महाराष्टार्त जायचा तर बिहार मधील पराभवाचा तुलनात्मक आढावा भविष्यातील आव्हाने
ह्यावर लेख लिहिण्याचे कारण म्हणजे सध्या महाराष्टार्त व देशभरात मोदींची हार ,असहिष्णुतेची हार असे चिन्ह एका राज्याच्या निवडणुकी नंतर उभे करण्याचा प्रयत्न चालला आहे.
हा प्रयत्न करण्यापाठी हेतू काही जणांचा मोदींची कशी जिरली तर काही लोकांच्या मनात भीती अशी होती. मोदींचा अश्वमेध कोण कसा थांबवणार तेव्हा बिहार निकालाने त्यांना हायसे वाटले.
बिहार ह्या राज्यातील लालूच्या जाती पातीच्या राजकारणावर
नितीश ने विकास पुरुषाच्या नावावर चढवला कळस ह्या मुद्यांचा व इतर काही मुद्दे जे प्रसार माध्यमांच्या मध्ये दिसले नाही ते येथे मांडत आहे.
.बिहार निकालावर चर्चा करतांना
बहुसंख्य लोक ही साधी गोष्ट विचारात घेत नाहीत
महाराष्ट्र व बिहार मध्ये आधी ज्या निवडणुका झाल्या त्यात महत्वाचे पक्ष स्वतंत्र लढले . बिहार मध्ये निवडणूक होतांना मोदींचा आंतराष्ट्रीय व राजकीय करिष्मा एवढा होता.त्यांचा अश्वेधाने चार सलग राज्यात विजय मिळवला होता.
ह्यामुळे एकेकाळचे राजकीय वैरी मोदींना थांबिवाण्यासाठी
लोकसभेत दणका बसलेले लालू नितीश म्हणजे दोन घायाळ सिंह एकत्र आले त्याला साथ दिली. कोंग्रेज ने ह्यावेळी त्यांनी कमी जागा म्हणून हट्ट केला नाही त्रागा केला नाही जो महाराष्ट्रात राष्ट्रवादीशी केला होता. त्याचे त्यांना फळ मिळाले.
बिहार व महाराष्ट्राच्या विधानसभांच्या निकालांची तुलना केली तर अनेक गोष्टी स्पष्ट होतात. उदा
महाराष्टार्त जर राष्टवादी व सेना ह्यांनी युती केली असती तर भाजप ५० ते ८० वर अडकला असता. पण महाराष्ट्रात स्थिती वेगळी होती. राष्ट्रवादीला भाजप व सेना दोन्ही पक्ष युतीसाठी परवडणारे नव्हते कारण त्यांच्याशी युती म्हणजे सेक्युलर तत्वांना तिलांजली देणे पवारांच्या केंद्रातील राजकीय महात्वाकांशेला मानवणारे नव्हते. ह्याउलट हिंदुत्वाला तिलांजली येउन नवसेक्युलर झालेल्या नितीशांना भ्रष्ट पण सेक्युलर लालू हा नैसर्गिक पर्याय होता बाकी दानवे साहेबांची हि राजकीय म्हण लय भारी आहे.
मोदींचे भय असे कि जास्त मानपान न करता महाआघाडी झली तिने बिहारी ते बाहरी हे रूप निवडणुकीला आले.
त्यातच बाहरी मुलायम राष्ट्रवादी ला नाकारून त्यांनी हे रूप गडद केले ते एवढे झाले की मुसलमानांचा मसीहा प्रेरणा स्त्रोत ओविसी ला सेनेपेक्ष्या कमी मते मिळाली. बाहरी असणे हे धर्मा पेक्ष्या जास्त महत्वाचे ठरले तेच मोदींच्या मुळावर आले.
महराष्ट्रात सेना व भाजप ह्या १९९६ पासून एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या.
