक्षाभंगाचे दुख्ख त्यांना झाले नाही ,
आजकाल कोणत्याही निवडणुकी नंतर कोन्ग्रेज चे निवडक कार्यकर्ते त्यांच्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर जमा होऊन
प्रियांका आओ ,कोन्ग्रेज पर्यायाने देश बचावो अश्या घोषणा देतात.
सुरेख विवेचन
उत्तर द्याहटवापारंपारिक राजकारणाला टाळून नव्या पिढीचे राजकारण दिल्लीत सुरु झाले त्याची पुनरावृत्ती मुंबईत होणार का .
उत्तर द्याहटवाआगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत आप सहभागी होईल का किंबहुना आता परत देशभर होणार्या राज्यातील विधान सभेच्या निवडणुकीत निवडक व मोजके उमेदवार आप देणार का लोकसभेची पुनरावृत्ती करणार हे पाहणे गरजेचे आहे.
सुंदर , समतोल लेख
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवाहा लेख लिहिला व जिभेवर काळा तीळ असल्यासारख्या अनेक गोष्टी खर्या झाल्या.