हिमवर्षाव

Blogger Tricks

शनिवार, २० फेब्रुवारी, २०१६

जे एन न्यू विद्यापीठ त्यांच्या परंपरा ह्या बाता, मोहब्बते मधील अमिताभ चे गुरुकुल परंपरा प्रतिष्ठा अनुशासन

.
सध्या जे एन न्यू विद्यापीठ त्यांच्या परंपरा ह्या बाता एकूण मोहब्बते मधील अमिताभ व त्यांच्या गुरुकुल आठवण झाली.
ह्यात वैचारिक स्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनेकजण बोलत आहेत व अनेकजण त्यासाठी देशाच्या विरोधातील मानसिकता व घोषणाबाजीचे समर्थन करत आहेत.
पण हे सर्व दुट्टपी व दांभिक आहे इतके दिवस ह्यांच्या विद्यापीठात काय होत होते ते सामान्य जनतेला कळत नव्हते आता संधर्भा सहित स्पष्टीकरण द्यायची वेळ आली आहे
ह्या विद्यापीठात डाव्यांचा प्रभाव आहे आणि या देशाच्या बुद्धीवादावर आणि विविधतेवर घाला घातला जातो बरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पेटंट फक्त डाव्यांच्या कडे आहे .
२००८ घटना प्रसिद्ध व बोलकी आहे , अफझल गुरु साठी येथे कार्यक्रम करणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य
मात्र अमेरिकन राजदूताला भांडवलशाहीचा प्रवक्ता म्हणून त्याचे विचार व्यक्त करायला परवानगी नाही ज्यांना त्यांचे विचार ऐकायचे आहे त्यांचे काय
हा वैचारिक स्वातंत्र्यावर घाला नाही का आज अमेरिकेशी व्यापारिक राजकीय सामरिक संबंध वाढत असतांना ह्या विद्यापिठ्यातून अमेरिका भांडवलशाही विरोधी नोकरशहा सिस्टम मध्ये येत असतील तर मोदी भले अमेरिकेत जाऊ गुंतवणूक आणू हीच लोक झारीतील शुक्राचार्यांचे काम करतील
ह्याच लोकांनी २०१४ मध्ये इजरेल राजदूताच्या कार्यक्रम होऊ दिला नाही
आणि हि कसली बोंबा बोंब संघाचे विचार लादत आहेत , तुम्ही डाव्याचे मार्क चे विचार लादले ते चालले हे म्हणजे बाजारपेठ आमचा माल विकला जात असतांना दुसर्याने माल विकयला येऊनच नये म्हनून प्रस्थापित व्यापारी नव्या व्यापार्याला नाडतो.
तसाच हा प्रकार आहे.
 मुळात लोकशाही भाषा स्वातंत्र्य ह्या परकीय वेस्टन वल्ड च्या संकल्पना स्वातंत्र्याच्या नंतर आपल्याकडे रुजल्या त्याला संविधानाचे कोंदण लाभले. मात्र जेथून ह्यांचा उगम झाला त्या परदेशात काळानुसार ह्या संकल्पना अपग्रेड झाल्या त्यांचे स्वरूप बदलले
भाषा स्वातंत्र्याचे उदाहरण द्यायचे तर  अनेक विचारवंत हे भारतातील कायद्याचे उदाहरण देतात कि देशविरोधी नारे दिल्याने देशद्रोह सिद्ध होत नाही तशी कृती करावी लागते
ह्यामुळे विनायक सेन सारखे माणसे कायद्याच्या कचाट्यातून सुटली व उमर ह्याच बळावर आपला उन्मादी कार्यक्रम करू शकला, आता जर्मनीचे उदाहरण घ्या येथे भाषा स्वातंत्र्य आहे मात्र त्याला मर्यादा आहेत.
मुळात लोकशाही भाषा स्वातंत्र्य ह्या परकीय वेस्टन वल्ड च्या संकल्पना स्वातंत्र्याच्या नंतर आपल्याकडे रुजल्या त्याला संविधानाचे कोंदण लाभले. मात्र जेथून ह्यांचा उगम झाला त्या परदेशात काळानुसार ह्या संकल्पना अपग्रेड झाल्या त्यांचे स्वरूप बदलले.