आधी युती असतांना जोशी व राणे ह्यांना नितीश सारखेत् युतीचे विकासाचे राजकारण किंवा विकास पुरुष ही इमेज करता आली नाही म्हणूनच भाजपला सोडचिठी देऊन सुद्धा नितीश ही मुख्यमंत्री पदाची पहिली पसंद बिहारी जनतेत होती. किंबहुना आता २०१९ मध्येतिसर्या आघाडीच्या नावाखाली त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून उभे केले व त्यास कोंग्रेज ने मान्यता दिली, म्हणजे राहुल ची राजकीय प्रगती पाहता ते नितीश ह्यांना समर्थन देऊ शकतात. तर मोदींना २०१९ खूपच अवघड जाईल २०१४ च्या लोकसभेत त्यांना तुल्यबळ असा राष्ट्रीय नेता प्रतीस्पर्द्धी नसणे त्यांच्या यशातील मोठा घटक होता.
दुसरा अजून एक मुद्दा असा आहे की महराष्ट्रात भाजपचे बस्तान बिहार पेक्ष्या बरे बसले होते वेस्ट महराष्ट्र व कोकण सोडला तर खानदेश खडसे , विधर्भ गडकरी व फडणवीस मुंबई तावडे तर मराठवाडा मुंडे अशी प्रांतवार प्रादेशिक नेत्यांची महाराष्ट्रात जनता नावे ऐकून होती ही नेते मंडळी बातम्यांच्या मध्ये दिसायची.आपापल्या प्रदेशात ते आपला आब राखून होते.
बिहार मध्ये भाजपचे बिहारी मोदी सोडल्यास राज्य पातळीवर हुसेन सोडल्यास अजून बस्तान बसलेली मंडळी नव्हती.
महाराष्ट्रात मोदी सत्ता आणणार पण मुख्यमंत्री पदासाठी चुरस निर्माण झाली म्हणून खडसे तावडे फडणवीस किंवा गडकरी सगळ्यांनी आपापल्या प्रदेशात जोर लावला एवढेच कशाला पंकजा ताई सुद्धा ह्या स्पर्ध्धेत होत्या. अश्या चुरसे चा अभाव बिहार भाजपात होता., सगळ्यात वाईट म्हणजे मुख्यमंत्री कोण ह्यात एन डी ए मध्ये कमालीचा संभ्रम होता. दलित नेता मांझी कि पासवान की हुसेन असे बिहारी उच्च वर्णीय ते ओबीसी लोकांच्यामध्ये संभ्रम होता तो महाआघाडी मध्ये नव्हता.
माझी ह्यांनी सुरवातीला मी दलित असल्याने माझ्यावर अन्याय झाला हे जे चित्र प्रसार माध्यमांच्या सहाय्याने काही प्रमाणात निर्माण केले ते भ्रामक होते खरे तर त्यांनी नितीश ह्यांच्या पाठीत खंजीर खुपसला होता .भरताने रामास जसे राज्य परत केले तसे मांझी ह्यांनी करणे अपेक्षित होते निदान बिहारी जनतेकडून ,नितीश ह्यांना मुख्यमंत्री पदावरून जावे लागले तेव्हा प्रशासनात आलेला बदल अकार्यशमता बिहारी जनतेच्या लक्षात आली व तुम्हारे जानेके बाद तुम्हारी याद आती हे अशी अवस्था बिहारी जनतेशी झाली.म्हणूनच लालुशी सोडा पण परत भाजपशी जरी युती केली असती तरी नितीश ह्यांना मुख्यमंत्री म्हणून बिहारी जनतेने पसंती निवडणूकपूर्व काळात दिली असती .अश्यातच भागवतांच्या वक्तव्यांचा विपर्यास करण्यास आला.अश्यातच भले त्यांचे आरक्षणावर भाष्य शहरी जनता प्रसार माध्यमे एवढेच कशाला मनीष तिवारी ह्यांना पटले तरी बिहार मधील बेरोजगार ओबीसी व दलितांना आरक्षण हाच रोजगाराचा आधार व आता जन्मसिद्ध हक्क वाटत असल्याने त्यांच्या मनात भीती निर्माण झाली ती वाढवण्याचे काम लालू नितीश ने जोमात केले.
अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात निवडणुकीत पक्के राजकारण करतांना भाजपने छोट्या पक्षांची युती तर केलीच पण स्वतंत्र लढतांना अनेक आयाराम आघाडीतून पक्षात आणले. तेच सेनेने केले त्याचा फायदा त्यांना झाला. हाच फ़ोर्मुल कल्याण डोंबिवली मध्ये दोघांनी केला. पण बिहार मध्ये महाआघाडीचे आयाराम त्यांना फोडता आले नाही कारण बिहार मध्ये नितीश कुमार ह्यांची विकासपुरुष ही ठळक प्रतिमा होती. त्यास लालूची साथ असल्याने विकास व जातीची कॉकटेल पार्टी सोडून हिंदुत्वाच्या कमंडलू मधील पाणी पिण्यास कोणीही आले नाही.
मोदी पंतप्रधान म्हणून ठीक पण बिहार चालवायला थोडीस येणार हे जनतेच्या मनात पक्के झाले .
महराष्ट्रात स्वतंत्र विधर्भ तर कल्याण मध्ये २७ गावे स्थानिक भाजपने विशेतः देवेंद्र ने जो प्रभावी वापर केला.त्यात विधान सभेत गडकरी ह्यांची सुद्धा साथ होती. ते मुद्दे भाजपच्या दोन्ही यशात निर्णायक ठरले असा काही स्थानिक अस्मितेचा व स्थानिक जनतेच्या विकासाचा मुद्दा बिहार मध्ये भाजपच्या हाती नव्हता.
अजून
उत्तर प्रदेश मध्ये असाच कोणताही मुद्दा हाती नाही आहे व तेथे पक्षाची स्थानिक पातळीवर नेते व कार्यकर्ते ह्यांची बोंब आहे .
तेव्हा २०१७ साठी दादरी चा वापर करण्याची कमंडळ युग आणून सत्तायोग साधण्यासाठी , योगी साध्वी व शर्मा ह्या वाचाळ वीरांनी बेताल वक्तव्ये केली, मला असे वाटते ह्या लोकांना पक्षातून व संघातून काही गटांचा पाठिंबा असावा पण त्याचा उलट परिणाम बिहार मध्ये झाला मुस्लिमांनी महाघाडीला मते दिली.
मला अजून एक मोठी समस्या अशी वाटते की ह्या पराजयाच्या मुळे तिसर्या आघाडीचे मृगजळ निर्माण झाले आहे. , तेव्हा २०१७ ला अखिलेश व मायावती ने कोंग्रेज च्या मदतीने युती केली तर भाजपचे पानिपत ठरले आहे.,आसाम मध्ये महाआघाडी ची अभद्र युती करण्याची सुरवात होणार असल्याचे वाचले. भाजपला ह्यावर उत्तर म्हणजे सम दम दंड वापरून आसमंत कोंग्रेज चे अनेक आयाराम पक्षात आणणे व स्थानिक मुद्दे व विकासावर लक्ष देणे आहे.
किंबहुना मुंबई मध्ये विधान सभेसाठी उत्तर भारतातून ह्या दोन्ही राज्यातून भाजपचे कार्यकर्ते आले होते , म्हणून त्यांची मते एकहाती भाजपला गेली मात्र बिहार मध्ये मोदी सरकारचे स्टार मंत्री प्रभू व गडकरी ह्यांनी सभा घेतल्या नाहीत.
किंबहुना आचार संहिता लागू होण्याआधी रेल्वेचे दोन बडे करार बिहार मध्ये आधीच घोषित केले असते तर विकास व रोजगार ह्या मुद्याभावती निवडणूक केंद्रित झाली असती.