भाषा स्वातंत्र्याचे उदाहरण द्यायचे तर  अनेक विचारवंत हे भारतातील कायद्याचे उदाहरण देतात कि देशविरोधी नारे दिल्याने देशद्रोह सिद्ध होत नाही तशी कृती करावी लागते
ह्यामुळे विनायक सेन सारखे माणसे कायद्याच्या कचाट्यातून सुटली व उमर ह्याच बळावर आपला उन्मादी कार्यक्रम करू शकला,
 आता जर्मनीचे उदाहरण घ्या येथे भाषा स्वातंत्र्य आहे मात्र त्याला मर्यादा आहेत.
त्यांच्या पिनल कोड आर्टिकल ८६ नुसार नाझीवादाचा प्रचार हा कायद्याने गुन्हा आहे ,इतर अनेक देशात सुद्धा
असे कायदे आहेत ज्या द्वारे तुरुंगात ३ ते ५ वर्ष व्यक्ती जाऊ शकते.

हैद्राबाद मध्ये रोहित ने कसला कार्यक्रम केला असेल त्याची झलक उमर च्या कार्यक्रमामुळे दिसली.
त्यावेळी युनि ने प्रकरण हाताळले तरी बोंबा बोंब आता ह्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी प्रकरण हाताळले तरी बोंबा मारत आहेत.

फ्रीडम ऑफ स्पीच ची गमजा आता मारत आहेत  पण मग
कमलेश तिवारीच्या फ्रीडम स्पीच चे काय त्याला तुरुंगात टाकला आहे त्यावर कुणी आवाज उठवला अडीच लाख मुसलमानांनी का
ज्यांना भक्त म्हणून हिणवले जाते त्यांनी कमलेश च्या वक्तव्याचे समर्थन फ्रीडम ऑफ स्पीच ने केले नाही. त्याच्या सुटकेसाठी गृह मंत्र्यांची भेट घेतली नाही ,

इतके दिवस नथुराम गोडसे चे जे कोणी समर्थक आहेत त्यांच्या फ्रीडम ऑफ स्पीच चे काय
त्यांना हे डावे का विरोध करतात का नाही उमर सारखे त्यांना सुद्धा बोलू द्यायची संमती डावे देत नाहीत
  जे एन यु मधील विद्यार्थ्यांहून अधिक परिणाम कारक चर्चा मराठी संस्थळावर
चांगली चर्चा होते.
, मधेच केपिटल पनिशमेंट बद्दल कोल्हेकोइ झाली
तो उमर म्हणतो हा इवेंट काश्मीर साठी अफझल साठी होता
आणि ८ ते ९ विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या बाहेरून काश्मिरी विद्यार्थी बोलावले तेव्हा बाकीचे झोप काढत होते ,
हैद्राबाद चा घटनेच्या नंतर केद्र सरकार विद्यापीठांनी संपर्क साधून असतील व इंटेलिजन्स पुरवत असतील तर हरत काय आहे पूर्वी आधी हे ऐकले नाही कारण पूर्वी मोदी पंतप्रधान नव्हते.
आता ते आहेत .

कनैह्या साठी येचुरी विद्यापीठात येतात गृह मंत्र्यांना भेटतात
मात्र हैद्राबाद मध्ये एविबिच्या कार्यकत्यांच्या साठी स्मृती इराणी कुलगुरूंना संपर्क साधला तेव्हा ह्याच डाव्यांनी वादंग माजवला
सरकारला दोषी ठरवले.
डाव्यांचे स्वतासाठी वेगळे निकष
ह्या सगळ्या प्रकरणात पहिले राजकारणी विद्यापीठात कोणत्या पक्षाचे आले.
आणि कशाला आले
दिल्ली पोलिसांचा विरुद्ध कोर्टात जाण्याचा मार्ग होता कि.
 त्या रविश कुमारच्या उंटावरून शेळ्या हाकण्याच्या प्रवृत्तीला
येथे मस्त उत्तर दिले आहे.

 खुद्द अमेरिकेत ९  इलेवन  नंतर दोन्ही पक्षाच्या मदतीने देशभक्ती कायदा तयार झाला.खुद्द अमेरिकेत ९  इलेवन  नंतर दोन्ही पक्षाच्या मदतीने देशभक्ती कायदा तयार झाला  ह्यातील कायदे तुम्हाला जाचक वाटू शकतात पण व्यक्ती स्वातंत्र्यांचा पुरस्कार करण्यार्या अमेरिकेत ते राबवले केले म्हणून  आजतागयात दुसरा दहशतादी हल्ला झाला नाही.
ह्याच धर्तीवर भारतात कायदा झाला पाहिजे.तेव्हाच ही विचारजंतांची वळवळ थांबेल ते दहशतवाद्यांचे स्लीपर सेल म्हणूनच काम करतात हे अस्तीनितले निखारे खरे खतरनाक आहेत.

1 टिप्पणी :

  1. I had distrusted that I should find a lot more to say as this touches on that change. Do we have absolutely no talent?
    Official Facebook page:
    https://www.facebook.com/BuySerolean/

    उत्तर द्याहटवा

Blogger Gadgets Widgets By My Blogger Tips