कारण पेकेज म्हणजे नक्की काय हे सामान्य जनतेला कळणे कठीण पण डीझेल इंजिन चा कारखाना बिहार मध्ये आला म्हणजे काम करायला बिहारीच लागणार हे सामान्य जनतेला कळते थोडक्यात हा अमेरिकन व फ्रेंच कंपनीशी करार करून परकीय गुंतवणूक रेल्वेत आणण्याचा हा बेत काही महिने आधी झाला असता तर प्रसार माध्यमात विकासाची रोजगारांची चर्चा झाली असती. आज भारताच्या गरीब जनतेला रोजगार जर एखादा पक्ष देत असेल तर डोळे मिटून त्यांच्या विचारसरणीत ही जनता रंगून जाईल. त्यासाठी प्रक्षोभक वक्तव्ये करावी लागत नाही .ह्या दिवाळीत प्रभू ह्यांची कोकण रेल्वेला दिलेली भेट व बोरीवली स्थानकांचे अद्यावत करणे मुंबई महानगर पालिकेला भाजपला कोकणी मराठी मते मिळवून देईल. ,जर दोन भाऊ स्वतंत्र लढले तर.
शेवटचा मुद्दा असा की केंद्रात बिहार ला पूर्वी जे महत्व होते ते आता महाराष्ट्र व गुजरात ला आले आहे , रेल्वे सारखे दुभते खाते मागील काही वर्षांच्या पासून बिहार पासून लांब आहे. अनेक महत्वाची खाती त्यांना दिली नाही ह्यांचा राग हि मतदानातून व्यक्त झाला झाला.
भाजपला उत्तर प्रदेश मध्ये मायावती व अखिलेश ह्यांच्यापैकी एकाशी युती करावी जागेबाबत तडजोड केली तर हिंदुत्व नाही आता विकासाच्या मुद्यावर ह्या दोन्ही पैकी एक कोणीतरी गळाला लागेल. सेक्लुलर चा सिक्युअर मुद्दा जो वेळप्रसंगी भ्रष्टाचारावर सुद्धा पांघरून घालतो लालू सारख्याला झिरो ते किंग मेकर बनवतो तो सोडणे मायावती मुलायम ह्यांना अवघड आहे. पण २०१७ पर्यंत भाजपने विकास एके विकास हा नारा केला उत्तर प्रदेशात विकास प्रकल्प आणले तर भारतातील सर्वात महत्वाच्या राज्यात युती करून सरकारात येता येईल.
आता असे करतांना तत्वे कुठे गेली असा बाळबोध प्रश्न विरोधक विचारू शकतात पण सत्ता नसेल तर
राज्यात अकार्यशम व भ्रष्टाचारी पक्ष सत्तेत आले तर केंद्रातून मोदींना अच्छे दिन आणण्यास मर्यादा होतील. सध्या देवेंद्र दिल्लीत जाऊन महाराष्ट्राचे अनेक प्रकल्प मंजूर करून येत आहेत म्हणूनच ह्या विकासाची फळे मिळावी म्हणून सेना अजून सत्तेत आहे.समजा आता सेना सत्तेतून बाहेर पडली तर
आता महाराष्ट्रात निवडणुका झाला तर दोन शक्यता आहेत.
पहिली जर परत आघाडी स्वतंत्र लढली तर त्यांना जास्त जागा मिळण्याची संधी येऊ शकते कारण दुष्काळासाठी भाजपच्या सोबत सेनेला सुद्धा दुषणे मिळणार. ही एक शक्यता कदाचित भाजप १०० पर्यंत जागा मिळाल्या तर आता सेनेला विचारात सुद्धा न घेत ते राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतील.
दुसरी शक्यता जर मागच्या निवडणुकीतून धडा घेत आघाडी झाली तर झक मारून युती करावी लागणार
एकटे लढून स्वताच्या पायावर कुर्हाड कोणीच मारून घेणार नाही तेव्हा आलेली सत्ता ५ वर्ष राबवणे हाच पर्याय सेने पुढे आहे.
बिहार मध्ये पानिपत झाले तरी मुंबई महानगर पालिके साठी उत्तर भारतीय मुंबईकर आघाडी व समाजवादी वर अवलंबून राहू शकत नाही व नितीश व लालू ह्यांनी समाजवादी शी युती केली तर चित्र वेगळे दिसू शकते.
बंगाल मध्ये कम्युनिस्ट व कोंग्रेज हे ममताचे शत्रू भाजपचे सुद्धा आहेत ते बंगाल मध्ये कमकुवत आहेत.पण कम्युनिस्ट कधीही परत उसळी मारू शकतात , बंगाली जनतेच्या मनातून ते संपूर्णतः पुसल्या गेले नाही आहेत.
तेव्हा ममताला हादरा देऊन 100% भाजप ह्या पूर्वीच्या धोरणाशी अनरूप मोदी ह्यांनी बंगालात आक्रमक धोरण स्वीकारले त्याचा परिणाम केंद्रात विधायक पार करताना दिसून आला.आता बिहार चा बोध घेऊन दिदिशी भाजपने युती केली तिला मोठेपण दिले तर सत्तेत भाजप येऊ शकेन. पूर्वी दीदी केंद्रात वाजपेयी सरकारात होत्या तेव्हा असे करणे दीदींना अवघड जाणार नाही. गरज आहे सामोपचाराने तिच्याशी संवाद साधायची. ,मोदी ह्यांनी बांगलादेश सोबत सीमा प्रश्न सोडवला म्हणून दीदी खुश होत्या. मोदींच्या विकास धोरणाचा फायदा बंगाल मध्ये करण्यास व आपली सत्ता राखण्यासाठी भाजपची युती तिला व भाजपला फायद्यात ठरेल. नेताजी ह्यांच्या गोपनीय फायली जनतेसमोर आणून नेहरू ह्यांची हेरगिरी व पर्यायाने कोंग्रेज ची बदनामी साठी आधी बंगाल सरकारने व आता जानेवारीत मोदी ह्यांनी फायली जनतेसमोर आणण्याचे जे टायमिंग साधले आहे ते पाहता मोदी व ममता हे भविष्यातील सहकारी म्हणून योग्य निवड ठरू शकते.
सध्या तरी बंगाल व उत्तर प्रदेशातभाजपाला छोटा भाऊ होऊन तिसर्या आघाडीचा बुडबुडा निर्माण होण्याआधी तोडणे भाजपला गरजेचे आहे
.
लालू नितीश चा संसार म्हणजे साप व मुंगुसाचा संसार आहे लालू किंवा नितीश मध्ये पुढे राडे झाले तर महराष्ट्रात राष्ट्रवादी जसे बिनशर्त पाठीब्यांचे राजकारण करते तसे भाजपने बिहार मध्ये करायला हरकत नाही.
आता सुद्धा भाजपने लालूला बिनशर्त पाठिंबा दिला तर लालू नितीश ची राजकीय काडीमोड घेऊन स्वताचे सरकार स्थापण्यास कमी करणार नाही.
नितीश च्या जागी शहा लालूच्या घरी पोहचले असते तर आज नितीश ५० जागांवर थांबला असता
पण ह्या जर तर च्या गोष्टी.
सध्या तरी
मी भ्रष्टाचारी असलो मला कोर्टाने शिक्षा सुनावली असेल तरीही मी सेक्य्लुअर आहे म्हणून जनतेने मला निवडणून दिले कारण सर्वधर्म समभाव असा मुखवटा मी धारण केला असला तरी
माझ्या धर्मात मी जातीचे राजकारण खुबीने खेळतो
असे लालू ने भारतीय लोकशाहीला भारतीय जनतेला ठणकावून सांगितले.
थोडक्यात गायीचा मुद्दा नाही चालला मात्र चारा फेम सत्तेत आला.असेच खेदाने म्हणावे लागेल

कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा